प्रिय आई …

प्रिय आई …

प्रिय आई …,
साष्टांग  दंडवत ,
आज पुन्हा एकदा  तुला पत्र लिहायला घेतोय . बऱ्याच  दिवसाने …रागावू नकोस हा ..
तुझी आठवण सदाच असतेच  अगं  !   सावली होवून  तू नित्य नेहमी सोबतच असते म्हणा…
पण तुला ठाऊक आहे ?  आज एक खास दिवस आहे. फार महत्व आहे अग त्याला . त्या दिवसाला .
कोणता माहित आहे. ? ‘मातृ दिन’ . MOTHER’S DAY..!
जन्म दात्या ‘आई’ साठी तिच्या प्रेमापोटी , भक्तीभावाने वाहिलेला एक दिवस. 
जगभरात साजरी केला जातो अगं  ..!
कुणी आपल्या आईसाठी काही भेटी गाठी देऊन. कुणी प्रेमाचं प्रतीक असलेलं,  गुलाबचं एखाद  फुल देऊन .  कुणी तिला बाहेर कुठे फिरायला घेऊन जाऊन,   आपल्या आई बद्दल,  तिच्या प्रती असलेल प्रेमं व्यक्त करत असतं. तसं प्रेम व्यक्त करायला  एखाद  ठराविक दिवस असायलाच  हवा  अस काही नाही . 
पण तरीही ठीक आहे ना  , काय होतंय …
असो, 
वयाने कितीही मोठो झालो तरी , आईसाठी आपण तीच  अगदी  छोटं तान्हुल बाळ असतो. 
अन म्हणूनच लहानाचं मोठे झालो असलो तरी हि एखाद वेळेस आपण मुद्दाम तिच्या कुशीत जाऊन अलगद पडून राहतो. मायेच्या पंखाखाली  वात्सल्याची उब घेत .
तेंव्हा कसलीच चिंता नसते . ना कसले दुख …. ते सर्व्वोच क्षण असतात .
जीवनातल्या अथांग सागरातले …स्थिर असे….!
लुडबुड  न करणारे , हवेहवेसे ..हसरे , आनंदा पलीकडचे ..हो ना…
पण आई , ऐक ना ,  कित्येक दिवस झाले बघ ..,मी ह्या क्षणापासून पोरका झालोय अग  .
तू अशी दूर , नजर ठेवून आहेस. आम्हावरती ..
”मी कुठे हि असली तरी  तुमच्य्वार  नजर ठेवून असेन.”  अस म्हणून तू रागावून  कुठे गेलीस ती गेलीस . 
पुन्हा न परतण्यासाठी..
पण कधीतरी तुला,  तुझ्या पिल्लाना कवेत घेउस वाटत  असेलच   ना ..,
सांग…येशील ना  परत….., तुझ्या पिल्लांसाठी .
तुझ्या उबदार कुशीत शांतपणे  निजायच आहे अगं..! 
तुझा मायेभरला प्रेमळ स्पर्श. …ते धीरदार (धीर देणारे ) , कष्टाने झिजलेले तुझे नाजूक कोमल हात  ,
हळुवार केसांतून  भिरभिरताना    ..किती बर वाटायचं सांगू…
ते क्षण आठवले कि आजही तुझा हात  अलगद केसातून फिरत  राहतो .
किती सौख्य आहे अग त्या स्पर्शात  . सुखाची व्याख्या ह्यावूनी वेगळी  करता  येईल का ?
‘मायेचा स्पर्श’ सगळे ‘क्षण कसे हलके फुलके बनवितात . वेदना  दु:ख ह्याना तिथे थारा नाही. 
एखादी भळभळती जखम सुद्धा ‘आनंदाचे गायन’ करत चिडीचूप होईल .
इतक सामर्थ्य  , इतकं प्रेम त्या मायेच्या अलगद होणर्या स्पर्शात असतं .
‘प्रेमाची’ उत्पत्ती मुळात ‘आई’ ह्या रुपान च झालेय  जणू  .
ती अवतरतली अन प्रेमाचं वारं भिनभिनू  लागलं सर्वत्र…,  मग ती हि ‘पृथ्वी’ रुपी आई का असो .
ती आई आहे . वात्सल्य मूर्ती आई…
माधव ज्युलिअन  ह्यांनी त्यांच्या कवितेतून ..लिहूनच ठेवलंय. 
‘प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई”
फ. मुं. शिंदे हि म्हणतात .
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.
खरच गं  …
आईच हे नातंच  अस आहे . श्रेष्ठत्वाच ..,,त्याला तोड नाही. त्याहुनी कुणी मोठ नाही.
बघ ,  हे मी कुणाला सांगतोय .  एका गोडश्या , प्रेमळ अश्या माझ्या  ‘आई’ लाच  ‘आई’ ची महती सांगतोय.
वेडा आहे ना मी ,..  तुझाच  तान्हुला  गं ..! समजून घे ..घेशीलच. 
अन ये पुन्हा …तुझ्या ह्या लेकरूसाठी…वाट पाहतोय .
हैप्पी मदर्स   डे……मातृ दिनाच्या शुभेच्छा…!  
तुझ्या पोटी मी जन्म घेतला हे माझं भाग्य .., अन हे भाग्य मला प्रत्येक जन्मी मिळू दे.
लव्ह यु आई… ,
खूप खूप खूप सारं प्रेमं  ..!
तुझाच  तान्हुला  गं,
तुझ्याविना जगतोय ,
मायेच्या स्पर्शाविना
पोरकपणं  वाटतयं !
तुझाच लाडका,
…………

नातं तुझं माझं 

असच लिहिता लिहिता…
– संकेत य पाटेकर 
१०.०५.२०१५

Leave a Reply

Your email address will not be published.