पहिल्या प्रेमाची सर …


असंच काहीस लिहण्याचा प्रयत्न ..बघू जमतंय का मला …Romantic जरा..
______________________
खर सांगू , मला तुझं हे वाक्य आता पटू लागलं आहे .
ह्या क्षणक्षणा मधलं मिळालेलं प्रेम , किंव्हा त्याची झुळूक सुद्धा आपल्याला
हवी हवीशी वाटते .
जेंव्हा नवेपणाचं एखादं नातं हळूहळू उलघडत असतं तेंव्हा, त्या नात्याच्या
सुरवातीस अन नातं उलगडेपर्यंत …ती जी मधली स्पेस असते , त्यात ती व्यक्ती
,आपल्याशी किती प्रमाणात खरी अन जवळिकतेने वागतेय .
ह्याचं अंदाज बांधता येत नाही . सगळ कस तळ्यात मळ्यात असतं. अस्थिर असं..
पण अश्या झुलत्या मनाच्या स्थितीत हि , त्या क्षणामधलिक ओढ , ते प्रेम ,ती
आपुलकी सारं हवंहवसं वाटतं आपल्याला .
त्या रात्रीचे तुझे हे बोल अजूनही मनाशी ठासून आहेत बर का…
खरं तर ज्या विश्वासाने अन आपुलकीने आपण नातं जपतो .जपत असतो .
त्याच मूल्यमापन कधी करूच नये . पण काय होतं. कुठेतरी एक ठेच पोचत असते . सल खुपत असते. आपल्या मनाला.
जे काही घडतंय ते जाणीवपूर्वक कि खरंच आपलेपणानं ?त्याचा खुलासा होत नाही .
करता येत नाही .
आतल्या आत मन पोखरत जातं. अन नात्यावरचा तो विश्वास कुठेसा ढिला पडत जातो .
मला वाटत ह्या वेळेवर सुटणाऱ्या गोष्टी आहेत. थोडा वेळ द्यावा . नात अधिकतेने
खुलावं उलगडावं म्हणून , पण त्याच विश्वासानं ..दोघांच्याही.
आता हेच बघ ना !
तुझं माझं नातं घे …
किती महिन्याची ओळख गं आपली , अगदी मोजून काहीच महिने.
विश्वासाने हे नातं फुलवत आलो आपण…
तुझी माझी ओळख तरी कुठलीशी होती बर सांग . एका माध्यमातून आपली मनं जुळली. अन हळूहळू ती बहरत गेली. शब्दांच्या वलयातून …आपलेपणातून…
एकमेकांना आपण कधी पाहिलं हि न्हवतं. तरी देखील मनाची सुत जुळली .
ह्याला कारण काय ? तर तू दाखविलेला विश्वास ..त्याच विश्वासने आपण बोललो. बोलत
राहिलो अन एकदा भेटलो हि ..
आठवतेय , ती पहिली भेट …
तुझं वाक्य फोनवरचं, अजूनही कानाशी घुमतयं बर का ? अरे खूप नर्वस झाले रे ?
मनातल्या मनात खूप हसून घेतलं होतं मी ( आता रागावू नकोस हा )
पण तेव्हढीच हुरहूर, चुरचुर देखील होती. का ?  कारण मी तुला कधी पाहिलं नव्हतं. तुझ्या बोलण्यावरून अन तुझ्या विचारसरणी वरून तुझं चित्र रेखाटल होतं तेवढंच ..
पण तरीदेखील मन खचलच ..पहिल्याच भेटीत ..
जे मनाशी चित्र रेखाटलं होतं त्याच्या कितीतरी पटीने ती अवाढव्य आकृती समोर
उभी होती . त्याच ठिकाणी, त्याच ठरल्या वेळेत , त्याच हाव भावनेने.
ते पाहूनच म्हटलं इथून पलायन केलेलं बर….
पण तेव्हड्यात तुझी कुठूनशी हाक आली .अन तेंव्हा हायसं वाटलं .
किती बर वाटलं म्हणून सांगू. शब्दात कथन करता येणार नाही. 

म्हणजे केलच तरी , एखाद्या मोठ्या बिकट प्रसंगातून आपण निसटलो ह्याचा जणू तो
साक्षात्कारच …अस म्हणावं लागेल .. त्यानेच हसू फुटलं होतं .
तू देखील हे सगळ ऐकल्यावर किती दिलखुलास हसली होतीस.
किती गोड अन सालस रूप होतं तुझं ते..घायाळ झालो होतो अगदी ..
अन आजही आहे.
आपली हि तशी पहिलीच भेट , म्हणायला दिवस हि तसा खासच होता .
मैत्री दिनाचा , फ्रेंडशीप डे.. योगा योगच म्हणावं लागेल न्हाई .
कितीसार्या गोड गप्पा अन आठवणी रंगल्या त्या अवघ्या दोन तासाच्या अवधीत. कदापि
न विसरता येणाऱ्या ..आयुष्याच्या ओंजळीत कायम जपता येणाऱ्या ..
आठवतंय तो पाऊस, ऐनवेळी हळूच बरसलेला . नेमकी अचूक वेळ साधली होती ह्याने,
म्हणूनच एकाच छत्रीखाली दोघांना (दोघांकडे छत्री असूनही ) एकत्रितपणे वावरता
आलं होतं . पण त्यातही तू मुद्दाम मला डिवचल होतंस.
छत्री आहे माझ्याकडे म्हणून ..तेंव्हा नजरेतूनच काय तो संवाद साधला होता.
आठवतंय , किती Romantic क्षण होता नां तो…,
पहिलीच भेट , अन पहिलाच पाऊस …
सी फेस च्या दिशेने नजर झेपावत केलेल्या अवांतर गप्पा  आठवतायेत  का ?. 
गप्पानेवजी  खंर तर त्याला ‘प्रश्न-मंजुषा’ खेळच  म्हणावा लागेल . कितीसे  प्रश्न करत होतीस ? बोल ना , सांग  ना अस म्हणत  ?
मी मात्र निशब्द होवून तुझ्या त्या प्रनार्थी चेहऱ्याकड कुतूहलाने पाहत होतो बस्स . किती सोज्वळ रूप ते ! 
पण त्यात हि तुझे  नखरेबोल शब्द अडून धरत…अस नको रे पाहूस , ऑक्वर्ड  वाटतंय.  हसू  सुटलं होतं तेंव्हा हि…, आठवतंय नं ! 
पहिल्यांदा असं  , कुणा एका मुलीसोबत , ते हि पहिल्याच भेटीत,  मी म्हणजे आपण कपल लोकांच्या (जोडप्य जोडप्याने बसलेले ) पंक्तीत जावून बसलो होतो .
अन त्यातही नेमकेपणानं आपल्याच  बाजूला एक  सहकुटुंब , सह आनंदासही , दानं शेंगदाणं , मुखी मिचकावत कडेलाच येऊन स्थिरावलेलं .  
जणू आपल्यातल्या बोलणं  छुप्या रीतीने ऐकण्यासाठीच ,आठवतंय ? 
तुझं तसंही तिकडे लक्ष न्ह्वतचं  म्हणा … स्वतःच्याच प्रश्न कुंचल्यात गुंतली होतीस तू ….. असो , 
आपल्या एकमेकांच्या  आवडीनिवडी तश्या काही प्रमाणात  आपण जाणून घेतल्या होत्या.  फोनवरूनच..संवाद साधून ,  
त्यात तुला आईस क्रीम खूप आवडतं .हि गोष्ट लपून कशी राहील म्हणा .
म्हणून परतीच्या वाटेवरची  साज-संध्या आईस्क्रीमच्या  यम्मी फ्ल्वेर मध्ये ढवळून द्यावी  . यासाठी  दुकान धुंडाळू लागलो. तर त्याच्या हि धड थांगपत्ता लागला नाही. 
तसं कित्येकदा , त्या ठिकाणाला भेट  देऊन  आलोय  . पण नेमकेपणान तेंव्हाच रस्ता न सापडावा हे  एक मोठ आश्चर्यच म्हणावं लागेल …;) 
असो, आपली आईस क्रीम , राहिली ती राहिलीच  ,नाही का    ?
बर हे  हि ..असू दे , 
पण  मैत्रीत्वाचा खास दिवस असूनही   ..साधं रिबीन BAND  हि घेऊन आलो नाही . 
हे कुठेतरी बोचलं  मात्र माझ्या मनाला , त्यात हि  तुझे लाडीकतेचे शब्दओळ., हळूच बरसले.  माझं रिबीन कुठे आहे ,  हा ? है  नां ? मी त्यावर  फक्त स्मित हास्य खुलवलेलं.  
खर तर ‘नातं ‘ घट्ट रोवायला अशी BAND, रिबीनची  गरजच  नसते. .है ना ? हवा असतो तो फक्त विश्वासाचा बांधीलपणा . 
जो तुझ्या माझ्यात आहे . अन तो असाच राहिलं हि आशा व्यक्त  करतो. 
ऐ ,  ऐक ऐक,  अजून थोडं… 
दादर फलाटावर , तुला निरोप देताना , तुझे ते हळवे नाजुकसे बोल , आठवतंय ? 
हृदयात बंदिस्त आहेत .बर का ..
त्याच बरोबर , भेटत्या क्षणीच, दहा बारा पाऊलं पुढे टाकतो नाय टाकतो,  तर तू उपस्थित केलेला  प्रश्न देखील ., म्हणजे, 
कसं वाटल तुला भेटून ?  खरं  तर तुझ्या प्रश्नाचा पाढा  इथूनच सुरु झालेला , ह्या प्रश्नाने .. आठवतंय ? 
त्यातही माझं उत्तर तुला रुचलं न्हवतं  .  खट्टू झाली होतीस तू  ,  है ना ?
एका कवी मनाच्या अन लेखकाच्या ( मी काही लेखक वगैरे नाही आहे हा ) मुखातून फक्त,  ‘छान वाटलं’ अस उत्तर  खंर तर कुणालाच पटणार नाही. 
मला देखील नाही. पण तरीही मी दिलं  . 
पण त्यात हि तुझ्या लाडिक हट्टा पुढे मला शरणागती पत्करावी लागली. है ना ? 
नाही , मला असं हे  उत्तर नको …तसं ऊतर नको ..आठवतंय. ?
आठवणीतले  हे गोजिरे क्षण असेच कायम लक्षात राहतील . 
हृदयी मनात प्रेम अत्तराचा नवा गंध शिडकावत. 
तुझाच,
………………..
 

Leave a Comment

Your email address will not be published.