प्रेम हे.. ओढावलेलं आणि आठवणींनी व्याकुळेलं

विसरलास कि विसरतोयस ?
कधी कधी सहवासाची इतकी सवय होंऊन जाते नाकि जिवाभावाची ती सावली क्षणभर  
जरी आपल्यापासून नजरेआड झाली वा दुरावली तरी मन आपलं अस्वस्थ  आणि कावरंबावरं
होऊन जातं.
अश्यावेळी काय करावं काय नाही ह्यांचादेखील विसर पडतो . कुठंच लक्ष लागेनासं 
होतं. जोपर्यंत ती व्यक्ती पुन्हा आपल्याशी संवादाने  जुडत नाही. बोलत नाही.
दोन एक दिवसापासून त्याची देखील अशीच काहीशी अवस्था झाली होती . मन एकटेपणात वेढलं गेलं होतं. एकांतात  विचाराधीन झालं होतं.
खरं तर
एखाद्या व्यक्तीशी,  जवळीक वाढली.  सहवास मिळत गेला. आणि मनमोकळा असा संवाद
ज्वर धरू लागला  कि प्रेमाचं  बीज तिथं अंकुरायला लागतं. 
त्या बाबतीत देखील  तेच 
झालं. प्रेमाचं बीज अंकुरलं जाऊन त्यांचं आता रोपटं झालं होतं. त्याच मूळ 
मनाच्या गर्भाशी घट्ट रोवलं गेलंलं.
रोजचं बोलणं,  शब्दांसंवेत हसणं अधून मधून भेटी गाठी होणंह्याने जीव ओढवला जात होता. 
क्षणाची उसंत मिळत न्हवती . ह्याचाच   परिणाम काय तो ,  
जराशी देखील चुकामुक झाली. इकडचा क्षण तिकडे झाला  कि त्याच्या मनाची अवस्था  वर खाली 
होई. जीव वेडावून जाईकासावीस होत ते ,
तिच्यविना आता  खरं तर,क्षण क्षण जगणं हि त्याला असह्य जात होतं,
तिने सतत आपल्या सहवासात रहावं . आपल्याशी मनमोकळं बोलावं बोलत राहावं .गुणगुणावंह्यासाठी मनाची एकूण धडपड सुरु राही.  हि धडपड ,  हि मनाची तळमळ तिने हि जाणली 
होती. पहिली होती. पाहत होती.
भेटीच्या  पहिल्या क्षणापासून ..
नात्यातली वाढत असलेली जवळीक वाढत असलेला 
स्नेहबंध . प्रेमभरला संवाद आणि एके दिवस.  भेटीगाठीचं ठरलेला तो  खास असा क्षण.
डोळ्यासमोर अजूनही त्याच्या जश्याच तसा उभा राहायचा.
वार बुधवार ,क्षितीजाच्या पंख-सावलीत मोहरले गेलेले क्षण.  
सहाची वेळ ,  ऑफिस मध्ये One Hour Early चा मेल टाकून धावत पळत निघालेला तो 
आणि घरातून  सहाच्या बरोबरपाच एक  मिनिट आधी त्या जागेशी येऊन पोचलेली ती …
साधीच अशी,  पण पाहताच,  कुणाचं हि  ध्यान मन हरपून जाईल अशी  …नाजुक गुलाब कळी
निळपंती रेखीव नजर मृदू हळुवार आवाज तजेलदार असा उजळकांती  चेहरा 
कमनीय देहबोली आणि मनमोकळं असं खेळतं बागडतं  मन….! 
सुदंरतेचा म्हणावा तर अति नाजूक आणि रत्नमोल दागिनाच जणू तो, …!  ईश्वरी देणच दृष्ट लागू नये 
कुणाची..कधी ! 
आयुष्यात पहिल्यांदाच असं कुणा मुलीसोबत,  जिच्यावर आपलं मन ओढवलं आहे . 
जिच्यासाठी  आपण अक्षरशः  वेडावलो गेलो आहे. त्या अश्या खास  व्यक्तीसोबत एखाद कुठला चित्रपट पाहण्याचा योग जुळून येणं,  हा आनंदच  निराळा    , ह्याची व्याप्ती अशी शब्दातहि  मांडता   येणार नाही. 
जीवसृष्टीतल्या पाखर- जीवांनी वृक्ष सावल्यांनी जसं  वाऱ्या संगे  ताल धरावा आणि आंनदाच्या स्वर लहरीत धुंद-मान व्हावे . तशी मनाची अवस्था झाली होती. तन – मन भेटीच्या ओढीनं अधिरलं आणि शहारलं जात  होतं. अवघ्या क्षणांची ती काय आता उसंत होती . 
ऑफिस मध्ये दाखल होताच ,  …लवकर निघण्याकरिता  मेल हि  केला गेला होता .  तिच्याशी बोलणं झालं होतं . 
दोन तिकीटं आधीच ऑनलाईन बुक करून झाली होती . बस्स आता पाचच्या टोळ्याची ती घडी वाट पाहत होती. लक्ष सगळं त्या येणाऱ्या क्षणांशी  वाहत होतं.  उत्कंठा प्राणपणानं जणू झपाटून गेली  होती . 
आदल्या दिवशीचा तो संवाद 
लडिवाळ शब्दसंख्यांची जादुई मोहर त्यात 
येऊन ठाकलेल्या चित्रपटा विषयक केलेली चर्चा आणि त्याच चित्रपटाच्या शो ला एकत्रित जाण्याचा दोघांचा  तो नेमका  कट,  हा निव्वळ  योग,  नियतीच्या संमतिनेच तर ठरला जात  होता . 
क्षणाचा हि  विलंब न घेता तिने हि होकार देऊन आनंदची  व्याप्ती वाढवली होती . 
सगळं कसं जुळून आलं होतं. स्वप्नवत पण सत्य ..
बस्स आता अजून एका निर्णयाशी ठाम व्हायचं  होतं .   मोठं धाडस करायचं होतं. त्यानेच  धाकधूक वाढली होती.   
क्रमश : 
– संकेत पाटेकर 


Leave a Comment

Your email address will not be published.