मराठी लेख : नात्यातील वाद विवाद

मराठी लेख : नात्यातील वाद विवाद

नातं कुठलही असो त्यात वाद -विवाद हे होतंच असतात. रुसवे फुगवे होतच राहतात.  पण इतकं असूनही नात्यातली असलेली ती गोडी काही कमी होत नाही.

एकमेकांच एकमेकांवर असलेलं प्रेम काही कमी होत नाही.  बस्स मन तुटली जातात काही वेळा पुरतm  तेंव्हापुरतं सार काही दुरावतं.तेंव्हा मात्र थोडा अवधी हवा असतो आपल्याला अन समोरच्याला हि सर्वकाही शांत होण्यासाठी.  पुन्हा सर्वसुरळीत होण्यासाठी. तो एकदा दिला एकमेकांना कि बस्स…पुढेचे क्षण आपलेच असतात. त्याच गोडीचे ..त्याच हसऱ्या मनाचे …प्रेमाचे …आनंदाचे !

ज्या व्यक्तीवर आपलं भरभरून अन जीवापाड प्रेम असतं.
त्या व्यक्तीला विनाकरण त्रास देण्याचं  तसा विचारच आपल्या मनास कधी शिवत नाही.
उलट ती व्यक्ती नित्य नेहमी हास्य आनंदात बहरली जावी ह्या साठीच,  ह्याकडेच आपल्या मनाचा सर्व कल असतो  आणि त्या साठीच सदा सर्वदा त्या ईश्वराकडे एकच मनोभावे प्रार्थना केली जाते.

ती हि कि तिला सुखी ठेव ….आनंदी ठेव ..भरभरून प्रेम दे !!!

दूर राहूनही ती व्यक्ती मनाच्या अन हृदयाच्या खूप खूप जवळ असते.  अन त्याची जाणीव प्रत्येक क्षणी आपणास होत राहते. 
हेच ते प्रेम असत. हेच एक अनमोल नातं असतं. 

मनातले काही ..
-संकेत य पाटेकर
मराठी लेख : नात्यातील वाद विवाद

 

Leave a Comment

Your email address will not be published.