Recent Post

जीवन गाणे..

” आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं. आयुष्याचा महोत्सव करायचा असतो “ शेवटी प्रत्येक अवस्था ह्या जगण्यासाठी असतात.बालपण असो, तरुणपण असो.. इथे कणकण जगणं महत्वाचं. आत्ताचा आनंद महत्वाचा, आत्ता चा क्षण महत्वाचा, उद्याच्या स्वप्नांसाठी .. कळतंय ना रे ? उठ .. कणकण जगून घे एकेक क्षण , थांबायचं नाही कुठे. चालत राहायचं. आनंदाची वहिवाट शोधत.. – संकेत पाटेकर

दिलखुलास’

नात्यातला ‘दुवा’ म्हणजेच हा ‘संवाद’ आपण तो योग्य पद्धीतीने कसा साधतो, त्यावरच नात्याची वीण हि जुळली जाते. सांगायचंय कायssss … संवाद असू द्यावा…पण आत्मप्रेमळ .. 🙂 सहज असा …दिलखुलास.

Let’s Enjoy..

'संयम ठेव रे बाबा, उगाच अस्थिर होऊ नकोस. प्रश्नाच्या जाळ्यात अजिबात फसू नकोस ? हे अविचारांचं जाळं आधी क्षणात मिटवून टाक. निश्चिंत राहा. मन आभाळी ठेव. येणारी योग्य वेळच तुला सारं काही मिळवून देईल. Lets Enjoy this Moment... क्षणांचा महोत्सव करता आला पाहिजे.

प्रिय आई …

तुझ्या उबदार कुशीत शांतपणे निजायच आहे अगं..! कष्टाने झिजलेल्या तुझ्या नाजूक कोमल हाताचा, मायेभरला स्पर्शहळुवार केसांतून भिरभिरताना ..किती बर वाटायचं सांगू… ते क्षण आठवले कि आजही ममत्वेने भरलेला तो तुझा हात , अलगद केसातून भिरभिरत राहतो . किती सौख्य आहे अगं , त्या स्पर्शात. सुखाची व्याख्या ह्यावूनी वेगळी करता येईल का ? ‘मायेचा स्पर्श’ सगळे क्षण कसे हलके फुलके बनवितात , न्हाई ? वेदना दुखांना तिथे अजिबात थारा नाही. एखादी भळभळती जखम सुद्धा ‘आनंदाचे गायन’ करत चिडीचूप होईल इतकं अफाट सामर्थ्य , इतकं प्रेम त्या मायेभरल्या स्पर्शात असतं.

’ती’ एक ग्रेट भेट..

चेहऱयाशी हास्य खिळवून, इतरांचं जगणं अन जीवन हास्यगंधीत करणाऱ्या एखाद्याचं आयुष्य आतून किती दुखीव वेदनांनी जखमी असतं. ते हि आज जवळून पाहिलं. किती वेदना, किती संघर्ष, किती त्या ओल्या जखमा..अंगभर झेलुनही फुटणाऱ्या आसवांना आत दडून ठेवण्याचं, हसण्याचं अन हसवण्याचा सामर्थ्य ह्या लोकांत असतं. त्यांचे अनुभवी बोल.. शब्द नि शब्द म्हणजे प्रेरित जलसागर असतं.

ग्रेट भेट : साहित्यिक अन कवी सूर्यकांत मालुसरे आणि माई

” कुठलीही स्त्री असो. ती वात्सल्यमूर्ती असते. मायेचा अथांग पान्हा…. ” काल कसं कुणास माहित नाही त्यांना पाहिलं आणि आतून एकच कंठ फुटला. ‘माई’ कधी भेटलो नाही. कधी पाहिलं नाही. बंद कवाड हळूच उघडत , पुढे ढकलत त्या उंबरठा ओलांडून आत आल्या आणि कुठलंसं नातं जन्मोजन्मीचं असं क्षणात घट्ट रुजल्यासारखं झालं.

क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं ..

काय रेssss ह्या मोबाईलसाठी इतका धावत पळत आलास तो..इतक्या लांब पुन्हा.. ठेवला असता ड्रॉवर मध्ये…, एका दिवसाने काय फरक पडला असता ? मी क्षणभर हसलो. कधीतरी कुठेशी वाचनात आलेल्या त्या ओळी पटकन ओठी स्थिरावल्या. खुद से ज्यादा संभालकर रखता हूं मोबाइल अपना, क्योंकि रिश्ते सारे अब इसी मै कैद है । माझंच मी हसलो अन चालू पडलो.. घराच्या दिशेने..

बा’चा बाsssची…

अवघा क्षणाचा प्रवास, रम्य कधी रटाळ हि असेल पण हे लोक बेरंग करून टाकतात . कुणी ऐकून घेत नाही अन समजून हि घेत नाही .अन हे थांबावं म्हणून बघणारे सुद्धा पुढे येत नाही . ते फक्त बघ्याची भूमिका घेतात. येणारे येऊ पाहतात पुढे . पण त्याना हि जागीच अडवलं जात . कशाला नुस्कारण मध्ये पडतोयस ? ते ऐकणार नाहीत अस बोलून गप्प बसवलं जातं . अन पुढे जे घडणार तेच घडतं .

आठवणींचा झुला..

भांडुपला आलो कि हे असं होतं. भटकतं मन…आठवणीच्या झुल्यात.. शेवटी जन्मस्थळ ते माझं. बालपण गेलेलं.

आयुष्यं खरंच ..सुंदर आहे.

तू डगमगू नकोस.. जी काही परिस्थिती तुझ्यावर आता ओढवलेयं, तिला धीटपणे सामोरं जा, संयम राख. योग्य अयोग्यचा सारासार विचार कर, पण वेळ दवडू नकोस, स्वतःचं कौशल्य पणाला लाव, मेहनत घे , ही परिस्थिती ही तुझ्यापुढं झुकल्याशिवाय राहणार नाही. अरे, माणसाकडून तिला हेच हवं असतं. एखाद्या तट बुरुजाप्रमाणे..तटस्थ..संयमी, मुत्सद्दी आणि लढाऊपण असलेली वृत्ती…, सातत्य राखणारी.. कळतंय ना…? स्वतःला उभं करायला शिक.. आयुष्यं खरंच.. फार सुंदर आहे...

वाचकांना आवडलेल्या पोस्ट

Leave a Reply

Your email address will not be published.