पान्हा…

तशी ती कायमच सोबत असते…इथे ह्या हृदयाशी.. पण तरीही,
तिची कमी कधी जाणीवली की नजर , सर्वत्र तिचा शोध घेत फिरत राहते. 
मग रस्त्याने चालता असता…
दिसणारी एखाद दुसरी स्त्री ही , ती ..
मग ती कुणीही असो, तिच्यात तिचं प्रतीबिंब हुबेहूब उमटलं जातं. चेहरा हृदयाशी उभा होतो.

कानी धरलेले ते बोल नव्याने पुन्हा स्पर्शू लागतात.

इथे ह्या हृदयाशी..
पण तरीही,
तिची कमी कधी जाणीवली की नजर , सर्वत्र तिचा शोध घेत फिरत राहते. 
मग रस्त्याने चालता असता…
दिसणारी एखाद दुसरी स्त्री ही , ती ..
मग ती कुणीही असो, तिच्यात तिचं प्रतीबिंब हुबेहूब उमटलं जातं. चेहरा हृदयाशी उभा होतो. कानी धरलेले ते बोल नव्याने पुन्हा स्पर्शू लागतात.

‘ संक्या ..अरे संकेत ,
मनातल्या आर्त हाकेला जणू ती लगेचच प्रतिसाद देऊन मोकळी होते, मन.. त्या ओढीनेच म्हणूनच दौडत पुढं सरतं.
तिच्याजवळ , आणिक आणिक जवळ, नजरेशी नजर मिळवत,
हळूच एक एक पाऊल पुढे होत ,
ती भरल्या नजरेनं ,आर्त ओढीनं पाहत राहते.

मी ही एकटक पाहत राहतो. क्षण क्षणाशी मिसळून जातात. आभाळ भरून यावं तसं,
डोळे ही आसवांनी भरून येतात. तिचे अन माझे ही ,
किती दिवसां नंतरची ही भेट बरं , माझ्या संक्या रे, 
कुठं होतास ? 
नाजूकश्या प्रेमळ हाताने , हळूच मग ती माझा चेहरा कुरवाळून घेते , कडकडून बोटं मोडते. काहीतरी बोलून जाते ,वेड्यावनी मुका घेत.
तेंव्हाच मी तिला…घट्ट बिलगतो. 
ममत्वेने भरलेल्या तिच्या कुशीत शिरतो, ओरडतो, किंचाळतो, रडतो.
आई…. आई ..
एकच हृदयी पान्हा फोडत…
.
.
.
.
क्षणभराचाच भास..
नजर अशीच आसवांनी वाहत जाते…
पाऊस भिजवूनि नेतो मी भानावर येतो…

मैं जहाँ रहूँ, मैं कहीं भी हूँ तेरी याद साथ है….

संकेत पाटेकर-

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »