हे दीदी,
तू मला लाखी बांधणार ?
हो रे माझ्या सोन्या …
मी पण बांधू तुला लाखी ?
अरे वेड्या , मुल कधी राखी बांधतात का ?
मग ?
बहिण राखी बांधते …….
हा आsssss….
मी तुझी बहिण ना , मग मी तुला राखी बांधणार…,
बहिण भावाचं हा प्रेमसंवाद . मला कल्पनेतल्या दुनियेत नकळत घेऊन गेला …….. वाटलं लहान व्हावं पुन्हा …अन बहिण भावाच्या प्रेमभरल्या दंग्यात हरवून जावं ……….
ये दीदी तू ,ती छोटा भीम वाली लाखी बांधनाल ना ?
हो रे, ढिशुम धुशुम …
मग मी तुला काय देनाल ? चोकलेट…
दीदी ..मला पण देशील ना, चोकलेट ?
चल , नाही देणार,
बघ , मग नको बांधू लाखी ….
मला पण हवाय चोकलेट ,
अच्छा बाबा , आपण दोघे खाऊ , ठीकाय ..
हम्म… माझी प्यारी दीदी
असंच लिहिता लिहिता…
– संकेत य पाटेकर