मनातलं वादळ..

मनातलं वादळ..

छुप्या रीतीनं का होईना, तुझा नेहमीचा तो गोड मधाळ आवाज , अधीरतेनं , कान टवकारून , डोळे बंद करून, श्वास रोखून, अगदी क्षणभरासाठी का असेना, ‘ऐकण्यात’ एक समाधान मिळून जातं रे…
मनातलं ओढवणारं घुंगावतं वादळ काहीस शांत होतं त्यानं.
बरं वाटतं बघ..

कित्येक दिवस मनात उसळलेली ण उचंबलेली ती हळवी भावना, केवळ तुझ्यासाठी, तुझ्या आवाजासाठी आतुरलेली, व्याकुलेली, काहीशी शांत होते.
जरी प्रत्यक्ष तुला भेटता येत नसले तरी तुझ्या आवाजाने ह्या मन भरून येतं.

एकमेकांशी जरी आपण अंतर राखून असलो वा बोलत नसलो.
तरी हृदयी गाभाऱ्यात अजूनही प्रेमाचं दीपस्थान तेवत आहे …
तिथे त्वेषानं भरलेल्या अंधाराच साम्राज्य नाही कि परकेपणाची भावना नाही . तिथे
प्रेम मनाने साधलेली हळवी प्रकाश किरणं तेवत आहेत. आपलेपणाचा दर्प गंधाळून.., सांभाळून..अद्यापही.. तुझ्यासाठी…

आपल्या आयुष्याची पायवाट जरी आता वेगवेगळ्या दिशेने फिरली असली, तरी
सहवासाची ती जादुई हळवी किनार अजूनही तन मन रोमांचित करून जाते रे.
हवं हवंस वाटतं बघ… ते सगळं.

गर्दीत एकटा असतानाही , वा ह्या क्षणा क्षणाला…
तुझ्या सहवासात ,नजरेतल्या त्या ओलाव्यात, स्वप्नांची ती क्षितिज रेख आखताना, ओलांडताना माझा मीच असा उरत नाही. गढून जातो पार….
जवळ तू असल्याची खात्री करत…

– संकेत
सहजच उमटलेलं..

One thought on “मनातलं वादळ..

Leave a Reply

Your email address will not be published.