मनातलं काही – भाग २

‘मनातलं काही – भाग २’

माणसाच्या गर्दीला हि माणूस कधी  कंटाळतो , नकोसं वाटतं  सार त्याला ,
कोणाची जवळीक नि प्रेमं  हि …मायेचा स्पर्श हि , नको हवी असते स्तुती , नि कौतुकाची थाप हि …
मनं  मात्र त्याचं, असलेल्या जागेपासून दूर कोसा पर्यंत फडफडत घेऊन जातं.
अन जिथे ते थांबतं. तिथे असतो  निसर्गाचा अद्भुत चमत्कार , अलंकारित  सौंदर्य,  एक वेगळं विश्व …
महत्वाचं  म्हणजे त्याला हवा असलेला एकांत ……
रोज त्याचं  त्याचं जीवनापासून कुठेतरी दूर जावं  जिथे आपल्याशिवाय कुणीच नाही .
अस प्रत्येक मनाला कधी ना कधी वाटतं .  आणि आपलं  मनं  तिथ पर्यंत आपल्याला घेऊन हि जातं ……
कधी कल्पनाच्या दुनियेतून .. निळ्याशार तरंगमय सौम्य लहरीत, शांत निरागस, चमचमत्या काळोख्या रात्री ..हळूच..त्या तरुतून …… तर कधी प्रत्यक्ष, वर्तमानातून …
हवा असतो तो फक्त एकांत ………………..
स्वतःसाठी , स्वतःच्या गतीसाठी ..
संकेत य पाटेकर
१४.०५.२०१३
____________________________________

आयुष्याची व्याख्या  सहज अन साध्या शब्दात देता येते पण तेच आयुष्य त्या व्याख्या नुसार जगणं फारच कठीण असतं . आणि ते फारच कमी लोकांना जमतं.
– संकेत
____________________________________
नात्यातला जवळीकता साधणारा दुवा म्हणजे संवाद.
-संकेत
____________________________________
स्व:ताहाच्या मनावर ताबा मिळविणे हि एक सर्वात मोठी आणि तितकीच अवघड गोष्ट.
-संकेत
____________________________________
दु:खाला सोबती नाही , कुणी त्याचं  भागीदार हि नाही …….ते स्व:ताहाच स्व:ताहालाच पचवावं लागतं ..पेलावं  लागतं.
-संकेत
____________________________________
जोपर्यंत आपले विचार आपण समोरील व्यक्तीला पटवून देत नाही …..तोपर्यंत समोरील व्यक्तीचं  आपल्याबद्दलच मत हे ”आपण दोषी” असल्यासारख असतं .
-संकेत
____________________________________
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर जागो जागी खड्डे …असतातच.
तिथे आपण ठेच लागून कधी ना कधी पडणारचं  …………पण पडल्याच दु:ख आपणास नसतं  काही .. दु:ख असत ते अशा वेळी सोबत कुणी नसतं  त्याचंच ….
आयुष्य हे अस धडपडतचं  जगावं लागतं  ….स्व: ताहाला सावरतं…
-संकेत
____________________________________
जीवन म्हणजे असंख्य धाग्यांचा एक गुंता…न सुटणारा ..आणि ते असंख्य धागे म्हणजे आपण , हि नाती हे बंधनं आणि सभोवतालची परिस्थिती .
-संकेत
____________________________________
एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीच्या नजरेतून आपण पार उतरलो तर पुढे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण करणं फार कठीण जातं.
-संकेत
____________________________________
ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेमं  करावं  ते दूर निघून जातात. आणि जे आपल्यावर मनापसून प्रेमं  करतात त्यांच्यापासून आपण दूर निघून जातो .
उरतं  ते काय ते फक्त एकटेपणा आणि एकाकीपण ….
येती माणसं जाती माणसं
लावी जीवाला घोर
प्रेमाजे बीज पेरुनी
होती सारे दूर…
-संकेत
____________________________________
दुराव्यात देखील गोडवा असतो …पण तो केंव्हा ज्यावेळेस दोघांमध्ये थोड्या प्रमाणात  तरी एकमेकांविषयी प्रेम भावना शिल्लक असते.
-संकेत
____________________________________
दुखाला अंत नसतो …………. सुखही क्षणाचेच सोबती असतात …!!
-संकेत , मे १७ , २०१२
____________________________________
आयुष्याच्या वाटेवर , वळणावळणावर आपल्यास अनेक माणसे भेटतात , त्यातील काही आपल्या सोबत चालत राहतात तर काही मागेच राहतात पण म्हणून आपण मागे असलेल्यांना कधी विसरायचं नसतं.
-संकेत
____________________________________
आपल्यातले ”कला- गुण” जोपर्यंत आपण लोकांना (आपल्या कामातून असो वा आपल्या विचार शैलीतून) ते दाखवत नाही तोपर्यंत त्यांना आपले महत्व कळत नाही.
-संकेत
____________________________________
कोणत्याही नात्यातलं दुराव्याचं  मूळ कारण म्हणजे आपल्या अपेक्षाप्रमाणे त्या व्यक्तीने तसं न वागण   …!! (माणूस हा स्वार्थी असतो)
-संकेत
____________________________________
आवडत्या व्यक्तीचा सहवास आणि प्रेमं  मिळाल्यास ……..चेहर्यामागच दु:ख क्षणात नाहीसं  होतं .
पण तोच सहवास ते प्रेम कुठेतरी कमी होत आहे ….लुप्त होत आहे असं जाणवू  लागल्यास त्या अनमोल नात्यातलं अंतर हळू हळू वाढीस लागतं. आणि मग माणसं दुरावतात …एकमेकांपासून ….!
-संकेत , मे १७ , २०१२
____________________________________
नातं कितीही घट्ट असलं तरी …….त्यामध्ये थोडी स्पेस (SPACE )हि असावीच लागते , अन्यथा शंका-कुशंका ने एक अमूल्य नात्यात तुटातुट होऊ शकते.
-संकेत
____________________________________
प्रत्त्येकाला स्वातंत्र आहे मुक्तपणे हे जीवन जगण्याचा , जीवनाचा पुरे पूर आनंद लुटण्याचा .
असं  आपण म्हणत असलो  तरी , तसं नसतं  , कारण नात्याच्या बंधनात प्रत्त्येकजण अडकलेला असतो. काय बरोबर ना मित्रहो , तुम्हाला काय वाटत माझ्या ह्या विधानाबद्दल ???
____________________________________
योग्य काय आणि अयोग्य काय ? हे माहित असून सुद्धा आपण काहीच कृती करत नाही.
ह्याचाच अर्थ आपल्याला योग्य तो निर्णय घेता येत नाही.
-संकेत
____________________________________
प्रेमाने बोला, प्रेमाने वागा …….तर समोरची व्यक्ती तुमच्याशी प्रेमाने बोलेल ,प्रेमाने वागेल.
-संकेत
____________________________________
आपल्या प्रिय व्यक्तींचं बोलनं सुद्धा…कधी कधी मनावर खूप वार करून जातं.
खर तर असं बोलनं आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षित नसतं . पण त्यांची ती परिस्थिती अन आलेली ती वेळ ” त्यांच्या कडून अस नकळत वदवून घेते , पण त्याचा ” त्या बोलण्याचा . त्या शब्दांचा परिणाम आपल्यावर नक्कीच होतो. अन आपलं मनं  दुखावलं जातं हे खरं…
-संकेत
____________________________________
प्रेम असं करावं  कि मेल्यावरही …..आपल्यावरील प्रेमामुळे हि धरती अनेकांच्या आसवांनी न्हावून निघेल.  -संकेत
____________________________________
जाता येता माणसांचे चेहरे पहां , निरखून बघा, बरेच काही लपलं असतं  त्या चेहर्यात …..
जे आपल्याला बरंच काही सांगून जातं  ,शिकवून जातं ..जीवनाचं सार त्यात कुठेतर लपलेलं असत.
– संकेत
____________________________________
काही गोष्टी ह्या स्वीकाराव्याच लागतात . त्याला पर्याय हा नसतोच ……!!
– संकेत
____________________________________

प्रत्त्येकाचं  जीवन वेगळ असतं  , प्रत्त्येकालाच दु:ख असतं,
काही लोक मनातले दुख चेहर्यावर आणत नाही,
पण काहींच्या चेहर्यावरूनच मात्र ते सार दिसत असतं .
दुख हे सार्यांनाच आहे,
तरीही मनं  हे आपलं  म्हणत ” काश तुझ्या सारखं  जीवन असतं ” तर  फार बरं  झालं  असतं .
पण ज्याचं त्याचं  दुख ज्याला त्यालाच कळतं.
संकेत
____________________________________
जोपर्यंत जबाबदारीचं ओझं   आपल्या  खांद्यावर पडत  नाही.
तोपर्यंत  खऱ्या  जीवनाला  सुरवात  नाही.
जीवन  हे  अनेक  गुंतागुंतीच ,अनेक  शंकां कुशांकांनी , संकटांनी  भरलेलं आहे.
तो गुंता ती संकट सोडविण्याची  कसब  ज्याच्या  जवळ ….तो  जीवन  जगायला  शिकला  अस  समजावं.
– संकेत
___________________________________
मनं स्वतंत्र असलं  तरी …त्याला  तुरुंगवास  हा  भोगावाच लागतो.
नात्यांच्या गुंफण,  हे बंधन हेच  काय त्याचं  तुरुंगवास…
इथे जामीन नसतो  इथे असते फक्त  शिक्षा जन्म  ठेपेची  ” प्रेमाने  जगायची ,जगविण्याची ‘
निखळ  ,निर्मळ  प्रेमाने  जीवन आनंदमय करण्याची  ..
– संकेत
___________________________________
चांगले विचार मनात असून सुद्धा उपयोग नाही जोपर्यंत आपण ते प्रत्यक्ष विचार कृतीत उतरवत नाही.
संकेत य. पाटेकर
___________________________________
आपलं  मनं हे  कितीही शुद्ध, निर्मळ, स्वच्छ, प्रामाणिक, सदाचारी असो , आपला चेहरा कधी कधी आपल्याला फसवतो, अडकवतो कुठल्यातरी संकटात.
संकेत य पाटेकर
___________________________________

‘नातं’ तुटत नाही , तुटतात ती ‘ मनं’ 
अन ती पुन्हा जुळवायला कधी वेळ हवा असतो तर कधी प्रेमाची हलकीशी थाप , अन आपुलकीचे काही उबदार प्रेमळ शब्द …
कितीही वाद विवाद झाले , रुसवे फुगवे झाले तरी प्रेमाचा एक हलकासा शब्द…
एक हलकसा स्पर्श ‘ मनातला’ सारा राग क्षणात विसरून लावतं.  म्हणून प्रेमाशिवाय नातं नाही .
अन नात्यांशिवाय प्रेम ….
प्रेम जिथे नातं तिथे ….
संकेत य पाटेकर
४.१२.२०१३
___________________________________

एकदा का माणसं ओळखता आली ………कि जुळलेल्या त्या नात्यामध्ये किती अंतर ठेवायचं  किती नाही ते आपुसकचं  कळत जातं ..
 – संकेत, १२.२०१३

___________________________________
सर्वच तर्क , शंका बरोबर असतातच अस न्हवे , सर्व तर्क शंका चुकीचेच असतात असे हि न्हवे पण त्यातले काही मात्र खरे निघतात हेही खरे .. – संकेत
___________________________________

काही प्रश्न न बोलताच सुटतात , पण काही प्रश्न बोलण्यास भाग पाडतात , तेंव्हाच ते सुटतात – संकेत

__________________________________
 
नातं कधीही तुटत नाही , तुटतात ती जुळलेली मनं, आणि तुटलेल्या त्या मनाला पुन्हा जुळायला थोडा अवधी हा लागतोच . – संकेत
 
__________________________________
 

जीवन म्हणजे ”त्याग” आहे.
जीवन जगायचं म्हणजे काहीं गोष्टीनचा त्याग हा करावाच लागतो , एक तर स्वताहाच्या हितासाठी किंवा दुसर्याच्या हितासाठी , चांगल्यासाठी …., स्वताहाच्या मनाला सावरायला लागत. मन बळकट करावं लागत.

कारण एखाद्या गोष्टीचा त्याग म्हणजे दु:ख-वेदना ह्यांचा भरमसाठ साठाच जणू !!
ते पेलायला कणखर मनाची गरज असते .

– संकेत य पाटेकर 
__________________________________

रस्त्याने जाता येता अनेक चेहरे दिसतात. 
कधी हसरे कधी रडवे …कधी एकदम टवटवीत प्रसन्न … कधी कुठल्या तरी विचारात बुडालेले …आयुष्याचा विचार करणारे…
त्या सर्व चेहऱ्यांना पाहून …मन स्वताहाच स्वताःआशीच मनातल्या मनात पुटपुटत… हे जीवन म्हणजे सुख- दुखाचाच एक मिश्रण आहे …!!

आपल्या सुखासाठी जो तो धडपडतो ….आसवे गाळतो ..किती काबाडकष्ट कष्ट करतो. केवळ सुखासाठी ….
पण सुख सुद्धा अशी गोष्ट आहे कि ….जी हातात यावी नि निसटून जावी …!! 
क्षणभर का असेना एक आनंद देऊन जातो तो सुख …पण आठवणीत कायम कोरले जातात ते सुखद क्षण !!

– संकेत
__________________________________

संधी ” हि कधी – कुठे – कशी अन कोणत्या स्वरूपात येईल ते काही सांगता येत नाही म्हणून नेहमी तत्पर असणे , सावध असणे अन तयारीत असणेच चांगल .

– संकेत य पाटेकर
__________________________________
मित्रहो ,
जोपर्यंत आपल्या कडून मदतीचा हाथ कुणाला स्पर्श होत नाही . तोपर्यंत आपणास माणूस म्हणून म्हणता येणार नाही. कारण
जग चालते ते प्रेमावर
प्रेमळ अशा माणसांवर
माणसातल्या त्या माणुसकीवर …!!!!
– संकेत
_____________________________________

 

मनातल्या सर्वच गोष्टी कधी कुणाला share करता येत नाही.
काही गोष्टी आपल्यालाच सहन कराव्या लागतात. मनात ते कायमचेच ठेवावे लागतात.
चेहर्यावरचं  हसू देखील मुद्दाम ठेवावं लागतं  कधी कधी कुणाच्या तरी प्रेमापायी.
– संकेत
______________________________________

जीवन हे एकाकी असतं.
संघर्षाच…आपणच ते जगायचं असत . लढत लढत पुढे पुढे जायचं असत .
पण जीवन जगात असताना ..आपल्या माता पित्यांचा आशीर्वाद ..मित्राचं सहवास ..त्याचं प्रेम हे असायला लागत. …प्रेमामुळेच हे जग आहे. प्रेम करा ..प्रेमाने रहा ..प्रेमाने जगा आणि प्रेमाने जगवा ….
या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे…..
माझ्या वाढ दिवसा निम्मित्त हा प्रेमाचा संदेश..
– संकेत
__________________________________

प्रत्त्येक क्षण हा फार महत्वाचा असतो …
क्षण हा क्षणा क्षणाला बदलत असतो …काही व्यक्ती आयुष्यात येतात ..अन लगेच निघून हि जातात.
.पण येन- जाण्यामाधाला जो मधला जो काल असतो..तो आपल्यास विसरता येत नाही .
.कारण त्या मधल्या काळात आपण ..एकत्र भेटतो …बोलतो …विचारांची देवान घेवाण करतो …
एकमेकांचा विश्वास संपादन करतो…..आनंदाने सर्व काही चालत असत ….

पण अचानक त्या व्यक्तीच अस आपल्याला सोडून जाणं  ..त्याचं दूरवर जाणं …
आपल्या जीवाला लागतं.
त्याच्या त्या गोड अन प्रेमळ आठवणी मध्ये आपण फार फार गुंतलो जातो.

म्हणून मित्रहो प्रत्त्येक क्षण हा प्रेमाने जगा..
क्षणाला आपण थांबवून नाही ठेवू शकत …
शेवटी त्या गोड अन प्रेमळ आठवणीच राहतात…त्याच जगायला हि शिकवतात
– अनुभवावरून – संकेत
__________________________________
मित्रहो,
गमती जमती मध्ये आपण कुणाची मस्करी करता करता तिचं वादात केंव्हा रुपांतर होत ते कधी कळत नसत .
कुणाची मस्करी करणं ह्याला देखील काही मर्यादा असतात.
मित्रहो’ ‘मस्करी करताना कुणाच त्याने मन नाही ना आपण दुखवत ह्याच भान जरूर ठेवावं .
तोडन फार सोप असत जोडन फारच कठीण …नात जोडायला शिकले पाहिजे ..प्रेमान राहायला शिकल पाहिजे.

सुप्रभात..
संकेत
__________________________________
शब्द हे फार धारदार असतात म्हणून ते जरा जपूनच वापरावे ..
एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना..बोलानाच्या ओघात ..नकळत आपण काही तरी वेगळ बोलून जातो .ज्याचा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खोलवर परिणाम होतो…..
मग त्याच्या मनात आपल्याविषयक वेगळ मत निर्माण होतं ….मग त्याचा आपल्यालाही त्रास अन समोरच्या त्या व्यक्तीलाही…..!!
– संकेत

__________________________________

जीवनात जितक आनंदाने राहता येईल, हसता येईल, तितक हसत खेळत राहावं …कारण दुख हे भिंतीवरच्या पालीसारख सदाने आपल्या पाठीवर चिकटलेले असते..आपल्या अवती भोवती …फिरत असतं.
– संकेत
__________________________________
माणूस वयाने कितीही मोठा होवो……तो प्रेमात अगदी लहान मुलासारखाच असतो….
– संकेत
__________________________________
भविष्याचा विचार करूनच वर्तमानात जगायचे असते ..तरच जीवनाला कुठे अर्थ निर्माण होईल.

-संकेत य. पाटेकर
__________________________________
ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त अन मनापासून प्रेम करतो..त्या व्यक्तीच्या मनाला लागेल ..टोचेल ..त्रास होईल अस वर्तन हि आपण करतो… पण शेवटी प्रेम ते सगळ काही “माफ” ..
संकेत य पाटेकर
__________________________________

आनंदाचे क्षण हे मोजकेच असतात …दुख दारात टपलेलाच असतो…त्यामुळे आनंदाचे ते क्षण हृदयात सामावायाचे असतात ..साठवायचे असतात …तेच क्षण आपल्याला पुढे चेहयावर नकळत हसू आणि रडूही आणतात.
– संकेत य पाटेकर
‘मनातलं काही – भाग २’

Leave a Comment

Your email address will not be published.