मनातले काही .. – भाग १

मनातले काही .. – भाग १


जिथे मी पण संपतो  तिथूनच प्रेमाची हद्द सुरु होते . 

– संकेत 
————————————————————–
प्रसंगी  ‘समजून घेताना आणि समजून देताना’ आपण कुठेशी कमी पडतो,  इतकंच काय ते.. 
आपलेपणातून जुळलेल्या नात्याला तडा जाण्याचं एकमेव कारण.. 
बाकी ‘आयुष्यं’ म्हणाल तर ते ‘वाऱ्याच्या सुखद अश्या झुळकीप्रमाणे’ आहे. मनाचं अंतर्बाह्य रंग उधळून देणारं…
कळतंय ना ? 
उगाच (संकेत )  

————————————————————–
विषयांची व्याप्ती फार मोठी आहे . विषय अनेक आहेत. त्यांची कुठेच कमी नाही. फक्त आपल्या संकुचित अन चौकटीतल्या त्याच त्याच विचारांना , त्या चौकटीतून बाहेर काढून , त्या नव्या विषयांशी कुठेशी जोडता आलं पाहिजे.
तेवढं एक जमलं ना कि झालं ..नवी दिशा अन नवं क्षितिज नजरेसमोर उभं आहेच…
शिवधनुष्य पेलायला.
– चौकटीबाहेरच्या विचारधारेत
– संकेत
————————————————————–
गुणा दोषासहित जिथे समीकरण जुळतं वा स्वीकारलं जातं तिथेच खऱ्या अर्थानं, मला वाटतं..
आपलेपणाचं नातं खळखळत राहतं. – संकेत
————————————————————–
प्रेम आंधळं नसतं रे . माणसाचे विचार अन पाहण्याची दृष्टी काही वेळ अंधुक होते . 
व्यक्तीच्या त्या जिव्हाळीक नात्यापायी म्हण किंव्हा तिच्या ओढीने म्हण , घडतं ते . आणि ते सह्ज आणि साहजिकच आहे. त्यावर तू दोष आरोप ठेवू नकोस. कारण ह्याची दुसरी ही बाजू आहे .
ह्यातूनच , भावनांच्या संमिश्र जलधारेतून निथळलेल्या जीवनपयोगी प्रकाश वाटा धुंडाळल्या जातात. 
किंव्हा आपल्याशी त्या जोडल्या जातात.
योग्यतेकडे नेणाऱ्या … 
म्हणूनच मी म्हणतो माणसांन नां , एकदा प्रेम करावं . अगदी सर्वस्व वाहून …..
आणि सर्वस्वी मनाची वाहून घेण्याची क्षमता ठेवून ….
कारण प्रेम म्हटलं की तिथे ओघाने वेदना ही आल्याचं आणि त्या वेदना वाहून घेण्याची क्षमता ही हवीच आपल्यात . 
तरच प्रेमाला अर्थ .नाहीतर सुडाची भावना पेटली की खल्लास …. ! 
त्याला प्रेम म्हणता येत नाही .
~ संकेत – 30.06.2016
————————————————————–
आपण फ़क्त प्रेम करायचं..रे ,
आपलेपणाच्या ओलिवतेनं ,अन् मार्गीस्त होतं जायचं , आपल्या प्रवास वाटेने,
आनंदाचे परीनिर्मळ हास्य, अंन त्यातला सुगंधित दर्प  समीप येणाऱ्या आतंरिक चेहरयांवरती त्याच सुवासिकतेने झळकावतं…हेच आपलं इति कर्तव्य.. आपला धर्म आणि आपल्या जगण्यातील दिशा …
कळतयं का ? काय म्हणायच् ते..
प्रेम कर , पण तू तुझ्या मनातील अपेक्षांचा पेला रीता होऊ देऊ नकोस, अन् उतू ही जाऊ देऊ नकोस.  स्थिर रहा,
मनाच्या तळाशी  असलेला जाणिवांचा भावगंध  कायम  राखून…
हितगुज मनाशी… 
संकेत – ०६/०६/२०१६
————————————————————–
उन्हाच्या झळीने काटोकाठ भरलेलं तळ देखील हळुवार कोरडं होतं जातं रे …
आपल्या मनात तळ साचून असलेल्या अपेक्षांचं देखील असंच काहीस आहे.
दुर्लक्षितपणाची , दाहक झळ त्या तळ्यापर्यंत सातत्याने पोहचत राहिली कि त्याचं हि बाष्पीभवन होतं . 
आणि साचलेल्या अपेक्षांचं तळ हळूच निकामी होतं जातं . 
त्या तळ्याशी मग संवेदना उरत नाही. उरतो तो केवळ कोरडेपण … अतृप्ततेचा… अपूर्णतेचा ..

तुज हि असंच काहीस झालं आहे बघ…
तिच्या मनाचे दार तुने कित्येकदा ठोठावले. प्रयत्नाची शर्थ केलीस ..करत राहिलास. तिने पुन्हा माघारी यावं म्हणून …..
आशेचा दीप सतत तेवत ठेवत . पण अखेर काय..प्रतिक्रिया शून्य . तू त्यामुळे रुडावला आहेस..
एक लक्षात घे …, आपलेपणाचा पाऊस अवचित का होईना , येतोच रे कधी.
तेंव्हा निवांत हो अगदी…
तुझ्या मनातल्या तळ्याला तो आपलेपणाचा स्पर्श झाला कि तू पुन्हा आनंदून बागडशील..
असंच वेडवाकड ..काहीसं सुचलेलं .
मनातलं काही ..
– संकेत पाटेकर – २३.०५.२०१६
————————————————————–
‘समर्पणा’ ची व्याख्या शिकायची असेल तर ती एखाद बहरलेल्या किंव्हा पानां गळलेल्या वृक्षाकडूनच शिकून घावी अथवा समजून घ्यावी. म्हणजे पार त्याच्या शेंड्यापासून …
ते थेट बुंध्यापर्यंत वा मुळापर्यंत.., असंख्य अगणित असे जीव त्यावर आधार करून राहतात. 
आपलं आयुष्य सुंदरतेने विणत ….. तरीही ते ‘स्थिर मन ‘ …हा कि हु करत नाही. वा स्वार्थ भाव राखत नाही .

वेदनेचे कुऱ्हांडी घाव पडले तरी, ” ते देणं आणि केवळ देत राहाणं ” हेच जाणतं आणि हाच त्याचा स्थायी भाव वा कर्म …
.ते हि ते निष्ठेने पार पाडत अगदी……..
आपलं अस्तित्व पुसून जाईपर्यंत ….
– संकेत – १७.०४.२०१६
————————————————————–
प्रेम हे मनाच्या अंत करणातून उमटायला हवं …
————————————————————–
चुकांचा खेळ कधी मांडू नये ….
पण दिल्या गेलेल्या अनमोल क्षणांना तेवढ कवटाळून घ्यावं. हे क्षणच खूप महत्वाचे असतात . आयुष्यभर पुरतात .
दोष तर सर्वत्र आहेत . सर्वांत आहेत . राजहंस सारखं हवं तेच फक्त वेचायच असतं .बस्स… smile emoticon
– संकेत पाटेकर
२०.१२.२०१५
————————————————————–
जितक्या सहजतेने आपण एखाद गोष्टीमध्ये गुंतलो जातो ना, तितक्याच सहजतेने त्याच गोष्टीतून बाहेर पडणं देखील जमायला हवं. . हे एकदा जमलं ना , कि मग बघ..हे आयुष्य हि अगदी सहज सोपं आहे.
– संकेत य पाटेकर -१९.१२.२०१५ 
————————————————————–
घडणाऱ्या घटना घडून जातात रे , उदासिनतेचा गहिरा रंग उफाळून  पण  अस असूनही  काहीवेळा जे घडलं. 
किंव्हा घडतंय त्यावर  विश्वास मात्र बसत नाही . मनाची एक बाजू अजूनही कुठेशी आशेचा दीप घेत खुणावत असते. 
काहीतरी नक्कीच मनाजोग घडेल. – संकेत १८.१२.२०१५
————————————————————–
चूक तुझी कि माझी हे तितकसं  महत्वाचं नाही . 
महत्वाचं आहे ते ,  ती चूक,  कोण आधी क्षमाशील मनानं  माफ करतंय ते ..खरं  तर त्यावरच  त्या व्यक्तीच्या  मनाची अन प्रेमाची व्याप्ती कळते .  
– संकेत -१७.१२.२०१५ 
————————————————————–
खूप म्हटलं होतं स्वतःशीच, प्रेमाने हे जग जिंकेन म्हणून…मात्र आता कळतंय खरं..
इथे एका व्यक्तीचच मन जिंकन खूप कठीण जातंय ..तिथे जगाचं तू काय घेऊन बसलायस रे…..
-संकेत १७.१२.२०१५ 
————————————————————–
कुणावर प्रेम करायचं तर मनापासून प्रेम करा…..हरलो तरी चालेल..पण प्रेम मात्र खरं हवं.
-संकेत
————————————————————–
सगळेच प्रश्न एकट्यानेच सुटत नाही..रे .काही वेळा समोरच्याचा हि तितकाच त्यात सहभाग असावा लागतो . तर तो प्रश्न कुठेसा हाताळता येतो. वा सुटतो. तर काही वेळा सगळ वेळेच्या अधीन करावं लागतं ..एखाद्याला कितीही समजावून सांगितलं वा समजून घेतलं तरी हि..

नाती मुळात का विस्कटतात माहित आहे ? ती योग्य वेळ साधली जात नाही म्हणून ..योग्य वेळी योग्य ते साधून सावरायचं असतं, स्वतःला हि अन सैल पडत जाणऱ्या किंव्हा तुटू पाहणाऱ्या त्या नात्याच्या रेशीम दोरीला हि , वेळ टळून गेल्यावर ..काही एक उपयोग नसतो …..

मुळात काय तर एकेमकांना सांभाळून घेण हे महत्वाच…
एकाने सावरून घ्यायला सुरवात केली ना, कि दुसऱ्यानं हि अधिक वेळ न दवडता . स्वतःला सावरून घेण आवश्यक असतं .अन मला वाटतं अशीच नाती हि कायम चिरतरुण ठरतात अन असतात.
नातं सांभाळायचं वा कायम चिरतरुण ठेवायचं असेल तर हे साधनं आलंच ..सखे , जमायला हवं. 
अस माझं मत आहे. 
कुणासाठी काहीतरी …
– संकेत १४.१२.२०१५ 
————————————————————–
अवघड गोष्टी मिळविण्यासाठीच खूप  प्रयास करावे लागतात. 
मग ध्यास घेतलेल्या त्या अवघड यादीत  प्रेम असो ..वा ती प्रेमाची व्यक्ती ….
सहज अस काहीच नसतं . मिळवावं लागतं. प्रयत्नांची शर्थ करत ..स्वतःला त्यात झोकावून  द्यावं लागतं. प्रसंगी  उठावनारया   वेदनांना  सुद्धा प्रेमाने गोंजारत …आपलंस  करावं लागतं.   
संघर्ष हा असतोच. पण  संघर्षा नंतर मिळणार  सौख्य हि  तितकंच परिस मोल ठरतं हे हि खरं   
–  संकेत – ०६.१२.२०१५ 
————————————————————–
काही व्यक्तींचं प्रेम मला , हाताच्या तळव्यावर विसावलेल्या त्या सुंदर , नाजूक अन रंगवेड्या  फ़ुलपाखरावाणी  वाटतं. ते नकळत कुठून कसं विसावतं  आपल्या हाती..ते आपल्यालाही कळून येत नाही .
पण ते येतं ते आनंदी बहार घेऊन , विसावतं… प्रेमाचे अगणित क्षण देऊन अन तसंच  निघून हि जातं.  
प्रेमरंगाचे सदाबहार, कधी हि न पुसता येणारे पण ओलीव असे ठसे उमटवून…
– संकेत पाटेकर ०३.१२.२०१५ 
————————————————————–
हक्काने रागवायला देखील एक मर्यादा असते रे .. . त्या मर्यादे पर्यंत माफ असतं सगळ. 
जुळवून घेता येतं पुन्हा, कारण तिथपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीच्या स्वभावाची किनार ठाऊक असते . 
पण ती किनार , ती मर्यादा एकदा का ओलांडली कि मग नातं हि डगमगू लागतं. मनं दुभागलं जातं . 
अन ‘सावर रे मना ..सावर रे ‘ अशी आर्त हाक आपलीच …आपल्याला ऐकू येते.
– मनातलं काही
संकेत पाटेकर – ०१.१२.२०१५
————————————————————–
पाहिलेली अन रंगवलेली  सारीच स्वप्नं  पूर्ण होतातच असे  नाही.  काही स्वप्नं हि  मृगजळासारखी असतात . 
तहानेने व्याकुळलं  आपलं मन , प्रयत्नाची शर्त करतं.. धावत पळत सुटतं खर…
त्या मृगजळामागे. पण जेव्हा दमून भागून आपण तिथवर पोहचतो तेंव्हा कळतं .. कि तो सगळा भास होता. 
निव्वळ भास ….बाकी काही नाही. 
– संकेत पाटेकर – २६.११.२०१५ 
————————————————————–
नात्यात ‘संवादा’ इतकाच ‘सहवास’ हि महत्वाचा असतो, खरं  तर सहवासातूनच नातं उलगडतं , खुलूनं  झुलतं अन पूर्णत्वेला  पोहचतं . सहवासातूनच  मौनाची भाषा  उमगते , अंतरंग उलगडली जातात . 
नजरेतल्या छुप्या भावना हि शब्दाविना उमलल्या जातात . 
तर ओठी आलेल्या शब्दांना कोमलतेची धार चढली जाते.  स्पर्शाची  उब तर त्याहुनी निराळी. 
जन्मोजन्मीचं सार्थक होवून जातं . नात्यात आपलेपणाचा ओलावा कायम टिकून राहतो.  
शब्दांची लाडीकता विश्वासानं  खट्याळपणे झुळझुळू लागते.  म्हणून सहवास हवाच …
मग तो क्षणभराचा का असो , त्याशिवाय नात्याला बहार कसली ..
मनातले काही …  
संकेत य पाटेकर -२४.११.२०१५ 
————————————————————–
सहवास , विश्वास अन संवाद ह्या तिन्ही गोष्टी सहजतेने वावरू लागल्या कि नातं हि त्याच सहजतेने खुलू लागतं उन्मळू लागतं. बहारलेल्या आसमंत वाटेवर… – संकेत
————————————————————–
दुरावलेली मनं जेंव्हा पुन्हा नव्याने एकत्रित येउन संवाद साधू लागतात . तेंव्हा पहिला प्रश्न असतो . 
ते सुरवात कशी , कुठून अन कुठल्या शब्दानं करावी. कशी आहेस / कसा आहेस हे ठीक असतं…
 पण त्या पुढे …….आपण STOP होतो ..
दोघांनाही बोलायचं असतं . पण नाही बोलता येत. फक्त निशब्दाचे ते क्षण आपण ऐकत असतो . 
स्थिर अन स्तब्ध राहून ..- संकेत
————————————————————–
सूर निरागस हो ..
गाण्यातला सूर जसा निरागस असावा लागतो तसा संवादातला सूर हि निरागस असला म्हणजे नात्याला बहार येते. 
– संकेत
————————————————————–
मनाशी एकवटून ठेवलेल्या भावनांना समजून घेणारं जेंव्हा आपलं अस कुणी पुढे येतं, मायेचा स्पर्श करत जवळ घेतं अन प्रेमाचे दोन एक शब्द तितक्याच अदबीने बोलतं तेंव्हा कुठे मनातला दाह काहीसा कमी होतो.
संकेत – १९.११.२०१५
————————————————————–
लहान मुलांचा निरागस चेहरा अन त्या चेहऱ्यावरून निथललेले मोठेपणाचे निरागस बोल ऐकिले वा पहिले कि वाटतं , यार …आपण अजून हि लहानच आहोत. त्याच्यापुढे …
एक प्रवासी चेहरा – संकेत
————————————————————–
क्षणानुसार आपला मूड बदलत जातो अन मूड नुसार पुन्हा ते क्षण…
-असंच काहीस – संकेत
————————————————————–
प्रेमाचं स्वरूप जरी तेच असलं तरी ..प्रत्येक Love Story हि वेगळी असते . 
– प्रेमगुरु संकेत tongue emoticon
————————————————————–
न बोलण्याने कुठलाच प्रश्न Solve होत नाही . उलट अंतर वाढत जाऊन ..मनाची कोंडीच अधिक होते . 
त्यामुळे मन उघडावं , बोलावं मनमोकळेपणाने ..
– संकेत
————————————————————–
मुळात नाती का तुटतात ? माहिती आहे ? कारण 
एकाने सावरायला घेतलं कि दुसरा सावरण्या ऐवजी तिच गोष्ट अजून ताणून धरतो. 
मी सावरतोय ना , मग तू हि सावरायला हव ना ?कारणं काही असो , पण नाही ..अस होत नाही. हेच कारण.. 
एकत्रित सुखाने नांदणारी दोन मनं अशी अचानक ..एवढ्याश्या कारणाने दुरावतात. 
खर म्हणावं तर ‘नातं’ तुटत नाही . तुटतं ते आपलं ‘मनं’.
अन ते सावरणार अन समजून घेणार ..भेटलं कि ते पुन्हा उभारतं
– संकेत
————————————————————–
आयुष्याच्या ह्या प्रवास वाटेत, आपल्यावर मनापासून प्रेम करणारे, जीव ओवाळणारे अन कोणत्याही परिस्थितीत साथ सोबत न सोडणारे, फारच कमी जण भेटतात. असतात . 
त्यांचा हात अन त्यांची साथ कधी सोडू नका . – संकेत
————————————————————–
मी (आपणही असालच wink emoticon ) पैशाने न्हवे तर मनाच्या श्रीमंतीनुसार माणसं जवळ करतो. कारण तीच खरी असतात . माणूसपण जपणारी माणसे ..! – संकेत wink emoticon
————————————————————–
प्रेमळ मनाची, कोमळत्या हृदयाची , अन पाहताच क्षणी हास्य उजळवनारी, हास्यात मोहून नेणारी …
माणसं आयुष्यात भेटली कि , किंव्हा ती नाती जरी जुळली कि ..आयुष्याला कशी …नवी झळाळी मिळून जाते. 
आयुष्य उजळून निघतं.जगण्याला एक नवा अर्थ प्राप्त होतो . 

नवा समज, नवे विचार वृद्धिंगत होत जातात .सहवासाचा नवा गंध दरवळा जातो . 
त्यातून मनाच्या विश्वासाची दोर सहजतेने ओवली जाते. 
आणि सहजतेतच जीवन सुसह्य अन समृद्ध होवून जातं. 
– संकेत
————————————————————–
माझं हे असं आहे . जे क्षण वाट्याला येतील त्या त्या क्षणात आकंठ घुसळून निघायचं . 
मग तो क्षणभरचा आनंद असो …वा वेदनांचा साठलेला महा सागर ….लोटून द्यायचं स्वतःला…
जगायचं ते एक एक क्षण.!
– संकेत
————————————————————–
एकाकी अस शांत राहून , सारी मनाची कवाडं बंद करून … सगळेच प्रश्न काही सुटत नाहीत . 
उलट काहीवेळा .. त्यातलं ते अंतर वाढत जाऊन , असलेल्या त्या प्रश्नांचाच गुंता अधिकाधिक वाढत जातो. अन त्या गुंत्यात आपण अधिकाधिक ओढले जातो. म्हणून ..वेळीच विचार कर ..अंतर वाढवू देऊ नकोस , असलेला गुंता सोडव … मोकळी हो ..मोकळा श्वास घे ..
नातं तूझं माझं..एक विचार 
– संकेत ०६.११.२०१५
————————————————————–
कुणावर प्रेम करायचं तर …अगदी मनापासून करा …आतल्या कंठानं , स्वतःला झोकावून देऊन अगदी..
————————————————————–
‘अहंभाव’ हा नात्यातला एक फार मोठा ‘अडसर’ आहे . तो मध्ये आला कि दोन मनांमधली झुळझुळनारी  सुसंवादी कवाडं ..आपोआप बंद होतात. – संकेत – ०४.११.२०१५ 
————————————————————–
भीती , लाज (लोक काय म्हणतील ) अन ढासळलेला आत्मविश्वास, काळाच्या पडद्या आड नेउन ठेवतात . – संकेत
————————————————————–
नुसता समजुददारपणा असून नात्याला बहर येत नाही . तर त्यासाठी (खेळकरपणा)खेळकर अन खोडसर वृत्ती wink emoticon हि हवीच . 
– संकेत २४.०९.२०१५
————————————————————–
हव्या त्या सगळ्याच गोष्टी काही मिळत नाही आपल्याला .  तो हि( ईश्वर )  एकदाच काही देत नाही. 
मग ती म्हणायला एखादी वस्तू असो वा  हवी असलेली व्यक्ती  वा त्या व्यक्तीच आपलेपणाचं प्रेम वा  नातं वा इतर काही ..
काही गोष्टींचा शोध हा घ्यावाच  लागतो. किंव्हा  आपल्या नकळत  तो शोध एका टप्प्यावर  पुरा होतो.  
मला वाटतं  तिथेच  पूर्णत्वेला खरा विराम मिळतो.  मन समाधानी पावतं.  
– संकेत २४.०९.२०१५ 
————————————————————–
दोघांचं मन जुळवणारा ..अन नात्याची नाळ प्रेमाने जोडणारा एक ‘समान’ धागा हा असतोच ..
दोघांच्याही स्वभावामध्ये …. , 
बाकी इतर गुण अथवा दोष कितीही भिन्न असो ..हा एक समान धागा नातं अन मन बांधून ठेवतो. 
– संकेत २४.०९.२०१५ 
————————————————————–
अनमोल नातं , त्यातलं प्रेम अन आशीर्वाद हेच खरं तर मोठ धन असतं आयुष्यातलं… 
अन तेच कमवायचं असतं . -संकेत
————————————————————–
आयुष्यातील बरेसचे निणर्य हे ‘हो किंव्हा नाही’ ह्या दोनच गोष्टींवर अवलंबून असतात. आणि असे हे निर्णय घेणं 
अथवा देणं म्हणजे महां कठीण काम ..
कारण ह्या दोन गोष्टींवरच आपल्या आयुष्याची पुढची चाल ठरली जाते,. .
ती चाल योग्य दिशेने ठरली तर आनंदच आनंद , नाही तर क्लेश , वेदना ह्याचा महापूर ..नाहीतर काहीच नाही..
भावनेचा अन दोघा मनाचा खेळ आहे हा…
फारच जपून , समजून उमगून निर्णय घ्यावा लागतो . कारण सहभाग दुसर्या मनाचा हि असतो.
असे निर्णय घेताना ..
मनाचा सयंमीपणा अन काठीन्यता ह्याची खरच कस लागते .. smile emoticon
-संकेत
—————————————————————
घाव देणाऱ्या वेदना सहन करण्याची किंव्हा ते पचवण्याची  मानसिक शक्ती  ज्याकडे असते . 
त्यानेच एखाद्यावर प्रेम करावं.    जीवापाड अगदी..ते हि  आंधळेपणानं केले तरी चालेल . 
कारण तेच  खर खुर प्रेम असत .अगदी आतून उमगलेलं , समजलेलं… समजून घेतलेलं .
नाहीतर उगाच प्रेम प्रेम करणारे बरेच दिसतात . त्यांचीच कुठेशी बातमी येते अधून मधून वर्तमानपत्रातून .. 
प्रेम होत म्हणून ..तिचा जीव घेतला .  वैगरे वगैरे …
ह्याला प्रेम म्हणतात का , छे , अजिबात नाही. म्हणताच येणार नाही. 
कारण प्रेमाची व्याख्याच ‘जीवन’ आहे. 
प्रेम जगायला शिकवतं … . प्रेम जगण  शिकवतं .( भले हि त्यात वेदनेचे घाव असो )
एखाद्याच जीव घेणे नाही . 
अश्याच काही प्रेमाच्या गोष्टी 
– संकेत उर्फ संकु 
०१.०७.२०१५ 
_______________________________________

वेळ निघून जाते .  ती  थांबत नाही कधी  ..
पण आपल्या स्वप्नांचा ओझा मात्र दिवसेंदिवस वाढतच जातो . त्यात अधिकाधिक  भर पडत जाते दिवसेंदिवस ..
त्यातल्या काहीच  गोष्टी साध्य होतात काही गोष्टी होत नाही . कारण हा वेळ अपुरा पडतो …
आयुष्य हे असंच…अवघ्या मोजता येणाऱ्या क्षणा सारखा वाटतो कधी कधी …. आणि आहेच  ते . 
– आपलाच …
  संकेत – २१.०६.२०१५
_______________________________________

‘माणूस’ आतून अन बाहेरून ज्याला पूर्णतः कळला त्याला खऱ्या अर्थाने तो ‘माणूस’ कळला …
अस म्हणायला हरकत नाही . 
– संकेत २१.०६.२०१५
_______________________________________

ज्या नात्यात आपल्या असण्याला (एकमेकांना ) ‘महत्व अन किंमत’ असते .  . 
त्या नात्यातले भेटीचे अथवा  सहवासातले एक एक  क्षण देखील लाखमोलाचे असतात . 
अन ज्या नात्यात , जिथे आपल्या असण्यालाच  काही किंमत नसते .  
ते  नातं हिरमुसल्या कळीसारखं असतं  . जिथे फुलणं म्हणजे  काय तेच माहित नसतं. 
– संकेत 
_______________________________________
यशाची पायरी चढायची असेल तर अपमानाच्या निखाऱ्यातून हि चालत राहण्याची धमक
आपल्या अंगी असावी लागते.
– संकेत
_______________________________________
एखादं कादंबरी वाचताना एकेक पानं जशी उलगडत जावीत. 
अन नेमकेपणाची काही वाक्यच काय ती अधोरेखित व्हावीत .स्मृतीत कायम राहावीत.
तशी काही माणसं असतात ..आपल्या आयुष्यात येणारी..अन कायम स्मरणारी … smile emoticon smile emoticon 
– संकेत
_______________________________________
गोंधलेलं मनं बहुदा रागाच्या बाजूनेच झुकतं . 
– संकेत
_______________________________________
कधी कधी ( बऱ्याचदा ओ ) ह्या मनाची दोलायमान स्थिती होते. अर्ध मन इकडे तर अर्ध मन तिकडे. 
अश्या वेळी नेमक काय करायचं तेच सुचत नाही. अन जेंव्हा अशी स्थिती निर्माण होते, 
तेंव्हा हि ‘वेळ’ निमुटपणे तिच्या पद्धतीने तीच कार्य साधून घेते. wink emoticon 
– संकेत
_______________________________________
संवादात आपलेपणा अन मोकळेपणा असेल तर अन तरच तो ‘संवाद’ समोरच्या मनाला स्पर्श करितो. . 
– संकेत
_______________________________________
काही मोजकीच अशी ‘घरं’ असतात अन त्या घरातील आपलेपणाने जोडलेली गेलेली मनमिळाऊ अन प्रेमळ ‘माणसं’ जिथे आपलं येणं जाणं सतत चालू असत. 
– संकेत
_______________________________________
प्रेमं हे सहवासातून मिळत जातं अन हळू हळू (त्या त्या व्यक्ती च्या स्वभावानुसार smile emoticon) वाढत जातं .
इतकं कि कधी कधी त्यावर आंधळेपनाची पट्टी नकळत बसली जाते.
अन मग काय , पुढे व्ह्यायचं तेच होतं . ठेच लागते. कळवळतं मनं , चाचपडतो आपण ..
आधार शोधतो , मिळतो का कुठे ? नाही…नाही मिळत आधार , कुणीच नसतं तिथे .
आपण दाट अंधारल्या जागी पोचलो असतो .
जिथे एकटेच असतो ..अगदी एकटे..वेदनेने अश्रू ढासळत.
अश्रूंनाही थोपवणार कुणीच नसतं तिथे…सावरतो आपण, मनाची एक निश्चय करत. …..
पडतो बाहेर कसेतरी, एक एक पाऊल हळूहळू मागे घेत, पुन्हा चाचपडतच …, प्रकाशाचा मागोवा घेत.
येतो एकदाचं बाहेर…तेंव्हा आंधळेपानाची ती पट्टी हि गळून पडते.एक शिकवण मिळते त्यातून ..
प्रेमं …., प्रेमालाही मर्यादा आहेत.एका ठराविक स्थितीपर्यंत ते फुलतं …बहरतं, अन दरवळतं .
पण त्याही पुढे गेलात …कि संपल. मग वेदनेची किनार लागते.
पण तिथपर्यंत कुणी जावूच नये..
सहज सूचल अन लिहलं.. smile emoticon
-संकेत पाटेकर – १६.०५.२०१५
_______________________________________
सहज सोपं असतं सगळ रे , 
फक्त आपल्याला हवं त्याच हवं तसं प्रेम मिळणं किंवा ते मिळविणं हेच काय ते कठीण…. smile emoticon
– संकेत
_______________________________________
प्रत्येकाच्या अंगी एखादी कला किंव्हा एखाद अस गुण असतोच ज्याच्या बळावर आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी कमवू शकतो . अन दाखवून देऊ शकतो ..
ज्या लोकांना ज्या लोकांनी आजपर्यंत कायम आपलं नुसतं हसच केलेय .  
– संकेत
_______________________________________
आज पर्यंत एक गोष्ट अनुभवलेय ..
एखादी चांगली गोष्ट अथवा कृती जी आपल्या हातून घडते .,, घडली जाते . 
तेंव्हा त्याकडे सहसा कुणाच लक्ष जात नाही . अन गेलेच तर ते थोड उशिराच…
पण एखादी वेगळ्या वळणाची गोष्ट किन्ह्वा कृती हातून घडली… .कि कुणास ठाऊक लोकांच्या नजरा अन वेचक शब्द एकाच वेळी आपल्यावर उधळले जातात .
– संकेत
_______________________________________ 
ह्या आयुष्याच्या प्रवास वाटेवर , आपल्या लोकांच प्रेमं अन आशीर्वाद मिळनं अन ते कायम तसंच राहणं (आपल्या शेवटपर्यंत ) ह्यासारखी मौल्यवान गोष्ट जगात इतर कुठलीच नाही.
ज्याला ते मिळालं तो खरंच सर्वात श्रीमंत माणूस ……
– संकेत
_______________________________________
काही गोष्टी हळूच सोडून द्याव्या लागतात . 
आपण कितीही प्रयत्नांची पराकाष्टा केली तरी निदान त्या वेळेत तरी त्या आपल्याश्या करता येत नाही .
 एखाद वस्तू जशी कितीही धुंन्डाळता वेळेत मिळेनाशी होते तसंच काहीसं . .. 
पण गंमत म्हणजे ती वस्तू आपल्या नकळत .कधी, कुठे, तरी मिळून जातेच . ..
तेंव्हा ते मिळाल्याच समाधान मात्र आपल्या चेहऱ्यावर काहीस असतच . 
शिरा का होईना मिळाली ना , हे समाधान ..
काही गोष्टी अश्याच वेळेत मिळत नाही . कितीही धडपड करून , निदान तरी त्या सोडाव्या लागतात. 
पण वेळेनंतर हि कधी नकळत त्या स्वताहून आपल्या स्वाधीन होतील अन होतीलच. 
ह्यातच मनाला गुंतवत ठेवावं लागतं . बस्स… ..
– संकेत य पाटेकर
१०.१.२०१५ 
_______________________________________
वेळ निघून गेल्यावरही , न मिळणाऱ्या काही गोष्टींच, समाधान ‘ते मिळाल्यावरही ‘ असतच . फक्त त्याची मात्रा थोडी अधिक प्रमाणात कुठे कमी होते तितकंच ..
प्रेमाचं हि अगदी तसंच आहे…
-संकेत 
_______________________________________
समजण्याइतपतं समजुददारपणा जर सगळ्यात असता , तर मनाशी विणल्या गेलेल्या नात्यातील माधुर्यता हि कायम तशीच राहिली असती. मधाळ हास्य रंगांची चौफेर उधळण करत .. 
 पण अस होत कुठे ? एक सावरणार तोच दुसरा अधिक दूर होत जात जातो . 
प्रेमाच्या चौकटी पासून अगदीच दूर…..
आपले एकजुटीचे प्रयत्न हि असे अश्यावेळेस निष्फळ ठरतात. 
पण मनातलि सैरभैर करणारी ओढ नि आस मात्र कणभर हि कमी होत नाही.
– संकेत
०७.०१.२०१५ 
_______________________________________
नाती अन त्यातील व्यक्ती, त्याच्यातील निरागसपणा , हास्यपणा , खोडकरपणा , गोडवा , रंगत संगत, एकजूटपणा जशेच्या तसं बांधून ठेवण्याची कसब आपल्या अंगी असावी लागते . 
अन्यथा दूर क्षितिजाशी मावळतीला झुकणार्या तेजो भास्करा सारखी आपली काही माणसं हि एकदिवस हळूच दिसिनाशी होतात.
– संकेत उर्फ संकु
_______________________________________
प्रेमाला मरणं नसतं, पण असह्य मरण यातना जरूर असतात .
– संकेत
_______________________________________
आपुलकीचा , प्रेमाने ओतपोत असा कोणतेही शब्द , मग तो ‘dear’ असो, Love u असो वा ‘मूर्ख’ असो….
ते शब्द अंतर्मुख करून जातात. जिव्हाळा निर्माण करतात अन नेहमीच हवेसे वाटतात .
आपल्या प्रिय जनांकडून …..
– संकेत 
_______________________________________
प्रेमाचं स्वरूप सेम असतं. .. इथून तिथून कसही , फक्त नाती, त्यानुसार व्यक्ती अन त्यानुसा कथा बदलत जाते तितकंच …
– संकेत
_______________________________________
आयुष्यात कुठलही संकट येवो , अथवा अटीतटीची परिस्थिती उद्भवो .
आपल्याला हवी असलेली आपली माणसं अन त्याचं प्रेम- पाठिंबा आपल्या सोबत असेल तर त्या परिस्थितीला किंव्हा आलेल्या संकटाना हसत हसत तोंड देण्याची प्रेरक शक्ती आपोपाप निर्माण होते . बस्स त्यांची साथ सोबत तेवढी हवी.
– संकेत उर्फ संकु 
_______________________________________
आयुष्याचा शेवट हा कसा अन कधी होईल ते सांगता येत नाही .
म्हणून जीवनातला हर एक क्षण आपल्या प्रियजना सोबत त्यांच्या सहवासातला असा जगावा ..कि आपल्या असण्या नसण्यात हि त्यांच्या चेहर्यावर आपल्या एखाद्या आठवणीने किंव्हा नुसत्या नावाने सुद्धा हासू अन आसू एकत्रित उमटू येतील.
– संकेत उर्फ संकु 
_______________________________________
आपल्यातले ‘ दुर्गुण’ लोकांना दाखवून देण्याची गरज भासत नाही ते लोकांना आपोआप कळत.
पण आपल्यातले ‘ कलागुण’ लोकाना दाखवूनच द्यावे लागतात. तेंव्हाच त्यानां ते कळतात. नजरेस येतात.
– संकेत उर्फ संकु 
_______________________________________
कळत नकळत मनाला योग्य तो आकार उकार देणारी आपलीच माणसं असतात . 
प्रसंगी घडवतात , प्रसंगी बिघडवतात हि एक वेळ निसर्गावर जीव ओतावा , पण कुणा मनावर नाही , तो कधी फसवेल , कधी रडवेल हे सांगता येत नाही . 
निसर्गाच मात्र तसं नसत . मनमुराद हसवण , अन निव्वळ आंनद देण हेच त्याला ठाऊक . 
अन म्हणूनच मला निसर्ग भावतो …….आपलासा वाटतो , आपला म्हणवून घेणाऱ्या माणसांपेक्षा….
– संकेत य पाटेकर
२५.०७.२०१४ 
_______________________________________
जीवनात येणारी हर एक संकट दुख वेदना सहन करता येतात , पण एखाद्याचा अश्रुचा बांध तो आक्रोश सहनकरण्या पलींकडचा असतो . 
– संकेत 
१९.०७.२०१४
_______________________________________

 मनावरच्या ताणाला (असलेला ताण कमी होण्यासाठी ) आपलेपणाचाच स्पर्श लागतो. तिथे औषधांचा काहीच उपयोग होत नाही. – संकेत
२३.०६.२०१४ 
_______________________________________
कुणी रागावतं , कुणी बोलणं बंद करतं, कुणी रुसून बसतं. तर कुणी अगदी जुळलेल नातं तोडण्याच्या मागे पडतं.
नाही नाही म्हणता म्हणता प्रत्येकाची आपल्याकडनं अन आपली काहींकडना काही ना काही अपेक्षा हि असतेच . 
अन म्हणून रागावणं , रुसणं , ह्या सारख्या गोष्टी अधेमधे घडत राहतात.
कुणाला आपलं वागणं पटत नसतं , कुणाला आपला चेहरा मोहरा पसंद नसतो , कुणीकडे आपला स्वभाव नडत असतो, तर कुणाला प्रेमभरल्या मायेची अपेक्षा असते पण त्याची पूर्तता होत नसते, कुणाची काही औरच मागणी असते ती पुरी होत नसते.
ह्या त्या कारणास्तव अपेक्षांचं लहान मोठं भार आपल्या मनावर थोड्या अधिक प्रमाणात तरी असतच . आणि ते आपण आपल्या परीने पूर्ण करण्याचा काटोकाट प्रयत्न करत असतो .व्यक्तीव्यक्ती नुसार ..
मनातले काही …
– संकेत य पाटेकर
१८.०६.२०१४ 
_______________________________________
गेलेले क्षण पुन्हा परत येत नाहीत, पण ते क्षण पुन्हा नव्याने अनुभवता येतात. आठवणींच्या स्वरूपात .. 
– संकेत उर्फ संकु 
_______________________________________
आपल्याच लाडक्या व्यक्तीचा आपल्याशी झालेला पूर्वीचा संवाद (मग तो फेसबुक वरचा असो व इतर कुठला ) पुन्हा वाचताना ..’ मन ‘ त्या गोड आठवणीत नकळत वाहून जातं. मन स्वतःशीच गुणगुणत राहत.
कुठे ते रम्य हसरे, आठवणीतले खेळकर दिवस ..अन कुठे आजचे हे …दिन
गेलेले ते रम्य दिवस पुन्हा तर येत नाहीच हे खर ..पण ‘ आठवणी ‘ मात्र त्या दुनियेत पुन्हा पुन्हा खेचत घेऊन जातात आपल्याला . त्या क्षणांना उजाळा देत . मनात आशेची एकच ज्योत दिपवून … ‘ काश ते दिवस पुन्हा बहारावेत ‘ गेलेले ते क्षण पुन्हा यावेत पुन्हा नव्याने …………
– संकेत य पाटेकर
०९.०६.२०१४ 
_______________________________________
इच्छेप्रमाणे काही गोष्टी मिळतात खर्या …पण त्या पूर्णपणे नाही .
अन म्हणून तेवढ्यावर आपलं मन काही समाधानी होत नाही . त्याला अधिक हवं असत. पूर्णपणे अन म्हणून ते धडपडत. जखमी होतं तरीही उभरतं.
पण काही गोष्टी सहज सोप्या कधीच नसतात . एक तर माघार घ्यावी लागते. किंव्हा मनाचा संघर्ष चालूच ठेवावा लागतो. त्या गोष्टीसाठी ती मिळेतोपर्यंत …पूर्णपणे.
– संकेत य पाटेकर
१९.०५.२०१४
_______________________________________
एखाद्याच्या मर्जीत असेपर्यंत , त्यांच्यानुसार वागेपर्यंत जो तो आपणास जवळ करतो. प्रेमाने बोलतो चालतो ऐकतो..आपली सोबत करतो. पण एकदा का त्यांच्या मर्जी पलीकडे गेलो कि लोक स्वताहून आपल्याला दूर सारतात . धारदार शब्दांच प्रमाणपत्र आपल्या मनी उमटवून … 
– संकेत
_______________________________________
एखाद्यावरचा राग हा कितीही गडद अन तप्त असला तरी हि काही दिवसाने तो हळू हळू का होईना निवळतोच. तो कायमस्वरूपी असा कधीच नसतो.
– संकेत उर्फ संकु
१७.०५.२०१४
_______________________________________
माणसाच्या गर्दीला हि माणूस कधी काळी कंटाळतो ,
नकोसं वाटतं सार त्याला , ना कोणाची जवळीक , ना कुणाचं हवं असलेलं प्रेम , नको हवी असते स्तुती , नि कौतुकाची थाप हि …अशावेळेस हवा असतो तो फक्त ‘ एकांत’ कधी मनात उद्भवलेल्या असंख्य प्रश्नांचा निरासन करण्यसाठी 
तर कधी सार काही विसरून मनाला एक तजेला देण्यासाठी .., अशावेळेस मन भरकटतं…
दूर कोसा दूर …त्याची भागदौड सुरु होते , अन कटाक्ष नजरेनी सारया दिशा धुंडाळत ते एका जागी विसावतं ………

जिथे ते विसावतं , तिथे असतो तो सृष्टीचा अद्भुत चमत्कार , त्याचं ते अलंकारित वैभव…. 
मनाला तारणारं , मनी असलेल्या सारया दुख विवंचनांना क्षणात दूर करणारं …
आईच्या उबदार कुशीत कसलीही चिंता न करता लेकरू ने शांतपणे निजावं ना ..असंच काहीसं

रोज त्याच त्याच जीवनशैली पासून कुठेतरी दूर निघावं , शांतपणे एका ठिकाणी विसावं जिथे मिळेल एकांत …
असा एक विचार स्पर्शून जातो कधी ना कधी…
तेंव्हा आपल मन हि कळत नकळत तिथपर्यंत, आपल्याला घेऊन हि जातं …
कधी कल्पनाच्या दुनियेतून ..तर कधी प्रत्यक्ष ……………….वर्तमानातून ……………!
एकांत मिळविण्यासाठी ………………स्वतःसाठी स्वतःच्या गती साठी ..!
संकेत य पाटेकर
_______________________________________
‘नातं’ तुटत नाही , तुटतात ती ‘ मनं’
अन ती पुन्हा जुळवायला कधी वेळ हवा असतो तर कधी प्रेमाची हलकीशी थाप…
अन आपुलकीचे काही उबदार प्रेमळ शब्द…
कितीही वाद विवाद झाले , रुसवे फुगवे झाले तरी प्रेमाचा एक हलकासा शब्द, एक हलकसा स्पर्श…
मनातला’ सारा राग क्षणात विसरून लावतं. 
म्हणून प्रेमाशिवाय नातं नाही . अन नात्यांशिवाय प्रेम . प्रेम जिथे नातं तिथे .
– संकेत य पाटेकर
०४.१२.२०१३ 
_______________________________________
दोन प्रकारची लोकं असतात :-
एक आपल्या हयातीत , आपल्या सोबत असणारी , कौतुकाची थाप हळूच आपल्या पाठीशी घालणारी…
आपल्या चुका दाखवून वेळोवेळी योग्य तो मार्गदर्शन करणारी अन आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी . अन दुसरी आपल्या हयातीत आपलं साथ न देणारी , साऱ्या गोष्टी दुरूनच पाहणारी…
आपल्या पश्चात आपल्या बद्दलच्या त्यांच्या मनी असलेल्या भावना जगभर सांगणारी .
– संकेत
२०.११.२०१३
_______________________________________
हव्या त्या गोष्टी हव्या त्या वेळेस मिळतातच असे नाही. 
काही वेळा आपल्या मनाची समजूत हि घालवी लागते .
 – संकेत , मे १८, २०१३ 
_______________________________________
काल असंच रात्री शतपावली करत असताना  , रस्त्याने चालता असताना , 
एकमेकांशी (मित्राशी )बोलत असताना,  एक छानसं  वाक्य तयार झालं. 
”कुणाच्या मनासाठी आपलं मनं  हि कधी ‘गहाणं’  ठेवावं लागत.” 
– संकेत,  मे १८, २०१३
 _______________________________________
आपले छंद , आवड नि आपले विचार …आपल्याला अनेक चांगले मित्र जोडून देतात. 
– संकेत, मे , 2013
_______________________________________
म्हणतात कि आपण जितकं प्रेम देऊ त्याहीपेक्षा अधिकतेने आपणास परत ते मिळत आणि ते खर हि आहे . 
पण हे हि इतकंच खर कि ते आपल्या अपेक्षप्रमाणे जिथून हव असत . 
जिथून मिळाव अस मनोमनी वाटत असतं तिथून सहसा मिळत नाही .त्याचे मार्ग काही वेळा बदलतात .
– संकेत य पाटेकर
_______________________________________
कोणतेही नातं असो …ते अनमोल असत , कोणत्याही कारणासाठी कृपया ते अनमोल नातं तोडू नका. 
– संकेत
_______________________________________
एक अनमोल नातं जपण्यासाठी स्वताहावर किती बंधनं घालावी लागतात, 
ते  आपलं आपणच जाणतो    समोरील व्यक्ती ते समजू शकत नाही 🙂
ते समजलच तर ते उत्तमच ..– संकेत
_______________________________________
मनात खूप राग असतो……पण समोरच्यावर , त्याच्या भावना न दुखावता कसा व्यक्त करायचं तेच काही वेळा कळत नाही. 🙁 – संकेत
_______________________________________
बोलताना विचार करून बोलावे …असं  आपण म्हणतो खरे ….पण प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही , कधी कधी शब्द हे वेगवान वाहना सारखे सरकन निघून जातात ते कळत हि नाही. 
कळत तेंव्हा वेळ पुढे गेलेली असते .  – संकेत
_______________________________________
आपल्या मनातील दुखालां कुणीतरी भागीदार नेहमीच हवा असतो .
– संकेत – जुलै , २०१२ 
_______________________________________
एका ठराविक मर्यादे पर्यंत आपण दु:ख मनात साठवून ठेवू शकतो . 
दु:खाच ओझं  जस जस वाढत जातं  तस तस मग मनाची ‘दु:ख’ पेलण्याची क्षमता  हि कमी कमी होत जाते ….
आणि मग नंतर काय तर ” विस्फोट ” ठरलेला. 
– संकेत, जुलै , २०१२
_______________________________________
गेलेलं ते दिवस,  ते क्षण पुन्हा  परतुनी येतात ..पण वेगळ्या स्वरूपात .. वेळ जशी बदलते , 
तशी वेळेसोबत परिस्थिती हि बदलते …..पण उशिरा का होईना .. हवे असलेले  ते दिवस पुन्हा बहरतात.  
– संकेत, जुलै , २०१२
_______________________________________
एक नातं जपण्यासाठी किती काळजी घ्यावी लागते , ते त्या नात्याचं महत्व अन त्याची किंमत कळल्याशिवाय कळून येत नाही. – संकेत, जुलै , २०१२
_______________________________________
काही गोष्टींकरिता कधी कधी स्व:ताहाच्या स्वभावात सुद्धा बदल घडवावा लागतो ….
पण ते बदल घडवणं  कठीणं असतं. 
– संकेत, जुलै , २०१२
_______________________________________
मनातली ती एक ओढ असेपर्यंत आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात असतो …ती ओढ संपताच प्रेम हि हळू हळू ओसरत जात . कमी होत जातं . पण खर प्रेम ह्यावूनी वेगळ असतं. ते तुटत नाही , ना तोडता येत नाही.  
-संकेत
_______________________________________
कुणाच्या मनाशी खेळणं  अन त्याच्या आयुष्यातं  दखल देणं …ह्याचा मला काहीही हक्क नाही. 
हक्क असेलच तर तो माझ्या मनावर. 
-संकेत
_______________________________________
एखादी जिवलग व्यक्ती जेंव्हा बरेच दिवसाने आपणास भेटते , बोलते. 
त्यावेळेसचा तो आनंद काही औरच असतो …..तो शब्दात व्यक्त करता येत नाही .
-संकेत
______________________________________
कुणी सोबत असो वा नसो …हि पुस्तकं नेहमीच साथ करतात.  
कधी  हसवतात – कधी मोकळेपणानं  रडवतात देखील .कधी  विचार करण्यास भाग पाडतात …
कधी अनमोल शिकवण देतात. अन आपल्यातला  एकटेपणही दूर करतात. 
-संकेत
______________________________________
कोणताही नातं  असो ”विश्वास” महत्वाचा …!!
-संकेत, जून २०१२ 
______________________________________
नाती अनेक जुळविता येतात , पण त्या जुळलेल्या नात्या मध्ये आपलेपणा नांदत  असेल तरच त्या नात्याला  अर्थ निर्माण होतो .  – संकेत
______________________________________
नाती अनेक जुळविता येतात , पण जुळवलेल्या नात्या मध्ये जीवन असेल तरच ते बहरत अन फ़ुलतं  सदासाठी नात्याची ती रेशमी गाठ अधिकाधिक घट्ट करत. 
 – संकेत

Leave a Reply

Your email address will not be published.