प्रेम हे..

”आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे , याला प्रेम म्हणतात”. 

दिवसातून किती वेळा, तिचा फोटो असा बघत असतोस ? झूम इन झूम आउट करत ?
तिने एकाकी सवाल केला.
तिच्या अश्या ह्या अनपेक्षित उठलेल्या प्रश्नाला, काहीतर उत्तर द्यावं
म्हणून त्याने तिच्यावर एकवार नजर रोखली. अन क्षणाचा विलंब न घेत, पुन्हा
आपल्या मोबाईल मधला तिचा फोटो न्याहाळत , धुंद स्वरात म्हटलं .
‘’ बऱ्याचदा….

तसा बऱ्याचदा…मनात येईल तेंव्हा तिचा चेहरा स्तंभित झाल्यासारखा एकसारखा
निरखत असतो.
वेळेचं भान उरत नाही कि माझं मला कळत नाही . पण तो चेहरा , त्या चेहऱ्यावरील ते स्निग्ध भाव…
मला अजूनही तिच्या प्रेमात फ़रफड ओढवून नेतात.’’

भिरभिरनाऱ्या भुंग्याला,  आपल्या सुवासिक रसानं अन सुंदरश्या रंगानं,  फुलानं
जस आकर्षित करून आपलसं करून घ्यावं ना तसंच काहीस …!!
ऐकता ऐकता तिने त्याकड एकवार पाहिलं. आठवणीच्या भावगर्दीत धुंद होवून..
मनातील तळ तो उघड करत होता.

प्रेम हि भावनाच अगं ! सौंदर्यपूर्ण अशी आहे. मनाच्या डोहीतून अलवार 
तरळणारी,  हळुवार उमळणारी  अन दोन हृदयी मनाला एकाच जाणीवेच्या स्पंदनिय धाग्यानं घट्ट रोवून ठेवणारी. 
मध्यंतरीच कुठेसी माझ्या एक वाचनात आलेलं, संद्दीप खरेची एक ओळ होती. 
”आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे, याला प्रेम म्हणतात”. 
किती..साध्या अन सहज सोप्या शब्दात त्याने मांडलं आहे बघ ..!

आयुष्याच्या प्रत्येक प्रवाही वाटेवर ..मग ती वाट कितीही खडतरं अन आडवळनाची 
असो ‘एकमेकांना हव्या त्या वेळी, हवं तेंव्हा उपलब्ध होणं म्हणेचच प्रेम ’ 
अस जेंव्हा घडेल तेंव्हा नाती खऱ्या अर्थानं प्रेमाच्या गर्द सावलीत सुखाने नांदतील. पण हा तिथे मनाचा सामंज्यसपणा हि हवा. एकेमकांना समजून घेण्याची मूळ वृत्ती हवी.
हम्म ..
चल आता चहाचा घोट घे …बोलतच सुटला आहेस वेड्या सारखा ..
चहा हि थंड झाला बघ .. ( त्याच्या चेहऱ्यावरील प्रेम आवेशात गढलेले ते भाव अन बोल ऐकून..अजून त्याच्या मनास उगाच सल नको म्हणून तिने मधेच अडवून म्हटले )
असू दे रे चालेल, थंड चहा पिण्यात हि काही और मजा असते. त्याने हि शब्द ओढले.
संध्याकाळच्या शांत लहरीमध्ये … नेहमीच्याच त्या कट्ट्यावर…एका खास मैत्रिणीसोबत विषय रंगत चालला होता.
विषय अर्थात ‘प्रेम’..नकळत जीवनात आलेलं, जाणलेल अन अनुभवलेलं.

शेवटी ‘मित्र’ हेही आधारच, आपल्या जीवनाचा टेकू..म्हणून मनं हि आपुसक 

त्यांच्यापुढे मोकळं होत जातं.  तो हि मोकळा होत होता …हलका होत होता.

प्रेम ह्या विषयाची व्याप्तीच खरं तर फार मोठी आहे. ती मापता तोलता येत नाही.  ती अनुभवता येते. त्याची प्रचीती घेता येते.
चहाचा दोन एक घोट घेत त्याने पुन्हा आपल्या कथाकथनला सुरवात केली.
वाऱ्याने जसं कुठूनसं अलगद यावं अन आपलं अंग अंग रोमांचित करून जावं. तसंच हे प्रेम. ..आनंद देतं, हर्षवून नेतं.
स्वप्नांचे नवे क्षितीज घेऊन ती हि अशीच माझ्या आयुष्यात आली अन सुंदर क्षणाचा अनमोल ठेवा माझ्याकडे अलगद सुपूर्द करत ..स्वप्न पुरे केल्याविनाच एकाकी माघारी निघून गेली.

मला न समजताच…न जाणून घेता ..त्याचंच मला वाईट वाटतं अन त्रास होतो.
चुकलं कोण अडलं कोण हा प्रश्न गौण आहे. प्रेमात त्याला थारा नाही. पण हव्या त्या वेळी हवं तेंव्हा आम्ही आम्हालाच असे उपलब्ध झालो नाही. वेळेच गणित जुळवता आले नाही. त्यामुळे एकाच वाटेवर चालण्याचे आमचे मार्ग हि वेग वेगळे झाले .
तसं तिने खूप काही दिलं मला…त्या तेवढ्या वेळेत. तेच माझ्यासाठी खूप आहे.  अनमोल आहे.
म्हणून हा तिचा फोटो , त्यातील ते निरामय भाव एक सारखा असा निरखत राहतो अन आठवणीत एकाकी हरवतो .

तुला सांगू… ह्या प्रेमात खूप ताकद आहे.  ते ओढवून घेतं आपल्याला अन विविधरंगी भावनांच दर्शन घडवतं. 
एखाद्यावर हक्काने रागावण्यापासुन ,हसवण्यापर्यंत, लहानग्यासारखं एखाद 
हट्ट करून, समजून देण्यापर्यंत वा समजून घेण्या पर्यंत …. विविध ढंगी अस दर्शन..
तशी ह्या प्रेमाची गोडीच निराळी असते बघ ..
एकदा आपल्या अंतरंगात ती भिनली कि आपण आपलेच राहत नाही. उधळून जातो . मिसळून जातो.

मी ह्या प्रेमात सफल झालो नाही. पण मी ‘प्रेम भावना’ जगलो …तेच पुष्कळ आहे .
– असंच काही सुचलेलं ….शब्दात वेचलेलं .
– संकेत पाटेकर

Renewed Headphones

Shop for unboxed & refurbished headphones from top brands such as SennheiserPhilipsSonySkullcandy & more.

तुमचं आवडतं पुस्तक कोणतं ?
तुमचं आवडतं पुस्तक कोणतं ?
All-New Kindle (10th Gen)

Leave a Comment

Your email address will not be published.