‘ मनं ‘ खरंच खूप वेडं असतं..

खरंच ‘ मनं ‘ खरंच खूप वेडं असतं. किती भावूक होतं ते लगेच..
आपली प्रिय व्यक्ती आपल्या पासून दूर जात आहे, हे त्याला सहनच होत नाही. सहन तरी कसं होणार ? नित्यं नेमाचं बोलणं , रुसणं, थट्टा मस्करी करणं, भेटणं हे चालूच असतं. प्रेम असतं ते , मनापासूनचं. नातं असतं ते एक अनमोल असं, हृदयाशी गुंफलेलं.
पण एक दिवस अचानक तीच दूर जाणं. जीवाला लागतं. वेदना होतात फार मनाला, आता सारं सारं काही बंद होणार, ते बोलणं , ते भेटणं ,ते हास्य, ते शब्द, ती प्रेमळ हाक, तो प्रेमळ स्पर्श, सारं सारं दुरावणार …हि भावनाच मनाला खूप छळते.

प्रेम.. हसवतं रडवतं. प्रेमच आपणास जवळ आणतं आणि तेच प्रेम पुन्हा दुरावतं, आपल्याला त्या व्यक्ती पासून,
विश्व दडलंय ह्या प्रेमात. प्रेम प्रेम आणि हे प्रेम ..

संकेत य. पाटेकर

१६.११.२०११

Leave a Comment

Your email address will not be published.