प्रेम म्हणजे नुसतंच काही बाह्य सौंदर्य नाही.

प्रेम म्हणजे नुसतंच काही बाह्य सौंदर्य नाही. पाहताच क्षणी एखाद्याच्या प्रेमात पडणे म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या दिसण्यावर, त्याच्या सौंदर्या वर प्रथम लुब्ध होतो. ते आपल्याला आकर्षित करतं पण ते काही प्रेम न्हवे. प्रेम म्हणजे म्हणजे मना मनातल्या गोष्टींच सहजरीत्या पण हळुवार तयार होणारं ..
समजुददारपणाचं रसाळ मिश्रण. 

दोन व्यक्ती मध्ये जेंव्हा मना मनाचं समजुददारपणाच, आपुलकीच नातं जुळत तेंव्हा त्यात कुठे प्रेमाचा ओलावा निर्माण होतो. तेच ते प्रेम .

मना मनातल्या गोष्टी समजायला समजून घ्यायला वेळ हा हवा असतोच आणि तो द्यावाच.
एखाद्या व्यक्तीच्या सुंदर दिसण्यावरून जर तुम्ही प्रेम प्रेम करत असाल.
तर ते प्रेम न्हवे.  पण हल्ली असंच काहीस घडतंय आणि त्यातून लग्नाच्या बेड्या बांधल्या जातायेत.

मना मनाला समजून घेण्या आधींच लग्नाच्या बेड्यात दोघे बंदिस्त होतात.
आणि नंतर सुरु होते ती हात घाईची लढाई . एकमेकांशी पटेनास होत. शुल्लक कारणावरून रोज वाद विवाद घडू लागतात.

त्यात इतर अडचणींची , इतर व्यक्ती समस्यांची भर पडते . मन त्यात खचल जातं.
मानसिक सुखच हरवून जातं .  तन – मन सर्वच तणावा खाली वाहू लागतं. आणि त्यातच मग अविचारंच जाळ पसरल जातं आणि एकमेकांपासून दूर होण्याची दुर्बुद्धी सुचते.
त्यात बिचारी सच्चे मनाने बंधनात अडकलेली व्यक्ती हताश होवून जाते , आणि तिच्या सोबत तिचे नातेवाईक मंडळी हि…

लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ न्हवे. खेळायचं अन सोडून द्यायचं.  वाट्टेल तेंव्हा …आणि प्रेम म्हणजे हि काही नुसत बाह्य सौंदर्य न्हवे कि दिसलं अन जडलं. 
प्रेम म्हणजे नातं मना मनाच्या सौन्दर्याच . ते सौंदर्य कायम जपावं लागतं. तरंच ते प्रेम प्रेम ठरतं. 

प्रेम म्हणजे नुसतंच काही बाह्य सौंदर्य नाही.

– संकेत पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.