बघणाऱ्यांचे हि डोळे दिपून जावेत


कल्पना नाही करता येत रेssss,  कोण किती आपल्यावर प्रेम करतं ते..
पण तू स्वतःवर विश्वास ठेव.
कुणीचं आपलं नाही, आपलेपणानं प्रेम करणार नाही. आपलं मन जपणार नाही,  अश्या गैरसमजात तू वाहू नकोस आणि उगाच असा भावाकुल हि होऊ नकोस.

जगत जा तू आपल्या परीने, मुक्त बेभान वाऱ्यासारखा, उधाणलेल्या शुभ्र फेसाळ लाटांसारखा, रिमझिम टपटपनाऱ्या हळुवार सरींसारखा , तेजोमय दीप वलयासारखा आणि कधी स्थिर काठिण्य स्तंभासारखा हि…
मनाचं आभाळ मात्र उघड करतं. सारं काही सामाऊन घेतं. श्वासाचं गणित मांडत आणि प्रेम विषयाची जुळवणी आणि हात मिळवणी करत..
जीवनाचे विविध रंग भर तू ..कलाकुसरीने ….

बघणाऱ्यांचे हि डोळे दिपून जावेत त्याने …

कळतंय ??
– संकेत 

 

प्रतिबिंब..

सूर्य मावळतीला लागल्यावर, हि नदी हि कशी, बघ… संथ रूप धारण करते. दिवसभरातला तो खळखळाट , आलेला शिणवठा आदी , त्या निरव शांततेत ढवळून जातो . ती संथ होते. एकपात्री होते. स्वतःला मोकळं करुण घेत. तारुण्यसुलभ एखाद स्त्रीने आपला केशसंभार मोकळा करावं ना तसंच . ..ती हि मोकळी होते. आणि तेंव्हाच दिवसा लपंडाव खेळणारा हा ‘चंद्रमा’ तिच्या ‘हृदयी ‘मोकळा असा श्वास घेत स्वतःला हळूच सामावून घेतो. तिच्या गर्द मिठीत , तिला घट्ट बिलगून, श्वासाचं जाळं विस्तारत. ती प्रेमवेडी हि ह्याच क्षणांची आतुरतेने वाट पाहत असते . रोज.. अशी कित्येक रात्र…

Leave a Comment

Your email address will not be published.