प्रतिबिंब..

सहज रे, दृष्टी अन सृष्टीचे हे खेळ आहेत. त्याला बस्स.. आपल्या मनातले भावरंग हळूच जोडायचे इतकंच… अच्छा … ! हं ..!! मग काय आहे त्या दोघांत, मैत्रीतलं प्रेम कि प्रेमातली मैत्री ? दोन्ही हि……. कसं ? मैत्री शिवाय प्रेम नाही अन प्रेमाशिवाय हि मैत्री. दोघांत हि बघ, मैलोच अंतर आहे. पण तरीही ..ते दोघे एकमेकांशी हे प्रेमाचं नातं टिकून आहे. आजही.. अद्यापही...!! मनातलं हे (एकमेकांचं ) ‘प्रतिबिंब’ जपता आलं पाहिजे रेss …आयुष्यभर..!

प्रेम हे..

प्रेम हि भावनाच अगं ! सौंदर्यपूर्ण अशी आहे. मनाच्या डोहीतून अलवार तरळणारी, हळुवार उमळणारी अन दोन हृदयी मनाला एकाच जाणीवेच्या स्पंदनिय धाग्यानं घट्ट रोवून ठेवणारी. मध्यंतरीच कुठेसी माझ्या एक वाचनात आलेलं, संद्दीप खरेची एक ओळ होती. ”आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे, याला प्रेम म्हणतात”.

प्रवाह..

सहवासात घडतात म्हणतात मन .. पण तरीही का बिथरतात हि मन ? कठीण आहे बुवा.. हे मनाचं सारं प्रकरण.. कळतं असतं पण जुळवून घेत नाही. हृदयातले भाव ओठावर येऊ देतं नाही..? मन कि बात समजेलच कशी मग ? मनात जागा निर्माण व्हायला ‘सहवास’ आणि त्याचबरोबर ‘संवाद’ लागतो. आणि संवादाचं हे हसरं अंकुर हृदयाशी रुजलं कि प्रेमाचं बीज फळफळायला वेळ लागतं नाही.

‘संवाद’ हरवलेलं नातं

हि नाती खरंच अनमोल असतात ओ .. अन हा अनमोलपणा आणि त्यातला आपलेपणा प्रत्येकाला जपायला हवा . असो , शेवटी मनापासून म्हणावेस वाटतं , कि… ‘संवाद’ हरवलेलं नातं नको… ‘संवादा’त हरवलेलं नातं हवं. … आपलेपणानं मुरलेलं ..!

ती मी आणि हा …बेधुंद पाऊस

मातीला मायेचा कोंब फुटला. मृदगंध आसमंती झाला . हिरविशार सृष्टी.. साज शृंगारात नटू- धटू लागली. डोंगर दऱ्या सुखावू लागल्या . जलप्रपातांचा तर अगणित सोहळाच सुरू झाला . लहान सहान भावंडं (धबधबे ) मिळून खेळ रंगवू लागली . आभाळी , इंद्रधनू ने हि आपलं सप्तरंग उधळायला सुरवात केली . दिशा दिशा त्यानं मोहित संचित झाल्या. आनंद कैकपटणे वाढीस लागला . वाढीत व्होता कारण पाऊस जो सुरु झाला होता. पाऊस , हृदयी ठाव घेणारा… पाऊस आनंदी आनंद मिळवून देणारा ..

दुरावा .. प्रेम आणि नातं

काय ssss रे ? इतकं काय झालं ? गहिवरून आल्यासारखं बोलतोयस आज ? देहभान हरपलेल्या..त्या स्तंभित नजरेकडे..काहीसं खट्याळतेने पाहत ती पुटपुटली. तिच्या ह्या बोलण्याने क्षणभर शांतमय पडसात उमटले गेले. कुणी काहीच बोललं नाही. दिशा मात्र अधीरतेने एकजूट झाल्या सारख्या वागू लागल्या. वाऱ्यानं हि मुद्दाम आपला वेग मंदावला आणि तितक्याच त्याने आपली नजर हळूच तिच्याकडे वळवून.. तिच्या नजरेतल्या भाव सागराचे टिपणे घेत.. सौम्यतेने म्हटले, त्याचं कारण तुला सांगायला हवं का ? आणि ते हि तू बाजूला असताना ?

” सहवास.. तुझा माझा “

‘प्रेम हे जीवनाचं स्वरूप आहे ..’ मीराsss ‘ आणि ‘त्याग’ हा त्याचा मूळ..’ माणसाचं आपल्या आयुष्यात येणं ‘ जवळीक साधणं आणि परस्पर निघून जाणं ‘ हे नियतीनेच आखून दिलेलं संकेत आहेत. आपलं मनोधैर्य आणि मनोबळ वाढविण्याचं… कळतंय ? समज ही आपली पूर्वपरीक्षा आहे. पुढच्या क्षणाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी.. मिळालेला हा एक नवा अनुभव , नवा अध्याय..ज्याचं मोल कधीही वाया जाणार नाही. बोलता बोलता तो शांत झाला. डोळ्यावरची कड मात्र भावनेने ओथंबून गेली होती. मनात असंख्य तंरग उमटत होते.

कितीदा नव्याने तुला आठवावे

” कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे..” भरल्या नजरेनं त्यानं आपल्या बाजूच्या रिकाम्या सीटकडे पुन्हा एकटक पाहिलं आणि तो पुन्हा आठवणीत गढून गेला… प्रेमानं… एव्हाना त्याला, वेदनेला कसं थोपवावं आणि जगावं ते शिकवलं होतं.

माणूस आहे …तो चुकणारच..

माणूस आपल्या माणसाशिवाय अन त्याच्या प्रेमाशिवाय जगू शकत नाही. त्याला आपलीच माणसं जवळ लागतात. प्रसंगी त्याला समजून घेणारी प्रसंगी समजून देणारी …! इथे मंगेश पाडगावकरांच्या काही ओळी आठवतात . प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं, प्रेम कधी भांडतंसुद्धा !!

तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे..

म्हणावं तर प्रत्येकाच्या आयुष्यात असे ‘क्षण’ येतात आणि येत राहतात. जिथे निर्णय घेणं ..हे आव्हान असतं. कसोटी असते. त्याचा होणारा चांगला वाईट परिणाम हे त्या एका निर्णयावर अवलंबून असतं. पण वेळेत निर्णय घेणं हि तितकंच महत्वाचं असतं. तो हि त्याचं डोहात आता पहुडला होता. निर्णयावर येऊन पोहचला होता.

Rich Dry Fruit Chocolate Box

Leave a Reply

Your email address will not be published.