पुस्तकासारखा मित्र नाही असं म्हणतात आणि ते खरंच आहे म्हणा, खूप काही नवीन , रोचक, रहस्यमयी, ज्ञानवर्धक अश्या गोष्टी तो आपल्या ज्ञानकोशातून आपणास सांगत असतो. कथन करत असतो, आपल्याला एकप्रकारे घडवत असतो. दिशा मार्ग दाखवत असतो. जगाची भौगोलिक सफर घडवून देत असतो, कवितांची मैइफिल तर कधी विज्ञानाची चिकीत्सा करवत असतो.
पण अश्या ह्या पुस्तकी मित्राचा हि लोकं अनेक प्रकारे गैर फायदा घेतात, लपाछुपीच डाव मांडतात,
नको ते दडवून ठेवतात. स्वतःच्या सुटकेकरिता, मोकळ्या श्वासाकरिता,
हे काल प्रकर्षानं अधोरेखित झालं. 😛

म्हणजे त्याच काय झालं, रोजच्या शिरस्त्याप्रमाणे ऑफिस मधून सुटल्यावर ग्रंथालयात दाखल झालो. हाती असलेलं ‘प्रतिंबीब’ हे (वाचून झालेलं ) पुस्तक बदलून दुसरं घ्यायचं होतं.
तेंव्हा ग्रंथालयातल्या पुस्तकीय दालनात..नजरेला येईल ते पुस्तकं एक एक चाळत असता,

” दि कॅचर इन दि राय ” – जे. डी सॅलिन्जर, अनुवाद – संजय भास्कर जोशी ह्यांचं पुस्तक नजरेस पडलं.
ते हाती घेतलं, उघडलं आणि पानं उलटता-पलटता हे असं काही अनोखं समोर आलं. त्याने क्षणभर अवाक झालो आणि हसणं हि ओघानं आलं.

म्हणजे आतापर्यंत मी पुस्तकामध्ये घरगुती ( विजेचं बिल, किराणा बिल ) ईतर बिल्स वा कुठली लिहलेली पत्र वा पिंपळाच पान वगैरे अश्या गोष्टी ठेलेल्या पाहिल्यात…
पण हे असं… वेगळंच आणि अनोखं ..
बघाच तुम्ही …

बकार्डी व्हाईट रम ..ते हि दहा हजार ओ ….

पुस्तक आणि रम

– संकेत पाटेकर

All New Kindle : Check Offer Price

Leave a Reply

Your email address will not be published.