! पाऊस मनातला …पाऊस आठवणीतला !

सकाळपासूनच साऱ्या सृष्टीवर मनावर सरसरनारा हा धुंद पाऊस…
‘मनसोक्त भिजून घे रे ‘ अस जणू काही वेडावूनच सांगत होता . पण मी आपला स्तब्ध ,  एकाच जागी . ..अधीर मनानं सृष्टीच्या ह्या नवंलाईचं रूप डोळ्यात साठवत होतो . त्याशिवाय पर्याय हि न्हवता म्हणा . म्हणावं तर हे तनं मनं तर केंव्हाच आतुरलं होतं . चिंब भिजावं , मनसोक्त बागडावं म्हणून ..पण ठरली ऑफिस वेळ, नाईलाज …. काय करणार ..!

खिडकीतून दिसणारा , झाडांच्या पाना फांदीतून ओघळनारा , टपटपनारा , मोत्यावाणी 
नितळ असा तो थेंबे थेंबे पाऊस मी नजरेनेच काय ते टिपत होतो .
नजरेनेच प्राशन करत होतो. पण तरीही हे मनं काही तृप्त होईना .
अन त्याह्यानेच दुपारच्या मधल्या सुट्टीत (लंच ब्रेक मध्ये ) पावसाच्या रिमझिमत्या टपोऱ्या 
थेंबाचा मारक स्पर्श , अगा खांद्याशी घेऊ लागलो . त्याने काहीसा सुखावलो… वेडावलो . अन निच्छलं मनानं एका  ठीकान्याहून सृष्टी सौंदर्याच हे वेड रूपं टकमकतेने न्यहाळू लागलो.
साऱ्या जीव सृष्टीशी सुत जुळवनारा हा बेंधुंद पाऊस, ‘ हलक्या सरीनिशी अजूनही तसाच बरसत होता ,वाऱ्याचे मंद झोके त्याला हळूच वळवणी देत होते. मृदल माती अजून मृदू झाली होती. न्हाहून निघालेल्या वृक्ष वेली, अन थरथरत्या पानसळीतून टपटपनारे थेंबाचे टपोरी रूप, एखाद्या मोत्यावाणीच लकलकुन दिसे.  
तर वृक्षराजींच्या पायथ्याशी , भूसभूसित मातीतुनी एक ढंगाने,  एका चालीने मार्ग काढत  , चालीलेली मुग्यांची  पोटापाण्याची लगभग मनास शिस्तीचे डोस देऊन जाई.
कोकीळाची मंजुळ कुहु अधून मधून कुठ्नशी कानी येत, तशी हृदयाची स्पंदन वेडावत ,त्या लयात ती धडधडत.
एखाद इवलसं फुलपाखरू कुठसं बागडता दिसे, तेंव्हा मन त्याकडे आकर्षिले जाई ,
अन मनोमनं म्हणून जाई , किती छानुलं आहे ना ते !
सौंदर्याची रूपरेखा आपल्या पाठीशी घेत ते कस निवांत बागडत आहे बघ ! 
आपल्या मनाशी ना ना विविध रंग भरत..!
सृष्टीचं हे असलं वेडावलं रूप मनास भोवत होतं.
ऑफिस बाहेरचा परिसर पावसाने असा उजळून निघाला होता.
एखादी नदी , दुथडी भरून वाहत जावी तशी रस्त्यावरून ‘वाहत्या’ पाण्याचा प्रवाह एकीकडे खळखळू लागलेला .
त्या खळखळून वाहणाऱ्या प्रवाहाकडे पाहून , एकाक्षणी वाटलं कि लहानपणी केली ती दंगा   मस्ती , मौज मजा , त्या गमती जमती,  तो आनंद, आपण पुन्हा का लुटू नये ?
का पुन्हा लहान होऊ नये  ? लहानपण प्रत्येकात दडलेलं असतंच ना …
 भले हि आपलं  वय वाढत राहो.
एखादी कागदाची होडी करून (मग ती नांगर होडी असो वा राजा राणीची) वाहत्या प्रवाहात ती सोडून त्या पाठोपाठ धावून , टाळ्या पिटून, ‘ त्या क्षणाचा आनंद’ जो आपण आपल्या लहानपणी लुटायचो, ‘ तो आता ह्या क्षणी हि का बर्र लुटू नये ?
तो आता ह्या क्षणी हि लुटून घ्यावा . ह्या गोष्टीवरमनाचं विचारविनिमय सुरु झालं .
अन मनाने एकदाचा काय तो निर्णय घेतलाच.  
त्यासाठी ते कागद धुंडाळू लागलं. नजर शोध घेऊ लागली.  अवती भोवती भिरभिरु लागली .
पण कागदाचा तुकडा कुठेच  मिळेना.  त्यात भर म्हणून कि काय , ‘एक प्रश्न (अश्यावेळी टाळक्यात गजबजलेलाच असतो) मनाशी पुन्हा डोकावू लागला.
लोक काय म्हणतील ? उगा पाहून हसतील, राहू दे , जाऊ दे…!
मन काहीस खट्टू झालं .   देवाशी गार्हान गावू लागलं
लहान पण देगा देवा … हे लहान पण दे!
तितक्यात नजर हि  घडल्याकडे स्थिरावली , त्यानं भानावर आलो .. लंच ब्रेक संपला होता . 
पटापट ऑफिस मध्ये धाव घेतली . अन पुन्हा कामास जुंपलो.
पण हा पाऊस अजूनही मनावर रुंजी घालत होता.
ये पुन्हा ये ..धाव घे…
संकेत य पाटेकर
१०.०७.२०१५

ई मेल – sanketpatekar2009@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published.