क्षण ..कधी केंव्हा कुठे आणि कसा रंग उधळवतील ना ह्याचा काही नेम नाही आणि नसतोच असा कधी, अगदी क्षणा क्षणातच म्हणायला, तश्या खूप काही घडामोडी घडतात. ध्यानी मनी नसताना एखाद मैफिल ही जुळून येते आणि अफलातून अशी रंगून जाते. अशी रंगते की ती कायम स्मरणाशी उरते  , आपल्याच माणसाच्या सहवासाचा आणि आपुलकीचा अत्तरीय गंध दरवळून 

आणि म्हणूनच अश्या त्या गत क्षणांना , त्या सर्व आठवांना.. कधी शिणवटा येत नाही. 
ते क्षण नेहमीच प्रसन्नतेत वाहतात, आनंदाचा फुलोरा घेऊन येतात. फुलतात आणि हसवतात.
भूत वर्तमान काहीही असो,

काल भाईव्यक्ती की वल्ली हा पुलं वर आधारित चित्रपट पाहताना , पदोपदी त्यांचा जणू सहवासच घडत होता. इतकं एकरूप झालो होतो. 

वाक्य वाक्यातनं आणि त्यांच्या हास्य विनोदातंन मनमोकळी आरोळी फुटत होती.
टाळ्या पडत होत्या. 

वाह..! वाह..! मिळत होती.
त्यांनी जगलेले आणि जागविलेले क्षण आमच्यापुढे असे नव्याने उभे होत असताना
स्वरगंगेत मिसळलेली ती मैफिल..काय आणि कसं बरं वर्णवू..
तोड नाही हो त्याला
साक्षात कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी , वसंत , ह्या आदी दिग्गजांच्या स्वर्गीय सुरात आणि विठू माऊलीच्या नामजपात रंगलेली ती दर्दी मैफिल..
ह्याने माझ्यासोबत इतर प्रेक्षवर्ग ही तल्लीन होऊन त्या सुराशी मिसळला गेला होता..
त्या मैफिलीला खरंच तोड नाही…

कानडा राजा पंढरीचा ..
अजूनही गुणगुणतोय मी..

गदिमा सोबत नाच रे मोराशी जुळलेली बैठक..
ती रंगत…आहा..!
तो काळ खरच वेगळा होता..ती कलावंत आणि कलारसिक ,कला जोपासणारी माणसंच वेगळी होती. कलेने झपाटलेली आणि तशीच दर्दी देखील..

पुलं.. असो, ग.दि मा असो, सुधीर फडके असो
भीमशेन जोशी..कुमार गंधर्व, बालगंधर्व..
किती नावं घेऊ..

कला जगवते आणि जीवन घडवते ही “

पुलंचा सहवासआज ह्या चित्रपटातून घेता आला..
ह्यातच आनंदी आनंद..
अजून काय हवंय..
भेटू आता पुन्हा ८ फेब्रुवारीला …
तोपर्यंत हसा खेळा आणि क्षणा क्षणांचा आनंद घ्या..आणि एखादी मैफिल ही रंगवा..
धन्यवाद..! 
संकेत पाटेकर
०६/०१/२०१९
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published.