प्रेम.. प्रेम असतं..

प्रेम.. प्रेम असतं..

प्रेम पाहायला गेलं तर अवघे दोनच शब्द आहेत. हे ‘प्रेम’ पण त्या शब्दात किती भव्यता आणि विशालता दडलेय.

प्रत्येकजण आपआपल्या आयुष्यात ‘प्रेम मिळावं म्हणून किती धडपडत असतो. तळमळत असतो. रडकुंडीस देखील येतो. कारण प्रेम हे जीवन आहे. जगण्याची एक कला आहे. शक्ती आहे. प्रेरणा आहे.

जीवनात सर्वांनाच प्रेम मिळत नाही. सर्वांच्या भाग्यात ते नसतं. कुणी वंचित राहतो, आईच्या प्रेमापासून, कुणी वंचित असतो बहिणीच्या मायेपासून, तिच्या प्रेमळ सहवासापासून, कुणी वंचित राहतो वडिलांच्या कठोर पण तितक्याच प्रेमळ छायेपासून, कुणी वंचित राहतो भावाच्या खेळकर , खोडकर आणि प्रेमळ सहवासापासून..

प्रेम प्रेम असतं. सर्वांनाच ते हवं असतं. नशिबात मात्र कुणाच्या ते असतं तर कधी नसतं. दु:ख त्याचच तर फार असतं.

  – संकेत पाटेकर

Leave a Reply

Your email address will not be published.