मनातले काही …

मनातले काही …

मनातले काही ..

जिथे मी पण संपतो  तिथूनच प्रेमाची हद्द सुरु होते . – संकेत

मनातले काही #2

प्रसंगी  ‘समजून घेताना आणि समजून देताना’ आपण कुठेशी कमी पडतो,  इतकंच काय ते.. आपलेपणातून जुळलेल्या नात्याला तडा जाण्याचं एकमेव कारण.. बाकी ‘आयुष्यं’ म्हणाल तर ते ‘वाऱ्याच्या सुखद अश्या झुळकीप्रमाणे’ आहे. मनाचं अंतर्बाह्य रंग उधळून देणारं…कळतंय ना ? उगाच (संकेत )

मनातले काही #3

विषयांची व्याप्ती फार मोठी आहे . विषय अनेक आहेत. त्यांची कुठेच कमी नाही. फक्त आपल्या संकुचित अन चौकटीतल्या त्याच त्याच विचारांना , त्या चौकटीतून बाहेर काढून , त्या नव्या विषयांशी कुठेशी जोडता आलं पाहिजे.

तेवढं एक जमलं ना कि झालं ..नवी दिशा अन नवं क्षितिज नजरेसमोर उभं आहेच…शिवधनुष्य पेलायला.- चौकटीबाहेरच्या विचारधारेत- संकेत

मनातले काही #4

गुणा दोषासहित जिथे समीकरण जुळतं वा स्वीकारलं जातं तिथेच खऱ्या अर्थानं, मला वाटतं..आपलेपणाचं नातं खळखळत राहतं. – संकेत

मनातले काही #5

प्रेम आंधळं नसतं रे . माणसाचे विचार अन पाहण्याची दृष्टी काही वेळ अंधुक होते . व्यक्तीच्या त्या जिव्हाळीक नात्यापायी म्हण किंव्हा तिच्या ओढीने म्हण , घडतं ते . आणि ते सह्ज आणि साहजिकच आहे. त्यावर तू दोष आरोप ठेवू नकोस. कारण ह्याची दुसरी ही बाजू आहे .ह्यातूनच , भावनांच्या संमिश्र जलधारेतून निथळलेल्या जीवनपयोगी प्रकाश वाटा धुंडाळल्या जातात. किंव्हा आपल्याशी त्या जोडल्या जातात.योग्यतेकडे नेणाऱ्या … म्हणूनच मी म्हणतो माणसांन नां , एकदा प्रेम करावं . अगदी सर्वस्व वाहून …..आणि सर्वस्वी मनाची वाहून घेण्याची क्षमता ठेवून ….कारण प्रेम म्हटलं की तिथे ओघाने वेदना ही आल्याचं आणि त्या वेदना वाहून घेण्याची क्षमता ही हवीच आपल्यात .

तरच प्रेमाला अर्थ .नाहीतर सुडाची भावना पेटली की खल्लास …. ! त्याला प्रेम म्हणता येत नाही .

~ संकेत – 30.06.2016

मनातले काही #6

आपण फ़क्त प्रेम करायचं..रे ,आपलेपणाच्या ओलिवतेनं ,अन् मार्गीस्त होतं जायचं , आपल्या प्रवास वाटेने,आनंदाचे परीनिर्मळ हास्य, अंन त्यातला सुगंधित दर्प  समीप येणाऱ्या आतंरिक चेहरयांवरती त्याच सुवासिकतेने झळकावतं…हेच आपलं इति कर्तव्य.. आपला धर्म आणि आपल्या जगण्यातील दिशा …कळतयं का ? काय म्हणायच् ते..

प्रेम कर , पण तू तुझ्या मनातील अपेक्षांचा पेला रीता होऊ देऊ नकोस, अन् उतू ही जाऊ देऊ नकोस.  स्थिर रहा,मनाच्या तळाशी  असलेला जाणिवांचा भावगंध  कायम  राखून…

हितगुज मनाशी…

संकेत – ०६/०६/२०१६

मनातले काही #7

उन्हाच्या झळीने काटोकाठ भरलेलं तळ देखील हळुवार कोरडं होतं जातं रे …आपल्या मनात तळ साचून असलेल्या अपेक्षांचं देखील असंच काहीस आहे.दुर्लक्षितपणाची , दाहक झळ त्या तळ्यापर्यंत सातत्याने पोहचत राहिली कि त्याचं हि बाष्पीभवन होतं . आणि साचलेल्या अपेक्षांचं तळ हळूच निकामी होतं जातं . त्या तळ्याशी मग संवेदना उरत नाही. उरतो तो केवळ कोरडेपण … अतृप्ततेचा… अपूर्णतेचा ..तुज हि असंच काहीस झालं आहे बघ…तिच्या मनाचे दार तुने कित्येकदा ठोठावले. प्रयत्नाची शर्थ केलीस ..करत राहिलास. तिने पुन्हा माघारी यावं म्हणून …..आशेचा दीप सतत तेवत ठेवत . पण अखेर काय..प्रतिक्रिया शून्य . तू त्यामुळे रुडावला आहेस..

एक लक्षात घे …, आपलेपणाचा पाऊस अवचित का होईना , येतोच रे कधी.तेंव्हा निवांत हो अगदी…तुझ्या मनातल्या तळ्याला तो आपलेपणाचा स्पर्श झाला कि तू पुन्हा आनंदून बागडशील..असंच वेडवाकड ..काहीसं सुचलेलं .

मनातलं काही ..- संकेत पाटेकर – २३.०५.२०१६

मनातले काही #8

‘समर्पणा’ ची व्याख्या शिकायची असेल तर ती एखाद बहरलेल्या किंव्हा पानां गळलेल्या वृक्षाकडूनच शिकून घावी अथवा समजून घ्यावी. म्हणजे पार त्याच्या शेंड्यापासून …ते थेट बुंध्यापर्यंत वा मुळापर्यंत.., असंख्य अगणित असे जीव त्यावर आधार करून राहतात.

आपलं आयुष्य सुंदरतेने विणत ….. तरीही ते ‘स्थिर मन ‘ …हा कि हु करत नाही. वा स्वार्थ भाव राखत नाही .वेदनेचे कुऱ्हांडी घाव पडले तरी, ” ते देणं आणि केवळ देत राहाणं ” हेच जाणतं आणि हाच त्याचा स्थायी भाव वा कर्म ….ते हि ते निष्ठेने पार पाडत अगदी…आपलं अस्तित्व पुसून जाईपर्यंत ….

– संकेत – १७.०४.२०१६

मनातले काही #9

प्रेम हे मनाच्या अंत करणातून उमटायला हवं …

मनातले काही #10

चुकांचा खेळ कधी मांडू नये.  पण दिल्या गेलेल्या अनमोल क्षणांना तेवढ कवटाळून घ्यावं. हे क्षणच खूप महत्वाचे असतात . आयुष्यभर पुरतात .दोष तर सर्वत्र आहेत . सर्वांत आहेत . राजहंस सारखं हवं तेच फक्त वेचायच असतं .बस्स…– संकेत पाटेकर  २०.१२.२०१५

मनातले काही #11

जितक्या सहजतेने आपण एखाद गोष्टीमध्ये गुंतलो जातो ना, तितक्याच सहजतेने त्याच गोष्टीतून बाहेर पडणं देखील जमायला हवं. . हे एकदा जमलं ना , कि मग बघ..हे आयुष्य हि अगदी सहज सोपं आहे. – संकेत य पाटेकर -१९.१२.२०१५

मनातले काही #12

घडणाऱ्या घटना घडून जातात रे , उदासिनतेचा गहिरा रंग उफाळून  पण  अस असूनही  काहीवेळा जे घडलं. किंव्हा घडतंय त्यावर  विश्वास मात्र बसत नाही . मनाची एक बाजू अजूनही कुठेशी आशेचा दीप घेत खुणावत असते. काहीतरी नक्कीच मनाजोग घडेल. – संकेत १८.१२.२०१५

मनातले काही #13

चूक तुझी कि माझी हे तितकसं  महत्वाचं नाही . महत्वाचं आहे ते ,  ती चूक,  कोण आधी क्षमाशील मनानं  माफ करतंय ते ..खरं  तर त्यावरच  त्या व्यक्तीच्या  मनाची अन प्रेमाची व्याप्ती कळते .  – संकेत -१७.१२.२०१५

मनातले काही #14

खूप म्हटलं होतं स्वतःशीच, प्रेमाने हे जग जिंकेन म्हणून…मात्र आता कळतंय खरं..इथे एका व्यक्तीचच मन जिंकन खूप कठीण जातंय ..तिथे जगाचं तू काय घेऊन बसलायस रे…-संकेत  १७.१२.२०१५

मनातले काही #15

कुणावर प्रेम करायचं तर मनापासून प्रेम करा…..हरलो तरी चालेल..पण प्रेम मात्र खरं हवं. -संकेत

मनातले काही #16

सगळेच प्रश्न एकट्यानेच सुटत नाही..रे .काही वेळा समोरच्याचा हि तितकाच त्यात सहभाग असावा लागतो . तर तो प्रश्न कुठेसा हाताळता येतो. वा सुटतो. तर काही वेळा सगळ वेळेच्या अधीन करावं लागतं. एखाद्याला कितीही समजावून सांगितलं वा समजून घेतलं तरी हि..

नाती मुळात का विस्कटतात माहित आहे ? ती योग्य वेळ साधली जात नाही म्हणून ..योग्य वेळी योग्य ते साधून सावरायचं असतं, स्वतःला हि अन सैल पडत जाणऱ्या किंव्हा तुटू पाहणाऱ्या त्या नात्याच्या रेशीम दोरीला हि , वेळ टळून गेल्यावर ..काही एक उपयोग नसतो.

मुळात काय तर एकेमकांना सांभाळून घेण हे महत्वाच…एकाने सावरून घ्यायला सुरवात केली ना, कि दुसऱ्यानं हि अधिक वेळ न दवडता . स्वतःला सावरून घेण आवश्यक असतं .अन मला वाटतं अशीच नाती हि कायम चिरतरुण ठरतात अन असतात. नातं सांभाळायचं वा कायम चिरतरुण ठेवायचं असेल तर हे साधनं आलंच. जमायला हवं. अस माझं मत आहे. .– संकेत १४.१२.२०१५

मनातले काही #17

अवघड गोष्टी मिळविण्यासाठीच खूप  प्रयास करावे लागतात. मग ध्यास घेतलेल्या त्या अवघड यादीत  प्रेम असो ..वा ती प्रेमाची व्यक्ती …सहज अस काहीच नसतं . मिळवावं लागतं. प्रयत्नांची शर्थ करत ..स्वतःला त्यात झोकावून  द्यावं लागतं. प्रसंगी  उठावनारया   वेदनांना  सुद्धा प्रेमाने गोंजारत …आपलंस  करावं लागतं.

संघर्ष हा असतोच. पण  संघर्षा नंतर मिळणार  सौख्य हि  तितकंच परिस मोल ठरतं हे हि खरं…-  संकेत – ०६.१२.२०१५

मनातले काही #18

काही व्यक्तींचं प्रेम मला , हाताच्या तळव्यावर विसावलेल्या त्या सुंदर , नाजूक अन रंगवेड्या  फ़ुलपाखरावाणी  वाटतं. ते नकळत कुठून कसं विसावतं  आपल्या हाती..ते आपल्यालाही कळून येत नाही .पण ते येतं ते आनंदी बहार घेऊन , विसावतं… प्रेमाचे अगणित क्षण देऊन अन तसंच  निघून हि जातं.  प्रेमरंगाचे सदाबहार, कधी हि न पुसता येणारे पण ओलीव असे ठसे उमटवून…– संकेत पाटेकर ०३.१२.२०१५

मनातले काही #19

हक्काने रागवायला देखील एक मर्यादा असते रे .. . त्या मर्यादे पर्यंत माफ असतं सगळ. जुळवून घेता येतं पुन्हा, कारण तिथपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीच्या स्वभावाची किनार ठाऊक असते . पण ती किनार , ती मर्यादा एकदा का ओलांडली कि मग नातं हि डगमगू लागतं. मनं दुभागलं जातं . अन ‘सावर रे मना ..सावर रे ‘ अशी आर्त हाक आपलीच …आपल्याला ऐकू येते.-  संकेत पाटेकर – ०१.१२.२०१५

मनातले काही #20

पाहिलेली अन रंगवलेली  सारीच स्वप्नं  पूर्ण होतातच असे  नाही.  काही स्वप्नं हि  मृगजळासारखी असतात . तहानेने व्याकुळलं  आपलं मन , प्रयत्नाची शर्त करतं.. धावत पळत सुटतं खर…त्या मृगजळामागे. पण जेव्हा दमून भागून आपण तिथवर पोहचतो तेंव्हा कळतं .. कि तो सगळा भास होता. निव्वळ भास ….बाकी काही नाही. – संकेत पाटेकर – २६.११.२०१५

मनातले काही #21

नात्यात ‘संवादा’ इतकाच ‘सहवास’ हि महत्वाचा असतो.  खरं  तर सहवासातूनच नातं उलगडतं. खुलतं  – झुलतं अन पूर्णत्वेला  पोहचतं . सहवासातूनच  मौनाची भाषा  उमगते , मनाची अंतरंग उलगडली जातात . नजरेतल्या छुप्या भावना  शब्दाविना उमलल्या जातात . तर ओठी आलेल्या शब्दांना कोमलतेची धार चढली जाते.

स्पर्शाची  उब तर त्याहुनी निराळी. जन्मोजन्मीचं सार्थक होवून जातं . नात्यात आपलेपणाचा ओलावा आणि त्यातला गोडवा  कायम   टिकून राहतो.  शब्दांची लाडीकता विश्वासानं  आणि खट्याळपणे झुळझुळू लागते.  म्हणून सहवास हवाच …मग तो क्षणभराचा का असो , त्याशिवाय नात्याला बहार कसली ..???

– संकेत य पाटेकर -२४.११.२०१५

मनातले काही #22

कुणासाठी काही देता आलं नाही तरी चालेल..,अक्कलहुषारीने अगदीच ‘ढ’ असलो तरी चालेल, पण हसण्याचं इवलसं निमित्त जरी झालो कुणा- एखाद्यासाठी , तरीही आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं आहे.
– संकेत

मनातले काही #23

प्रेमाचं स्वरूप जरी तेच असलं तरी ..प्रत्येक Love Story हि वेगळी असते . – संकेत ​​

प्रेमाचं स्वरूप जरी तेच असलं तरी ..प्रत्येक Love Story हि वेगळी असते .​

अपेक्षा ..

आपल्या माणसांकडूनच आपण अपेक्षा फार ठेवतो . आणि तेच कारण असतं काहीवेळेस असलेल्या विश्वासाला तडा जाण्याचं… त्याच दोष मात्र आपण सर्वस्वी समोरच्याला देऊन मोकळे हि होतो लगेच…पण खरी चूक हि आपलीच असते. कारण अपेक्षा ठेवणारे आपले आपणच असतो.

अपेक्षा ह्या आपल्या माणसांकडूनच नाही कराव्यात तर कुणा कडून कराव्यात हा ? हा प्रश्न देखील लगेच उद्भवणारच ……पण त्या प्रश्नाचं उत्तर देखील तयार असत..

अपेक्षा ह्या असाव्यात …पण फार नसाव्यात. ज्या आहेत त्या समोरच्याकडून पूर्ण होत नसेल तरी त्याच दुःख नसावं . कारण समोरचा त्याच्या वतीने पूर्णपणे प्रयत्नशील असतो, जर त्याच्या तुमच्यावर अगदी जीवापाड प्रेम असेल. तुमच्यावर विश्वास असेल तर..

पण प्रत्येक वेळीस त्याच्या प्रयत्नांना यश येइलच असंही नाही .त्यामुळे आपल्या माणसांकडून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तरी त्याची खंत मनी नसावी . नाहीतर जीवन जगण असह्य होईल .

आपल्या जशा अपेक्षा असतात , तशा समोरील व्यक्ती कडून हि असतात, हे हि लक्षात ठेवावं . पण अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तरी त्याच दुखं नसावं …..अन त्यासाठी कधी कुणाचा विश्वास तोडू नये. कारण तुटलेला विश्व्वास पुन्हा मिळवण , जुळवण खूप अवघड असत.

– संकेत य पाटेकर

०९.०७.२०१३.

मनातले काही #25

तारुण्य

तारुण्य-तरुणपण हि अशी स्थिती आहे  जिथे घरातील जबाबदारयान सोबत  घरा बाहेरील येणाऱ्या जबाबदाऱ्यांच तसेच समस्यांचं,  अडचणींच, प्रेम,  नातं,  नात्यातील भावनिक गुंत्यांच अशा अनेकानेक गोष्टींच भार मनावर एकाच वेळी दडल जातं.

अशा वेळेस मनाचा संतुलन बिघडण्याची शक्यता हि नाकरता येत नाही . पण अशा हि परिस्थितीतून , ह्या साऱ्या गोष्टीतून जो स्वतःला सावरतो …..व्यवस्थित सार हाताळून जो पुढे जातो तो आयुष्यात यशस्वी होतो .

– संकेत य पाटेकर

मनातले काही #26

जगावं तर ह्या पावसा सारखं..

जगावं तर ह्या पावसा सारखं.. कुणी काहीही बोलो,  त्याला हवं तेंव्हा तो बरसतो.  हवं तेंव्हा येतो. हवं तेंव्हा निघून जातो.  कुणी त्याला चांगलं म्हणत, तर कुणी शिव्या शाप देतं. पण तरीही तो सर्वांना हवा असतो.  त्याच्या असण्यातच बऱ्याच गोष्टी सामावलेल्या असतात.

म्हणून… जगावं तर ह्या पावसा सारखं… कुणी कितीही काहीही बोलो,  आपल्यापरीने आपण जगायचं. पण जगता जगता ह्या पावसा सारखं तो जसा सर्वांना हवा असतो तसं आपण ही सर्वांना हवे असू असंच काहीतरी करत राहायचं.

– संकेत य पाटेकर

मनातले काही #27

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची

काही नाती हि फक्त दोन अक्षांरा पुरतीच मर्यादित असतात.  त्यात आपलेपण हा नसतोच. साध्या – छोट्या अपेक्षा हि जिथे पूर्ण करता येत नाहीत ते नातं कसल ते असूनही मृत असल्यासारखंच.

खर तर अपेक्षा ह्या करूच नये.  पण पण साध्या छोट्या अपेक्षा हि करू नये का ? बर ह्या अपेक्षा हि कुणाकडून हि नसतात,  त्या आपल्याच माणसांकडून असतात.  पण त्या हि काही वेळा पूर्ण होत नाही. अशा वेळेस थोडस निराशपण येतंच  पण म्हणून त्या व्यक्तीला दोष देण हि योग्य नाही . जे नशिबात आहे ते आहे.  पण तरी हि …

काही सेकंदासाठी का होईना आपल्या व्यक्ती साठी आपल्या बिझी शेड्युल्ड मधून थोडा वेळ हा काढावा. ५ मिनिट का होईना थोडं बोलाव,  कधीतरी भेटाव,  मी म्हणत नाही वारंवार फोनवरच राहावं. प्रत्येकवेळी भेटाव – भेटत राहावं. पण कधी तरी ..केव्हातरी … या इवल्याश्या मनाला दिलासा …

खर तर …

एकमेकांच एकमेकांवर मनापासून प्रेम असेल एकमेकांविषयी ”आपलेपणाची” भावना दृढ असेल आणि जिथे सामंज्यस पणाची जाणीव असेल तेच नातं खरया अर्थानं ”विश्वासाचं नातं’ असत. आणि त्या नात्यात प्रसन्नतेच तेज कायम झळाळत राहत.

अहोsss नाती आहेत म्हणून आपण आहोत. आपण आहोत म्हणून आपलेपण आहे. एकमेकांवर प्रेम आहे .

संकेत य पाटेकर

१६.०९.२०१३

मनातले काही #28

जेंव्हा आपण काहीच नसतो ..

जेंव्हा आपण काहीच नसतो तेंव्हा आपल्याला कुणी विचारात घेत नाही.

जेंव्हा आपण काहीतरी असतो तेंव्हा लोक स्वताहून आपली विचारपूस करतात, जवळीक साधतात.

आयुष्य हे असं … कुठल्यातरी एका वळणावरती, पाउल वाटेवरती आपल्याला समजून घेणार, आपलं ऐकणार कुणी एक नसतं. तेंव्हा त्या वळणावर त्या वाटेवर स्वतःला सावरतंच आपल्याला पुढे याव लागतं.

ज्या गोष्टींची ज्यावेळेस खरी गरज असते ती गोष्ट वेळेवर मिळतेच अस नाही. काही वेळा गरजेची ती खरी वेळ निघून जाते. आणि आपण मात्र अनुभवाने शहाणे होतो.

– संकेत

०३.१०.२०१३

मनातले काही #29

आयुष्य क्षणभंगुर आहे. 
कुणास ठाऊक आज आहे तर हे उद्या नसेन कदाचित, बस्स प्रेमाने जगत आलो.
प्रेमाने जगत राहीन.

प्रयत्नांची पराकाष्टा करेन….
जुळविलेल्या नात्यातील बंध कायम तसच ठेविण्यासाठी.
भले हि ..कुणी मला आपलं म्हणो अथवा नाही.

आयुष्यात नाती मला महत्वाची वाटतात.
अन ती टिकविण्यासाठी मनाची धडपड सतत चालू असते.
कुणी रागावतं कुणी आपलं असूनही दुर्लक्ष करतं.
तरी हि मन म्हणत.. जावू दे रे ..आपलेच आहेत ना …त्यांना किंमत नाही पण तुला तर आहे ना ….एक सच्चा माणूस व्हायचं आहे , प्रेमाने हे जीवन फुलवायचं आहे ….बस्स……. !जीवन व्यर्थ घालवायच नाही त्याला अर्थ आणायचं आहे .

संकेत य पाटेकर
०२.०१.२०१४

Leave a Reply

Your email address will not be published.