बालदिन – आठवणींची उजळणी | Marathi Lekh | Marathi Article | Sanket Patekar 

बालदिन म्हणून आठवणींची उजळणी…,आई, मी आणि मोठा भाऊ..❣

तेंव्हा “हम आपके है कौन” हा चित्रपट नुकताच रिलीज झालेला आणि गंमत म्हणजे आई आणि भाऊ मला सोडून,  चाळीतल्या मंडळींसह तो चित्रपट पाहायला गेले होते. ते हि मी शाळेत गेलो असताना, ह्याचा राग कुठेशी मनाशी ठेवत, गाल फुगवत, मी सलमानचा तो जॅकेट मला ही हवा हा असा हट्ट धरून बसलो होतो आणि मोठ्ठा आनंद म्हणजे तो हट्ट माझा पुरवला देखील गेला होता तेंव्हा,

सगळेच नाही पण जे जे शक्य आहे ते ते हट्ट पुरविले जायचे.
नाहीतर आई मुका घेत, गोंजरात समजूत घालायची. तिच्या कुशीत माझं ढसा ढसा रडणं मग आपोआप शांत व्हायचं. 

वयोमानानुसार ते सगळं बदलत गेलं. परिस्थितीशी जाणीव होत गेली. वयाने मोठ्ठे झालो. पण मनातलं ते हट्टीपण ते निरागस बालपण अजूनही मनात मुसंडी घेत असतं.


आता तेंव्हा सारखा हट्ट मात्र धरता येत नाही. हट्ट धरून रडता ही येत नाही.
पण आपल्यासाठी त्या परिस्थितीही हट्ट पुरवणाऱ्या आणि वेळोवेळी समज देऊन संस्कारच बीज पेरणाऱ्या आई बाबांच्या चरणी नकळत हे तन मन लीन होत जातं.

मना आतला प्रेमाचा निर्मळ झरा खळखळुन वाहून देत.

~ संकेत पाटेकर

बालदिन – आठवणींची उजळणी | Marathi Lekh | Marathi Article | Sanket Patekar

बालदिन म्हणून आठवणींची उजळणी

आईच नातंच असं आहे श्रेष्ठत्वाचं, त्याला तोड नाही , त्याहूनि कुणी मोठं नाही. – संकेत पाटेकर 

Book Bazar
Book Baazar

Leave a Reply

Your email address will not be published.