प्यार हमें किस मोड पे ले आया..

आपण कधी,  कसे आणि कुठल्या मूड मध्ये जाऊ ना  ह्याचा खरंच काही नेम नाही ओ..
आपल्या ह्या बहुरंगी आणि बहुढंगी मनाची अवस्था हि सतत बदलतचं असते. क्षणारूपे, क्षणासंगे..ना ना रंग रूप धारण करत.

त्यामुळेच कधी कुठे हास्यचा नुसताचं खळखळाट होतो तर कधी नुसतीच निरागसता दाटून येते. कधी एकवटलेले गहिरे क्षण भरून येतात.  कधी …काय नि कधी काय..
सांगता कुठे येतंय..

आता हेच बघा ना…

सहा वाजले तसं ऑफीमधून निघायचं म्हणून मी माझं डेस्कटॉप आवरतं घेतलं आणि सर्व जागच्या जागी जिथे तिथे आहे नं हि खात्री घेत वॉश रुममध्ये दाखल झालो. आरश्यासमोरच स्वतःला नीटनेटकं आणि जरा टापटीप केलं. आणि कुठल्याश्या धुंदीतच जुन्या गाण्याची लय साधत आणि शब्द ओठावर घेत बाहेर पडलो.
अंगात ज्वर भरावा तसा तो हिंदी गाण्याचा ज्वर माझ्या अंगी भिनला होता जणू ,
मोठ्या मोठंयाने गुणगुणत होतो..

” प्यार हमें किस मोड पे ले आया..
ये दिल करे..”
अगदी हातवारे करत,
आपल्या समोर कंपनीचे डायरेकटर उभे आहेत,  ह्याचं देखीलं भान उरलं न्हवतं. इतपत धुंद झालो होतो.

सरांनी तेचं पाहिलं.
आणि तेंव्हाच माझी हि नजर गेली.
झालं ..क्षणात बोलती बंद.  गाणं कुठल्या कुठे दडून बसलं. सगळे भावरंग ऐटीत गुडूप. फक्त नि फक्त हास्याचा उनाड मोकळा रंग उधळला गेला होता.

क्या संकेत, फुल जोश मे…हा..!!

सरांना हसू खरं तर आवरतं न्हवतं, पण स्वतःवर ताबा ठेवत त्यांनी माझ्यावर नजर रोखली. बाजूला उभे असलेले दोघे हि आतल्या आत मोकळा आनंद घेत होते.
मी मात्र तोंडावर हात ठेवत तिथून काढता पाय घेतला आणि ऑफिस मधून बाहेर पडल्यावर पुन्हा स्वतःवर हसत..चालतंय यार.. त्यात काय असं म्हणत पुन्हा गाणं गुणगुणू लागलो…

”प्यार हमे किस मोड पे ले आया…”
चला बोला माझ्या मागोमाग..

 – संकेत पाटेकर

1 thought on “प्यार हमें किस मोड पे ले आया..”

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »