प्रेम म्हणजे अजून तरी काय ..

प्रेम म्हणजे अजून तरी काय .. 
आपल्या माणसाने दिलेली प्रेमाची हलकीशी साद सुद्धा जेंव्हा मनातले अनेक वादळी तवंग क्षणात शांत करते ना ….
ते म्हणजे ‘प्रेम’ 
 आपलेपणाची , पाठीवरली हलकीशी थाप सुद्धा मनाला जेंव्हा एक दिलासा देऊन जाते ना..
ते म्हणजे ‘प्रेम’ 
 मनातल्या भावनांना जिथे दुरूनच ओळखले जाते , वाचले जाते अन त्या तरल भावनेसाठी जिथे जीव ओतला जातो ना..
ते म्हणजे ‘प्रेम’ 
 शब्दा शब्दात जिथे हास्य तरंग उमटले जाते अन जिथे वेदनेचे जखम हि हसत सोसले जाते ना …
ते म्हणजे ‘प्रेम’ 
 क्षणभर आपल्या व्यक्तीपासून दूर गेलं कि मन कासावीस होवून उत्कट भेटीची जी ओढ लागते ना..
ते म्हणजे ‘प्रेम’ 
 मनास कितीही यातना झाल्या तरी जिवाभावाच्या आपल्या त्या व्यक्तीला जिथे निर्मळ मनाने माफ केले जाते अन तिच्या चांगल्यासाठीच जिथे नेहमी चिंतले जाते ना ..
ते म्हणजे ‘प्रेम’ 
 संवादाचा झरा कायम खळखळता राहून आपलेपणााचा स्पर्श ज्या मनाशी टिकून राहतो ना..
ते म्हणेज ‘प्रेम’
प्रेम म्हणजे अजून तरी काय ..

  • संकेत पाटेकर

 

Titan Karishma Analog Black Dial Men’s Watch -NK1639SM02
Buy now

 

Leave a Comment

Your email address will not be published.