Waterproof Action Camera with Touch Screen 5K Ultra HD Video 20MP Photos 1080p Live Streaming Stabilization, Dual Screen, HyperSmooth 3.0 and Time Warp 3.0
सृष्टीचा अभूतपूर्व सोहळा म्हणजे 'सूर्योदय' आणि 'सूर्यास्त'
काही विकृत माणसं अश्या ह्या आपल्या अमूल्य ठेव्याची स्वतःची नाव लिहून आपली विकृती जगासमोर आणतात – खांदेरी
दगडांची रास आणि तटबंदी – खांदेरी
राजगडचा पाली दरवाजा
दगडांची रास आणि तटबंदी खांदेरी
खांदेरी
देवड्या – वास्तू – किल्ले मल्हारगड
नळदुर्ग : तटबुरुज आणि दरवाजा
गड देवता..
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजेच आपला सर्वांचाच लाडका बाप्पा श्री गणपती …श्री गजानन … त्याच नेमकं हे शाळेजवळ असलेलं वास्तव्य , हे स्थान… निश्चितच वेगळंपण आणणारं.. इगतपुरी तालुक्यातील …घोटीपासून अगदीच हाकेच्या अंतरावर ( जेमतेम ५-६ किमीवर ) मोरधन नावाचा किल्ला आपल्याला परिचयाचा आहे. हाच किल्ला येथील गावकऱ्यांत मात्र मोराचा डोंगर म्हणूनच मुखोद्गत आहे. ह्याच मोरा डोंगराच्या वा मोरधन किल्ल्याच्या पायथ्याशी खैरगाव हि लहानशी वस्ती आहे. ह्याच वस्तीतल्या शाळेजवळ, वृक्षछायेत , एका चौथऱ्यवार गणेशाची हि सुंदर मूर्ती पाहावयास मिळते. इथं काही क्षण थांबत .. ह्या शेंदूरचर्चित गणेशाचं आपण मनोमन दर्शन घ्यायचं आणि पुढे निघायचं. येथूनच एक वाट आपल्याला थेट किल्ल्याकडे घेऊन जाते. नाशिक हे तसं पुरातन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेलं, येथील होणाऱ्या व्यपारीमार्गावर ..घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असावा. टेहळणीसाठी म्हणून वापरात असलेला हा उंच पहाडी किल्ला.. आपल्या अंगा खांदयावर ..फार काही असे वास्तू -अवशेष बाळगून नसला तरीही…, आसपासच्या नितांत आणि रम्य देखण्या सृष्टी सौदंर्याने… काळेकभिन्न कातळ कड्यांच्या रंग- मोहित स्पर्शांनी , दूरवर उंचावलेल्या उत्तुंग सह्य माळांनी, अंगभर सुखावणाऱ्या वाऱ्याच्या…गीत स्वरांनी , मनात भरून उरतो.
चेहरा बरंच काही सांगून जातो.. 'चेहेरे- मोहरे'
महिपतगडाच्या पायथ्याचं गाव म्हणजे बेलदार वाडी तिथे, तिथल्या आजीसोबत घेतलेली छबी – मित्रावळ
भांड्याचा आवाज येणारा खडक
ठाणे पुणे असा प्रवास करत चांदण्या रात्री दिवेघाटातून पुढे मार्गी लागल्यावर आम्ही पहाटे सोनेरी गावात पोहोचलो. तिथून पायवाटेने मल्हारगडाशी जाताना टिपलेले क्षण ,,
कावनई गावात शिरलो तेंव्हा ह्या चिमुकल्या दिसल्या, गॉड अश्या हसल्या …तेंव्हा टिपलेला क्षण…
घनगड करून तैलबैलाच्या वाटेने वाघजाई घाट मार्गे ठाणाळे गावात पोचलो तेंव्हा हा छोटा सुधीर वाटाड्या म्ह्णून आम्हाला ठाणाळे लेणी दाखवण्याकरीता सोबत निघाला.
ठाणाळे गाव आणि छबी
भिवगड ला जाताना सृष्टी सौंदर्याच्या मोहक छटा कॅमेरात बंदिस्त करत असता, .हे काका कुतूहलाने माझ्याकडे पाहत होते, तेंव्हा कॅमेरा त्यांच्याकडे वळविला असता, त्यांच्या चेहऱ्यवरती असं हास्य फुललं.
माझे सह्य सवंगडी आणि तितकेच जिवलग अन गुणी मित्र.. भिवगड वरील ध्यान मग्न एक क्षण..
हसण्यात तर खर जगणं आहे. हे तर सांगायचं नसेल ना त्याला …? 😉 भिवगड ला जाताना …टिपलेला हा एक हास्य क्षण..
आमच्या मित्रावलातील कार्टी
आमच्या मित्रावलातील कार्टी
घनगड ला जाताना शाळेतल्या मुलांचा घोळका
सह्याद्रीतली माणसं
किल्ले रोहीड्याचे द्वारपाल
महीपतगडाच्या पारेश्वर मंदिरात रात्र काढून जेंव्हा आम्ही सकाळी पायथ्याच्या बेलदार वाडीत पोहोचलो तेंव्हा बिबट्या विषयी चर्चा सुरु होती. रात्री दडा धरून बसलेल्या बिबट्याने, गायीच्या वासराचा नुकताच जीव घेतला होता. अन त्याच्याच भाव छटा चेहऱ्यावर अश्या उमटून दिसत होत्या.
सुरकुत्यांचं हे देणे सांगे , जीवनाभुवनाचे कथा सार …कावनई किल्ल्याला, भेट देताना पायथ्याशी भेटलेले आजोबा
गेल्या पाच एक वर्षांपासून कावनई देवीच्या मंदिरात वास्तव्य करून असलेले हे बाबा, चेहऱ्याशी हे हसरं तेज, त्यांचं हे रुपडं …मनाला भावून गेलं. कावनई किल्ल्याशी जो कुणी येतो आणि ह्या मंदिरास भेट देतो, त्यांचं ते अगदी हसतच स्वागत करतात . त्यांची टिपलेली हि एक छबी …
मराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण – ठाणे
मराठमोळ्या नवीन वर्षी स्वागत यात्रेस टिपलेला एक क्षण – ठाणे