बबन काका आणि भारतमाता

माणसं बोलता बोलता कधी आपलीशी होंऊन जातात ना  ते कळत हि नाही. 
मनाच्या ह्या तळ गाभ्याला  भावनांचा हळवा स्पर्श जरी झाला कि मनातला डोह आपसूकच उसळून बाहेर येतो. आणि मग शब्दांची उसळण होते. शब्दांना सूर गवसतो. आणि आठवणींचा  रंगमोहित सडा विघुरला जातो. त्यात वेळेचं भान राहत नाही. समाधानाचं एक चिटपाखरू मात्र भिरभरीत राहत अवतीभोवती . 
आपल्या  बोलण्याला  गोडव्याचं सारण चिटकलं कि असं सगळं घडतं. 
अनोळखी हि आपलीशी होतात. 
 
 
उत्साह भरलेले बबन काका हि असेच . क्षणभराची काय ती आमची ओळख . 
परेल मधल्या खास गिरणी कामगारांच्या मनोरंजनासाठी १९३२ साली उभारलेल्या ह्या भारतमाता सिनेमागृहात ..
आज  आणि डॉ.काशीनाथ घाणेकर हा चित्रपट पाहून  आम्ही बाल्कनीतल्या दरवाज्यातून बाहेर पडलो. स्टाईल आणि डायलॉग मारताच  ..”आपलं नाणं कसं खणखणीत वाजलं पाहिजे . .एकदम कड्डक
तोच ह्या  काकांची भेट घडली. 
 
साडे नऊचा खेळ पुन्हा रंगणार होता.  उठावदार वळणदार त्या जिण्यावरून रसिक प्रेषक आत प्रवेश करतं  होते . त्यांची तिकिटं तपासून देणं आणि सीट दाखवून देण्याचं काम हे काका गेले ३८ वर्ष इथे करतं आहे. ३८ वर्षाची अखंड सेवा . 
त्यामुळे रंजक अश्या आठवणींचा ठेवा त्यांच्याकडे अमाप. 
त्याचाच उलगडा काल झाला. 
 
दरवाजतुन बाहेर पडलो तोच फोटोशेषन सुरु  झाला. 
साडे सहाच्या त्या शोचे सगळे रसिक प्रेषक एव्हाना चित्रपट पाहून गेट बाहेर पडले होते. उरलो होतो तो आम्हीचपाच महारथी . 
काकांनी ते पाहिलं. पण त्यावर काही बोलले नाही. उलट चालू द्या चालू द्या . फोटो काढा कुणी काही बोलणार नाही. असे त्यांचे बोल पुन्हा सेल्फी घेण्यात आम्हाला मुभा देत होते. 
 
पाच दहा मिनिट अशीच  इकडं तिकडं गेली. आमचं फोटोशेसन सुरुच होतं. लगभगिने ते काका ..येणाऱ्या रसिक प्रेक्षकांना  त्यांची जागा दाखवून आमच्याकडे पुन्हा येत  होते. 
 
कारण त्यांचा मनाच्या तळघराला ..आमच्या  मनाचा हळवा कोपरा जो लागला होता. 
आणि म्हणूनच गेल्या ३८ वर्षातल्या त्यांच्या कारकिर्दीतल्या  रंजक आठवणींना पुन्हा मुलामा फुटला  होता. 
काका उत्साहाने अगदी भरभरून बोलत होते.   
ऐकणारं कुणी असं भेटलं  कि मन हि आपलं मोकळं होतं जातं. 
ऐकून घेणाऱ्याला हि नव्या गोष्टी उलगडत  जातात. मन स्वच्छंदी होतं . 
 
काका बोलत  होते .  
राजकुमार पासून..ललिता पवार …राजेश खन्ना मराठी चित्रपट सृष्टीतळे  दिग्गज ..
भालाजी पेंढारकर पासून,  दादा कोंडके खुद्द डॉ. काशिनाथ घाणेकर …ह्यांची आठवण त्यांच्याशी त्यांचा झालेला संवाद ..अंकुश चौधरींशी बातचीत  आणि तेंव्हाचे आताचे रसिक प्रेषक आणि अवतालभोवताल . 
आम्ही ते सगळं रसिकतेने श्रवण करतं  होतो.  एखाद्या  मैफिलतला सूर कानी पडावा तसा …
– संकेत पाटेकर
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »