गेल्यापाच पाच एक वर्षांपासून म्हणेज ‘सिद्धगड भीमाशंकर आणि गणेश घाट ‘ ह्या
अविस्मरणीय अश्या मोहिमे नंतर
आमचा पुढील ट्रेक वा मोहिमेचा विषय होता…तो अर्थात ‘पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड‘ ह्या ऐतिहासिक घडामोडीचा…

तीन दरवाजा किल्ले पन्हाळा
त्या थरारक प्रसंगाचा, मागोवा घेत वाटा धुंडाळण्याचा …
त्यासाठीच चर्चासत्र रंगत होती. भेटीगाठी घडत होत्या. आम्हा –
चौघांमध्ये…
मी यतीन, रश्मी आणि माझी बहीण संपदा..पण वेळ नि मुहूर्त काय तो गवसत न्हवता. महिनो महिने त्यात उलटून गेले. बरीच वर्ष लोटली गेली . काही ना काही अडसर येऊन वेळ उभी ठाकत, पण ह्या वर्षी
तत् शेवटी सगळं काही यथायोग्य जुळून आलं. मुहूर्त ठरला. त्यावर शिक्कामोर्तब जाहले. झपाट्याने वाचन सुरू केलं.
Route आखत गेलो. गुगल मॅप वरून पायवाटेची टेहळणी केली.

किल्ले पन्हाळा

कुठे राहायचं कुठे नाही ? काय, किती सोबत घ्यायचं ? काय नाही ? ह्यावर आमच्यात चर्चा रंगत गेली. मित्रांकडून मिळेल ती माहिती जमवत गेलो. ब्लॉगचे संदर्भ घेत गेलो. जाण्या येण्याची तिकिट्स हि बुक केली आणि हे सर्व झाल्यावर बस्स आता निघायचं म्हणून आमची मन मंदिरं अगदी आनंदात दौड करत होती. पण कुठेशी काहीसं हे घडणार होतंच आणि तसं झालं हि…
अचानक वीज तडकावी अन मनभर अशांतता उधळून निघावी तशी एक बातमी आली. आमच्यातले एक आणि नंतर एक असे दोघेजण ( त्या दोघीजणी ) अचानक काही कारणास्तव येण्याचे रद्द झाले आणि उरलो ते आम्ही दोघेच…मी आणि यतीन …!
मिळून आखलेला प्लान, चौघाजणांनी केलं गेलेलं वर्क आऊट…घेतलेल्या सुट्ट्या सगळं वाया नको म्हणून … आम्ही निघालो दोघेच. त्या दोघी जणी सोबत आहे हे मानूनच…

पुढील प्रवास हा आमच्या दोघांचाच…

पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड’मुक्काम खोतवाडी पन्हाळा  पावनखिंड

पन्हाळा पावनखिंड दरम्यान पहिला मुक्काम खोतवाडी किंव्हा कर्पेवाडी असा ठरलेला आणि दुसऱ्या दिवशी
पांढरेपाणी गाव ( स्नेहा कडून नंबर घेतल्याने..त्यांच्याशी बोलून इथे राहणायची आमची सोय आम्ही आधीच करून घेतली होती. ) ह्या दोन दिसाच्या ह्या मुक्क्मात जंगल पायवाटा तुडवत, त्या प्रसंगाचा एकूणच आम्ही मागोवा घेत होतो.

पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड' अवघ्या मोजक्या मावळ्यांनिशी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून, पन्हाळ्यावरुन …
रात्री जंगलवाटेवून ..डोंगरवाटेतुनिशी निघालेले छत्रपती शिवराय आणि तो एकूणच प्रसंग मनात धडकी भरवत होतां.
रात्रीच किर्रर्रsssss जंगल, श्वापदं, काटेरी झुडप, ओहोळ आणि मागे लागलेला शत्रूंचा ताफा ह्या सर्वांशी सामना करत.. दौडत मार्ग काढत.. विशाळगडी जाणे हे इतके सहज सोपे नाही हो.
ह्याची जाणीव आणि एकूणच अनुभव आम्हाला ह्या दोन दिवसात आला.
चिखलवाटा तुडवून केला गेलेला हा एकूणच प्रवास दमछाक करणारा असला तरी
एक अनुभूती देऊन जातो.

पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड’

म्हसाई पठार पन्हाळा पावनखिंड मोहीम

ते दौडीचे दिवस :
दोन दिवस आभाळ कसं नुसतंच मळवट भरून होतं. वाऱ्याचा वेग मात्र श्वासागणिक खुलला होतां. निसर्गानं हि मखमखली हिरवी शाल अंगी पेहराव केली होती. फुलांचा गंध आणि रंग इंद्रिंयांना भुलवत होता.तो सुखावत होता .
पायदळी चिखल मातीचे रस्ते , वाटा..जणू स्वागतास सज्ज होत्या.
वाटेतून भेटतजाणारे कौलारू छपराच्या वाड्या, मंदिरं, क्षणभराच्या विश्रांती साठी खुणावत
तर लहानगी पोरं, मोठी वडीलधारी माणसं…कुठून आलाssss सा ? अशी खुशाली विचारात
आपलेपण रुजवत होती.

पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड

तुरकवाडी म्हणा, म्हाळुंगे, कुंभारवाडा, खोतवाडी, धनगरवाडा, मंडलाईवाडी ,
आंबर्डे धनगरवाडा, आंबेवाडी, कळकेवाडी, रिंगेवाडी, माळेवाडी, पाटेवाडी,
सुकूमाचा धनगरवाडा , म्हसाईवाडी , पांढरेपाणी असे एक एक गावोगाव जोडून ,
सरतेशेवटी जेंव्हा आम्ही पावनखिंड आलो, त्या पवित्र ठिकाणी…
जिथे खिंड
लढवली गेली तेंव्हा अविरत पावसाची धून सुरु झाली.
दोन दिवस आमच्यावर मागोवा ठेवून राहिलेला हा पाऊस, त्याने हि आमच्यावर
नेमक्या वेळेसच मानमोकळ्यानं वर्षाव सुरु केला. जणू काही दुधाळ अभिषेक…
आम्ही ओलेचिंब झालो. नतमस्तक झालो.. त्या पवित्र भूमीशी.. त्या शूरवीर
मावळ्यांशी..बाजीप्रभू आणि फुलाजी ह्यां  वीर पराक्रमी योद्ध्याशी, त्यांच्या असामान्य
बलिदानाशी .. छत्रपती शिवरायांच्या निष्ठेशी, खुद्द छत्रपतींशी…
खऱ्या अर्थानं आम्ही पावन झालो असं म्हणालो तरी ते चुकीचं ठरणार नाही.
हरहर महादेव । जय शिवराय ।।
– संकेत पाटेकर

पावनखिंड

आणि आम्ही पाहिलेलं एक धगधगतं स्वप्नं..एक ऐतिहासिक घडामोड, सुवर्णाक्षराने मुद्रांकित झालेली पन्हाळा ते पावनखिंड आणि विशाळगड हि मोहीम.
नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू ह्यांच्या समाधी स्थळी
‘नतमस्तक’ होऊन ‘हरहरsss महादेव’ असा नारा देत … पूर्ण झाली.
खऱ्या अर्थाने आम्ही पावन झालो ते  ह्या इथेच…
‘हरहरssss महादेव’

 – संकेत पाटेकर

विशाळगड बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे ह्यांची समाधी
नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू ह्यांच्या समाधी स्थळी

क्षणचित्रे

निसर्गाचं हे हसरं भरलं रूप.. खुल्या मोकळ्या नजरेनं असं एकांती पाहणं वा पाहत राहणं..म्हणजे निव्वळ निखळ आनंद मनात साठवून घेणं होय ..!
पन्हाळा पावनखिंडी मार्गे विशाळगड हा आमचा एकूण ट्रेकच असा विशेष आणि
भारावलेला होता.
पदोपदी …आपल्या त्या शूरनिष्ठ मावळ्यांचा,  शिवरायांच्या
दूरदृष्टीचा, असामान्य कर्तृत्वाचा ..आणि स्वराज्याच्या ध्येयसाधनेचा खडतर प्रवास.
ती ज्वलंत यद्न्य अक्षरं..चित्र क्षण आम्हाला प्रेरित करत होती.
इतिहासाची सांगड घालत, छाती अभिमानाने फुलवून देत ..!

किल्ले पन्हाळा _ दुतोंडी बुरुज आणि सभोवताल आणि एकांती
मित्र…

पन्हाळा पावनखिंड मोहिमेदरम्यान चे क्षण

मसाई /म्हसाई पठार
खुद्द शिवरायांच्या सानिध्यात जणू..पन्ह्याळातील एक एक वास्तू, त्या त्या क्षणांशी मिसळून निरखून आणि कौतुकाने भरल्या नजरेने पाहत आम्ही पुसाटी बुरुजा जवळून .. ऐतिहासिक अश्या त्या पायवाटेने …मसाई पाठराशी निघालो.
साधारण दुपारच्या त्या दीडच्या आसपास, आम्ही त्या विस्तीर्ण पसरलेल्या आणि हिरवाईने साज शृंगार केलेल्या आणि पावसाच्या आगमनाने नुकत्याच ढगाळलेल्या
अश्या मसाई पठारावर आलो.
पठारवरच मसाई देवीचं ते मंदिर, भेटलेली ती निरागस पण सडेतोड आणि रांगड्या मनाची खेळकर मुले, मोठी माणसं, टणटण रागावून आमच्याकडे पाहून फुसफुसत असलेली म्हैस, पाहिलेली पण दुर्लक्षली गेलेली ती लेणी आणि पायदळी इवली इवली रंगलेली निळेशार फुले ….
अविस्मणीय सगळं.. 

 – संकेत पाटेकर

पन्हाळा पावनखिंड मोहिमेदरम्यान चे क्षण
पन्हाळा ते पावनखिंड दरम्यान..आपल्या अजस्त्र रूपाने आणि विस्ताराने दूर
पसरलेल्या म्हसाई पठारावरील.. म्हसाई देवीच्या आवारात ह्या लहानग्यांशी गाठ भेट घडली.
रिमझिमत्या पाऊस सरीत मनसोक्त दौडताना, बागडताना , त्यांच्या चेहऱ्यवरील
नितळ -उजळ भाव … आनंदाचे तुषार मनात हि फुलवत होते.
म्हणावं तर कोल्हापुरी थाटात…त्यांची भाषेची उधळण आणि दंगा मस्ती काय ती सुरु होती.

सकाळी साडे अकराला शाळा सुटली कि घरच्यांना सांगून थेट,  दळवे वाडीतून थेट म्हसाई पठारावर यायचं. पावसाने भरून काढलेल्या तळ्यात हातपाय मोकळे करायचे.
हवं तितका वेळ घेत तळयात मुसंडी मारत बसायचं. कधी मासे पकडायचे कधी चरायला आलेल्या म्हशी गुरांना येडवणं दाखवत …स्वतःशीच दंग व्हायचं.
मित्रांशी थट्टा मस्करी करत..संध्याकाळ्च्याला आलो तसं घरी परतायचं..हे असं ह्यांचं दिनक्रम …
हे होते म्हणून म्हसाई’च्या कुशीत लपलेल्या ‘पांडवदरा’ लेण्या आम्हाला वेळेत आणि व्यवस्थित पाहता आल्या.
ह्यांच्याशी म्हणावं तर तेव्हड्या वेळेत छानशी गट्टी जमली.
 – संकेत पाटेकर
_ पुढे कूच करण्यासाठी निघता निघता यतीन ने टिपलेला फोटो
पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड
पन्हाळा पावनखिंड मोहिमेदरम्यान चे क्षण

पन्हाळ्याच्या राजदिंडीपासून, साधारणतः दुपारी साडे बारा दरम्यान आम्ही ..
मसाईच्या दिशेने निघालो. जिथून अवघ्या निवडक मावळ्यांसह आपले ‘छत्रपती
शिवाजी राजे’ विशाळगडी निघाले होते.
घन-अंधार अश्या वाटेतून , झुडूप झाडीतून, किर्रर्रssss काळोख्याने वेढलेल्या रानवाटांना हि जणू आपल्या तेजगंधीत सहवासाने पावन करून जातं. राजे निघाले
होते ते विशाळगडी ..
त्या म्हसाई पठारावर, आम्ही साधारणता पावणे दोन दरम्यान पोचते झालो.
दूरदूर वर परसलेला हा हिरवाकंच मखमली गालिचा म्हणजेच हा मसाईचा विस्तीर्ण पठार.
त्यावर डवरलेली ती इवली इवली निळीशार नाजूक फुलं, काटोकाठ भरलेली गोलाकार तळी..वर ढंगांनी वेढलेला आणि आंनंदाश्रूनी जणू भरलेला लहान मोठा विविध
आकारमई पुंजका..
मनावर कशी एक प्रसन्नता शिडकावत होती.
साधारण २ तास आम्ही त्या पठारावर दौडत होतो.
अधून मधून थांबत होतो. सुष्टीचं बहरलेलं रूप मनात साठवून घेत.

– संकेत पाटेकर

पन्हाळा पावनखिंड मोहिमेदरम्यान चे क्षण

थोड्याश्या गमती जमती : 
ह्या मावशी सोबत होत्या म्हणून ठीक.  नाहीतर ह्या म्हशीने आम्हाला धुडकवलाचं असतं.

म्हसाई पठारावरून थेट कुंभारवाड्यात..;) इतकी पाहून आमच्या कडे टूनटून उड्या मारत होती. 😀

म्हसाई पठार

दिवसभराच्या पायपिटीनंतर
पन्हाळा ते पावनखिंड दरम्यान ..खोतवाडी इथे केलेला आमचा हा पहिला मुक्काम.
खरं तर गावातल्या शाळेत मुक्काम करण्याचं आम्ही योजिलें होतं. एखाद शाळेचा वर्ग मुक्क्मासाठी मिळाला असता तर ब्येष्टच किव्हा नाहीच मिळाला तर व्हरान्ड्यात किंव्हा आवारात रात्री मुक्कत करू असं आमचं ठरलेलं . थंडीने आपला खडा पहारा दिलाच होता. त्यानं अंगाची कुडकुड सुरु झाली होती
बराच वेळ मुक्कमच काय कुठं काय ह्यावर आमचं ठरत होतं
तेवढ्यात लक्ष्मण खोत (दुकानदार ) ह्यांनी कुणास कसं, आमच्याकडे बघून (दोघेच असल्याने ) त्यांच्या घरातील एक अभ्यासाची खोली आम्हाला देऊ केली. सोबत जेवणाची सोय हि केली. काय हवंय नकोय ते आपुलकीने विचारत, ह्यांनी आपलंस करून टाकलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता चहापान घेत ह्यांचा निरोप घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. पुढचा प्रवास हा खोतवाडी ते पावनखिंड होता.
दिवसभराची पायपीट ती …
जंगलवाटातून …चढण उतरणीतून,  खळखळत्या ओहोळातून , चिखलातून,  घसरणीतून ….वाड्या वाड्यातून..

– संकेत पाटेकर

पन्हाळा पावनखिंड मोहिमेदरम्यान चे क्षण

‘प्रेमाने माणसं जोडत गेलो कि उदभवलेले ‘प्रश्न’ हि..अहो ..! सहजा सहजी सुटले जातात.
आमचा पहिला मुक्काम : पन्हाळा ते पावनखिंड मधला गाव : खोतवाडी
आठ एक तासाच्या रग्गड पायपिटी नंतर मिळालेली विश्रांती आणि जेवणाची रसपूर्ण (अंडाकरी ) थाळी : ‘श्रावण’ असला तरी नाही म्हणायचं नाही…

पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड

पन्हाळा पावनखिंड करताना..त्या एकूण मधल्या पट्ट्यात आम्हाला अनेक गावांचा अगदी जवळून संबंध घेता आला.
साधंसच जीवनमान जगणारी पण हिरव्याशार निसर्गाच्या गर्भ श्रीमंतीत वाढलेली हि खेड्यापाड्यातील दिलखुलास मोकळी माणसं.
आपुलकीचा झुळझुळ झरा मनभर साठवूनच असतात.
आपलेपणच्या आपल्या नुसत्या एका शब्दानं हि माणसं
स्वतःहून स्वतःला मोकळं करत ,छान सुसांवाद साधतात. तेंव्हा आपण कुठे दूर नाही, तर आपल्याच घरात..आपल्या माणसात वावरत आहोत अशी जाणीव आल्याशिवाय राहत नाही .
अशी माणसं जागो जागी आम्हाला भेटत गेली.

कुणी त्यातले..मुंबईतच पंधरा एक वर्ष तळ ठोकून होतं. कुणाचे नातेवाईक इथे राह्ण्यात होते. कुणी कामासाठी २ तीन वर्ष येऊन गेलं होतं. कुणी परळ कुणी ठाणे मुक्कामी. तर कुणी..
”अरे तुम्ही तर आमच्याच गावचे ” म्हणून मन मोकळे हसत सुटायचे.

तर अश्या ह्या स्नेहपूर्ण सुसांवादामुळेच आमचा प्रवासही आनंदाने पुढे व्हायचा.

हरsssहरsss महादेव चा नारा देत,  त्या पुण्य पावनभूमी कडे..
जय शिवराय !!
– संकेत पाटेकर

पन्हाळा पावनखिंड मोहिमेदरम्यान चे क्षण

 ‘वि शा ल ग ड गो ळ्या द्या ना…’
इतका वेळ स्वतःशीच गुणगुणत असलेल्या ह्या चिमुरडीचे
हे बोल.. मला ऐकूचं आले न्हवते. म्हणावं तर माझं लक्ष न्हवतं.
पणजेंव्हा यतीन ने सांगितलं.
ऐकलंस का ? ती काय म्हणतेय ती?तेंव्हा म्हटलं नाही,
मग लक्षपूर्वक ऐक..काय म्हणतेय कळेल.आणि तेंव्हा कुठे काय ते उमगलं.
आमच्या भोवती बराच वेळ ती उभी होती.
‘वि शा ल ग ड गो ळ्या द्या ना…’ ‘
विशालगड गोळ्या द्या ना…’
अस तिच्या सौम्य मृदू आवजात म्हणत..

विशालगडच्या गोळ्या हा नक्की प्रकार काय आहे. तेंव्हा कुठं आम्हाला कळलं.

तिथंल्याच एका स्थानिक दुकानात विचारपूस केली  आणि एक पॅकेट घेऊन ठेवला. 
पुढे गावोगाव जिथे जिथं आम्हाला लहानगी भेटली. आमच्या पुढे मागे आम्हाला वेढा घालत दादाsss दादा sssगोळ्या द्या ना असं म्हणत..तेंव्हा तेंव्हा तेंव्हा त्या गोळ्या त्यांच्या हातावर ठेवत गेलो.

खरं तर असं हात पसरणे ,  मागे लागणं ते देखील ह्या लहान वयात हे योग्य न्हवतच आणि नाही आहे.
पण हे वास्तव आहे.
काही ठिकाणी तर ‘गोळ्या नाहीतर पैसे द्या ‘ असं म्हणून मागे लागायची.
तेच खुपलं मनात..
हे चित्र खरं तर बदलायला हवं. 

विशाळगडाच्या गोळ्या मागणारी चिमुकली
पन्हाळा पावनखिंड मोहिमेदरम्यान चे क्षण

किल्ले पन्हाळ्याला जेंव्हा आम्ही ( मी आणि यतीन ) एसटी मधून उतरलो . शूरवीर बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या प्रतिमेसमोर,
तेंव्हा हा ‘गडवाट परिवार’ तिथे बाजीप्रभूंच्या प्रतिमेला वंदन करताना दिसला.
साधारण दहाच्या दरम्यानची ती वेळ. इथेच आबाची भेट झाली. बोलणं झालं आणि त्यानंतर आम्ही आमच्या मार्गीस्थ लागलो.
पन्हाळ्याला पहिल्यांदाच येत असल्याने बरंच काही पाहायचं होतं. त्यात मसाई पठार चढून उतरून, पुढे खोतवाडी नाहीतर कर्पेवाडीला आजचा मुक्काम हि ठोकायचा होता.   त्यामुळे वेळेची घाई होती. म्हणूनच वेळ न दवडता आम्ही एक एक महत्वाच्या वास्तू पाहू लागलो.
अंधारबाव, तीन दरवाजा, सज्जाकोठी, गंगा यमुना, सरस्वती हि धान्यकोठारं,  राणीमहाल, शिवरायांचं मंदिर, दुतोंडी बुरुज ..पुसाटी बुरुज …आदी आदी ठिकाणं पाहत आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.
गावोगाव जोडत..माणसाची बोलत, त्यांना ऐकत …संध्यकाळी साडे पाच दरम्यान आम्ही खोतवाडीत पोचलो.
इथून पुढे कर्पेवाडी  अजून दीड एक तासाच्या पायपिटीवर आणि ते हि रानवाटेतुन …
त्यामुळे पुढे न जाता खोतवाडीलाच मुक्काम ठोकला.

‘लक्ष्मण खोत’ सारखी आपलेपणा साठून राहिलेली माणसं भेटली.

त्यांनी स्वतःच्या घरी राहण्यास मोकळी ऐसपैस अशी जागा दिली. स्वादिष्ट असं जेवण हि दिलं. तिथेच रात्र सरली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही पावनखिंडीसाठी रवाना झालो.
पुन्हा आता दिवसभराची रानवाटेतुन, चढ उतारातून तंगडतोड होतीच. त्यामुळे दौड करू लागलो. अंत अंतरावर गावोगाव भेटत गेली.
त्यात मन्डळाईवाडी,  आंबर्डे धनगरवाडा, कर्पेवाडी, आंबेवाडी,  कळकेवाडी, रिंगेवाडी, माळेवाडी, पाटेवाडी अशी गावे लागली. साधारण सकाळी साडे अकराच्या आसपास आम्ही पाटे वाडीत होतो . त्यानंतर दीड एक तासाच्या अंतरावर रानवाटेतुन पुढे होत असताना आम्हाला ‘गडवाट’ परिवाराची एक फळी पुन्हा दिसली . आणि त्यात आबा होता.

मग त्याच्याशी पुन्हा गप्पा मारत .. पुढचाचा प्रवास हा आमचा एकत्रित असा झाला. पावनखिंड पर्यंत..
तेंव्हा त्यांसवेंत टिपलेला एक क्षण…ग्रुप फोटो..
 

पन्हाळा पावनखिंड मोहिमेदरम्यान चे क्षण
सह्याद्रीच्या अंगा – खांदयाशी बागडणारी…
दऱ्या खोऱ्यातूनि वाऱ्यावानी मुक्त भटकणारी..
सामाजिक संवेदना जपणारी आणि जाणणारी…
मानवतेचे अक्षरं हृदयाशी कोरणारी… ट्रेकर्स मंडळी ,

ह्यांची भेट ,
हि अशीच अवचित कुठल्याश्या गड
माथ्याशी, त्या ऐतिहासिक पाऊल खुणांशी योगायोगानेच घडते.

‘पन्हाळा ते पावनखिंड’ दरम्यान ह्या अवलियाची सुद्धा अशीच भेट घडली.
नुसतेच
फेसबुक वर अधून मधून पोस्ट लाईक आणि कंमेंट करणारे आम्ही , पहिल्यांदा
प्रत्यक्ष भेटलो आणि मग मुक्त संवादात हरवून गेलो ..काही क्षण…!
 – संकेत पाटेकर

पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड’

पन्हाळा पावनखिंड मोहिमेदरम्यान चे क्षण
नभा नभातुनी, दऱ्या खोऱ्यांतुनी गर्जितो माझा सह्याद्री !
salher
हे ट्रेक म्हणजे नक्की काय रे भाऊ ?
Action Trekking Shoes…

Leave a Reply

Your email address will not be published.