पावसाळी ‘सोंडाई’ दर्शन

पावसाळी ‘सोंडाई’ दर्शन

 
कर्जत पासून अगदी हाकेच्या अंतरावरं,  साधारणता  अकरा  एक किलोमीटर वर असलेला सोंडाई किल्ला, आता बर्यापॆकी तसा   सर्वांना परिचयाचा आहे. असं  म्हणालो तरीही,  त्यात काही  चूक ठरणार नाही. काल  भेटीदरम्यान तो अनुभव घेता आला.
 
 हा किल्ला म्हणायला छोटेखानी.. विस्ताराने तसा  लहान… 
सोंडेवाडी ह्या वस्तीपासून पासून.. साधारण १ तासाच्या , वळणदार  उभ्या आडव्या चढणीचा  , माथ्याशी पाण्याचं टाकं ( जोड टाकं  आणि एक खांब टाकं) एवढे  अवषेश , विशेष पाह्ण्यातले, आणिक सोंडाई देवीचं ते  मंदिर,
मोकळ्या आभाळाखाली ,   उन्हं  वाऱ्याच्या भिंतींनी उभं असलेलं आणि  वृक्ष राजीचं कळस लाभलेलं ,  तसेच पक्षी पाखरं आणि प्राणी मात्रांच्या   चौकी पहाऱ्यात निगा राखून असलेलं आणि  गावकऱ्याचं विशेष श्रध्द्स्थान असलेलं . मंदिर…
 
पाह्ण्यातलं इतकंच जरी असलं,  तरी सृष्टी सौन्दर्याने आसपासचा परिसर अगदी नटाटलेला आहे.
दूर आकाशी डोकावलेला  इर्शाळ गड – वेडा वळणाने विस्तारलेला मोरबे धरण..वावरले धरण ,  माथेरानचे पठार आणि घनदाट हिरवाईने पांघुरलेलं अवतीभोवतालच रानवन…आणि डोंगर कैचीतून वाहणारे शुभ्र फेसाळ धबधबे …
काल हे सगळं अनुभवता आलं ….
 
 सोंडे वाडीतून सुरु केलेली  आमची वाटचाल …गडमाथा फिरून घेत, पुढे वावरले गावाशी  .. घनदाट वृक्ष राजींच्या कमान वेढीतून मार्ग काढत काढत पुढे ..हायवेपर्यंत स्थिरावली गेली.  पावसाच्या रिमझिम सरीत न्हाऊन .. मौज मस्तीचे क्षण गाऊन …परतीचा आमचा प्रवास फार हा आनंदाने उधळला गेला.
म्हणेजच आम्हीच उधळून दिला….
त्याच कथन .
 
 
पावसाळा म्हटलं कि सर्वत्र हिरवाईचा रंग उधळलेला दिसून येतो. पावसाच्या उन्ह खेळीमध्ये , इंद्रधनूच मिळणार ते अवचित दर्शन, कड्या~कपारींतुनि कोसळणारे अवघळ धबधबे, खळखळून वाहत झुलणारी नदी, ओहळ आणि वृक्षराजींच्या पानां फुलांत गर्द मिठीत विसावलेली , मोत्यावाणी टपोर थेंब. हे कसं सगळं मनाला सुखवणारं असतं. मोहित करणारं असतं.

आणि अश्या ह्या आल्हादायक सुखकारक आणि आनंदायी वातावरणात आपुल्या सह्याद्रीची साद आपल्याला न खुणावेल तर नवलच म्हणायला हवं.
म्हणूनच तर आपली पाऊलं वळतात ती आपल्या सह्य वाटेकडे …ह्या दुर्ग किल्ल्यांशी …!
मनात शिवप्रेरणा जागी करत …
आणि त्याने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत… शिस्तीचं बाळकडू उगाळत .

(हा सह्याद्री जसा सर्वांग सुंदर, तसा तो रौद्र भीषण हि आहे. हे ध्यानी ठेवूनच चालावे . )

प्रति – १
कर्जत पूर्वेकडून ३५० / – च्या भाडयावर टमटमने आम्ही सोंडाई वाडी साठी रवाना झालो .
बोर फाट्याशी वळण घेत , पुढे सोंडाईवाडी कडे चढाई करताना ..टमटम मधून टिपलेला फोटो .

विस्तारलेला मोरबे धरण आणि मंदिर ..
ओळखा पाहू किल्ला कुठला
क्षितिज सावल्या

                                         
प्रति – 2
 प्रति – 3
पावसाळा सुरु झाला नि शेत माळ्यातिल कामाला अशी सुरवात झाली. हिरवाईच्या रानझुल्यात सोनं  पिकवणारं ..शेतकरी
 
प्रति – 4
साधारण  ९ च्या आसपास आम्ही सोंडेवाडीत पोहोचलो. 
(ह्या फलकापासून उजवीकडची वाट आपल्याला किल्ल्याशी घेऊन जाते .)
प्रति – 5
बरोबर ९:१० ला आम्ही ट्रेक ला सुरवात केली. तेंव्हा काळ्या पांढुरक्या ढंगानी गडाला असा वेढा घातला होता .
 
प्रति – 6
सोंडेवाडीतूनच पुढे  ….
 

 प्रति – 7
पावसाच्या रिमझिम आणि सरसर सरी अंगावर घेत आम्ही असं पुढे निघालो.  

प्रति – 8
पावसाच्या  आगमनानं  रानोमाळ उधळलं गेलं  होतं . कातळ हि .. नितळ पाऊस सरींनी न्हाऊन ..लक्ख  तुकतुकीत झालेलं ,  त्यावर हळुवार पाय रोवत आम्ही पुढे निघालो . 

प्रति – 9

प्रति – १0
एकीकडे मोरबे धरण आणि एकीकडे आकाशी उंचावलेला ईर्शाळचा सुळका नजरेच्या बरोबर टप्प्यात येत होता. त्यात गडाभोवती पसरलेली घनदाट वृक्ष राजींची हिरवाई मनाला सुखावून जात होती.

 प्रति – 11
शेतमळ्याच्या सहवासात गंधालेली हि खेडी पाडी..
 
प्रति – 12
ढगांनी आच्छादलेला पठार ..
 
प्रति – 13
साधारण तासाभरातच .. आम्ही गडाच्या माथ्याशी पोहोचलो. तेंव्हा टिपलेलं, सृष्टीचं हे विहंगमय असं दृश्य ..

प्रति – 14

प्रति – 15
गडाशी पोहचताच पाण्याचं जोड टाकं दिसलं. पावसाच्या पाण्याने उतू जात असलेलं ..

.प्रति – 16
तिथूनच पुढे … माथ्यावरच्या सोंडाई देवीशी घेऊन जाणारा हा डोंगर …
इथेच लोखंडी  शिड्या बसविल्या आहेत ..

 प्रति – 17
 गावकरयांच  विशेष  श्रध्द्स्थान..! गडाची देवता …,! 

प्रति – 18
सोंडाई च्या माथ्याशी आम्ही क्षणभर विश्रांती घेतली आणि अवताल भोवताल असा निरखू लागलो ..

  प्रति – 19
अवती भोवतालचा प्रदेश …
प्रति – 20
येताना सोंडेवाडीतून कूच केले होते आता वावरले गावातून पुढे व्हायचे होते.
समोर दिसत असलेल्या वावरले धरणापर्यंतचा टप्पा आता गाठायचा होता. घनदाट रानवनातून .. त्यामुळे क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही लगेचच परतीच्या मार्गाला लागलो.

प्रति – 21
आल्या त्या वाटेने पुन्हा …..                                                            

  प्रति – 22                         

प्रति – 23  

 प्रति – 23          

प्रति – 24
येताना सोंडेवाडी आणि जाताना वावरले गाव हे आधीच ठरलं असल्याने ..हि दुसरी वाट पकडली .
घनदाट वृक्ष राजीनी व्यापलेली …

प्रति – 25
काही अंतराच्या  पायपिटीने आपण  इथे येऊन पोहचतो .  डोंगराची हि  बेचकी लक्षात ठेवायची आणि  पुढे वळायचं ..

 प्रति – 26
 वावरले  गावाशी जाताना , झुळझुळ वाहणारे असे लहान सहाण प्रवाह .. आपल्या आडवे येतात. किंव्हा आपणच  त्याच्या आडवे येतो. …
त्यातही मनसोक्त आनंद लुटायचा ..वेळेचं भान ठेवून..

प्रति – 27
जिथे आपण ..काही क्षण आधी होतो …तोच ‘माथा’ पायथ्यापासून, असा वेगळ्या अंगाने असा पाहणं.
हा अनुभव सोहळा ज्ञानात भर टाकणारा असतो. म्हणूनच वेगवेगळ्या वाटा जाणुनी घ्याव्यात. 

 
प्रति – 28
रानवनातून बागडलं कि सृष्टीतल्या अश्या लहान सहाण गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात. त्यांच्या त्या आकर्षक , सर्वांग सुदंर… अश्या आकार रूपानं.                                                        
 

 पाऊस पाण्याने मुरलेल्या मातीतून आणि गर्द हिरव्या वृक्ष  वेलीतून असा मार्ग काढत जाणे. …हा आनंद  काही  और असतो….. 

प्रति – 30
जवळ जवळ  दोन तासाची पायपीट करत..  आम्ही घनदाट अरण्यातून एका पठाराशी दाखल झालो.  तेंव्हा क्षणभर घेतलेली विश्रांती ..

प्रति – 31

सोंडाई वेगळ्या अंगाने …

 प्रति – 32
सोंडाई वेगळ्या अंगाने ..

                   
पावसाळा असल्याने रानावनातील पायवाटांनी , आपलं अस्तित्वच  काही ठिकाणी पूर्णतः  मिटवलं होतं. त्यामुळे मार्ग काढत आम्ही योग्य ठिकाणी पोहचते झालो . आणि क्षणभर विश्रांती घेऊन असे विसावलो . सृष्टी सौन्दर्याचा नजारा डोळ्यात सामावून घेतं…
(समोर दिसतोय तो इर्शाळ सुळका ..)
 

प्रति – 34
दोनच्या आसपास आम्ही (वावरले )ठाकूरवाडी गावाशी होतो . तिथून पूढे अर्धा पाऊन तास ..पावसाच्या संगीतानं …ओलंचिंब होत ….काळ्या डांबरी रस्त्यावरंन हायवेशी स्थिरावलो.
तिथून मग टमटम करत कर्जत.

 

एकंदरीत आमचा प्रवास.. पावसाच्या संगीतानं त्याचं कृपेने आनंदाने बागडत खेळत झाला.
सोंडेवाडीतून वर माथ्याशी जाईपर्यंत धो धो कोसळणारा हा वेडाळ पाऊस ..माथ्याशी गेलो तेंव्हा अगदीच चिडीचूप म्हणजे शांत झाला होता.
हि सारी सृष्टी हि जणू त्याच्या मोहरत्या स्पर्शाने धुंदमंद होंऊन डवरली गेली होती .
मी हि आपला तो निवांत झाल्याने कॅमेरा च्या मोहात सृष्टीचे ते भाव चित्र सामावून घेतं होतो…
निसर्गाचीच हि उब मायेच्या ममत्वेसारखीच मायाळू असते बघा…

परतीच्या प्रवासातही वावरले ठाकूरवाडीपासून ते हायवेपर्यंत त्याने पुन्हा मुसंडी मारल्याने आम्ही त्याच्याच मस्तीत दंग ओलेचिंब होतं आनंदात न्हाऊन गेलो. सुखावलो.

 

एकूण खर्च प्रति व्यक्ती : २१० /-
(अर्थात येताना …व्हेज -नॉनव्हेज हे खाण्याचे प्रकार झाल्याने खर्चात जरा वाढ झाली. )
टमटम (सात सीटर) : कर्जत ते सोंडेवाडी – ३५०/- (एकूण प्रवाशी ७ )
लागणार वेळ : अर्धा पाऊण तास ..
सोंडेवाडी ते गडमाथा – १ तास
गडमाथा ते पायवाट (सोंडेवाडी ते वावरले एकत्रित जुळणारी पायवाट ) – पाऊण एक तास
पायवाट ते वावरले ( रानावनांतून ) – २ तास
वावरले (ठाकूरवाडी ) ते हायवे – पायपीट – एखाद तास
वावरले (हायवेपासून ) – कर्जत ( टमटम ने )
प्रत्येकी १० रुपये …

सहभागी मित्रावळीची नावे : यतीन
कला
रश्मी
तेजा
रोहन
रुपेश

आणि मी ….

(हा सह्याद्री जसा सर्वांग सुंदर, तसा तो रौद्र भीषण हि आहे. हे ध्यानी ठेवूनच चालावे . नियमांचे आणि शिस्तीचे पालन करावे.)

 

 
 

0 thoughts on “पावसाळी ‘सोंडाई’ दर्शन

  1. आपला अमूल्य असा वेळ देऊन ब्लॉग वाचल्याबद्दल आणि ह्या छानश्या अश्या प्रतिक्रेयेबद्दल मनापासून धन्यवाद ..!

Leave a Reply

Your email address will not be published.