प्रेम कुणावरही करावं..कुणावरही

आणि अजून एक बोलायचास… 
ते तू विसरलास ? ”
” काय….? काहीसं प्रश्नांकित होंऊनच त्याने तिला विचारले ”
”काही नाही जाऊ दे…”
”अगं सांग.. ”
”काही नाही ….”
”तुझ्या लक्षात नाही ते …सोड ” 
”अगं …..,
लग्नानंतर कित्येक दिवसाने दोघांमध्ये मोकळा असा संवाद सुरु होता. 
म्हणावं तर लाडीगोडीचं भांडण जुंपलं होतं. 
जणू आयुष्यतल्या त्या गोड स्वप्नील क्षणाची हि पुनवृत्तीच …
खरंच , प्रेम हे सर्वांग सुंदर आहे.
त्याला मरण नाही, त्याचं अस्तित्व हे हृदयात कुठेशी आत आत साठलेलं असतंच आणि तेच असं वेळोवेळी वर उफाळून येतं , व्यक्त होतं जातं . मनाला सुख दुःखाच्या चौकटीत बांधून ठेवत . 
आठवणींचं हि तसंच ….तेच ,
उदबत्तीच्या धुपगंधाप्रमाणे आपल्या ह्या भावना असतात . एकदा का हा भावनांचा मोहर उधळला कि शब्दमोत्यांची पाकळी हि हळुवाररित्या…मोकळी होत जाते.
रात्रीच्या गर्द एकांतात संवादाचा परिमल दरवळत होता. दोघेही व्हाट्सपवर एकमेक्नाशी बोलण्यात दंग झाले होते. 
इकडं तिकडच्या गप्पात वेळ भुर्रकन त्याचा तो पुढे सरत होता. 
आपल्या अस्तित्वाची जणू ग्वाही देत , 
”चला रे झोपून घ्या निजा आता ….चला …”
तासभर बोलून निरोप घ्यायच्या तयारीत …त्याने , 
”Gnsdtc & kps…” असा मेसेज केला . 
आणि त्वरित त्यास रिप्लाय मिळाला. 
”Kps म्हणजे ? ”
विसरलीस ? 
” लग्नाआधी पण मी बोलायचो ? ” 
”नाही…..”
” अगं हो …”
” मला आठवत नाही..” 
” श्या….विसरभोळी…श्या श्या श्या ”
😉 
” सांग ना ? ”
” Kps म्हणजे Keep Smiling …”

” ओह्ह ….
” हं…
” इसरलीस इसरलीस .. हाहा …
आणि अजून एक बोलायचास 
ते तू विसरलास ?
” काय …?” काहीसं प्रश्नांकित होंऊनच त्याने तिला विचारले . 
” काही नाही जाऊ दे…”
” अगं सांग.. ‘
‘ काही नाही ….’
‘तुझ्या लक्षात नाही ते …सोड, 
” अगं …..
” बोल..
” येडे बोलते कि नाही .” : तो रागाने
(ती : काहीसा श्वास रोखून …. थोडं थांबून ..)
”आय लव्ह यु …..” असं बोलायचास तू …
”हाहाहा .वाटलंच मला …”
पण त्याच कारण देखील तुला माहित्ये , म्हणजे लग्नानंतर ते योग्य नाही किंव्हा तुला आवडणार नाही वगैरे ? 
हो , तरी…देखील? रोज थोडी बोलतोस ..
हो , बोलू शकतो पण तुला नाही आवडलं तर ..?
प्रेम करणारी माणसाचं फक्त ”आय लव्ह यु” म्हणतात का ? तिने सवाल उपस्थित केला . 
हो , कारण ते प्रेम असतं , कुणाचंही कुणावर हि असो …
अरे तसे नाही . म्हणजे ज्यांचं लफडं असतं तेच बोलतात का ?
असं काही नाही ग ,
प्रेम हे सर्व स्तरावर करता येतं. कुणावरही करता येतं . ते क्षण काळ पाहत नाही. ते फक्त आतलं माणूस जाणतं. आणि त्यावरच ते भूलतं आणि आपलेपणाने …त्यात मिसळून जातं. काळ मर्यादा सारं विसरून जातं .
आय लव्ह यु डिअर …
आय लव्ह यु टू…
गुड नाईट . ..
आपलं म्हणण्यात आणि आपलंस होऊन जाण्यात एक वेगळाच आनंद असतो . है ना ? 
कुणीतरी आपल्याशी अजूनही त्याच भावनेशी जोडलं गेलेय हि भावनाच खरंच खूप सुखदायक असते . मनाला सदा टवटवीत करणारी , मन आनंदात न्हाऊ घालणारी …खरंच ,
तिच्या लग्नानंतर… आज तो प्रथमच मोकळेपणानं बोलला होता आणि ती हि , त्याचं मोकळेपणाने वाहून निघाली होती . 
प्रेमाला मरण नाही आणि मैत्रीला खरंच तोड नाही . 
त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम…आजही तो जपून होता . आणि हे… तिला देखील ठाऊक होतं. 
वैवाहिक नात्याने जरी, ती त्याच्या आयुष्यात आली नसली , तरी मैत्रीच्या अनमोल नात्यात , ती दोघे केंव्हाच एकजीव झाली होती . 
आणि त्याच विश्वासानं ….भावनांचा हा अस्तर , आज उधळला गेला होता .
प्रेम कुणावरही करावं, कुणावरही …बस्स आपलेपणा राखून ….
कुसुमाग्रजांच्या ओळी अश्यावेळी सहज ओठी येतात.
प्रेम योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं…
सहज लिहता लिहता..
@ संकेत पाटेकर 
२७/०४/२०१८

Leave a Comment

Your email address will not be published.