पहाटे ४ वाजता मी ..सिद्धेश.. दीप्ती ..भूषण आणि उज्वला त्या जंगलातून गणेश मंदिरात जाण्यासाठी निघालो. जंगलातले ते वातावरण सुन्न करणारे होते. आजूबाजूला कुठेच वस्ती नाही.
खांडस हे गाव ते हि पाऊन ते १ तासाच्या अंतरावर..
जंगलातून चालत असताना .., पाला पाचोळ्याचा कुर्रssssकुर्र आणि रात किड्यांचा किर्रsssकिर्र आवाज घोंगावत होता. काही अंतर पार करतोच तेच वर थोड्या अंतरावर कुणीतरी असल्याची आम्हाला चाहूल लागली. ती त्यांच्या Tourch च्या झोतांनी .
इतक्या रात्री, त्या काळ्या कुट्ट अंधारातल्या जंगलात आम्ही फक्त पाच जण आम्ही तिघे मुले आणि त्या दोघी.
मनात क्षणभर भीती पसरली. पुढे जावे कि नाही. रात्रीच्या त्या काळ्या कुट्ट अंधारात काहीच दिसत न्हवतं आणि वर कोण आहे तेही काही कल्पना येत न्हवती.
थोडा वेळ तिथेच थांबून आणि आम्ही पुन्हा मागे फिरण्याचा निर्णय घेतला आणि आलो त्याच मार्गी एका फार्म हाउसच्या गेट ठिकाणी निवांत भिंतीला टेकून बसलो. आणि मग भूता गोत्यांच्या गोष्टी नां चेव आला आणि त्या निरव आणि भयावह शांततेत ..भूषण .आणि .उज्वला, एक एक गोष्टी रंगवू लागल्या.
काही वेळ गेला आमच्या त्या गोष्टी चालूच होत्या आणि अश्यावेळी पुन्हा एका Tourch चा झोत आमच्या दिशेने पडू लागला आणि पुन्हा सगळे एकदम शांत, चिडीचूप..
तो झोत हळूहळू अधिक अधिक जवळ जवळ येऊ लागला आणि मग एका एकी गुडूप.
क्षणभर कळेनासं झालं. काय झाले ते …
तेवढ्यात एकाकी एक व्यक्ती गेटच्या आतून आम्हाला डोकावून पाहून लागली.
मनात नां ना विचार येण्या आधीच त्यांनी कुठून आलात. इथे का बसलात? आत तरी यायचं ना …मी जातना तुम्हाला पाहिले. वगैरे वैगरे बोलू लागले .
आणि सर्वांनी त्यांच्याशी मन मोकळे केले . ते काका तिथेच असतात ….त्या फार्म हाउसवर …रखवाली करत .
त्यांच्याशी बोलून , नंतर मग थोडे उजेडल्यावर आम्ही पदरगड साठी पुढे मार्गीक्रमण केले.
ट्रेक ला येण्या आधी पुस्तकात वाचले होते. त्या जंगलात अनेक ट्रेकर्सना लुटण्याचे प्रकार घडले आहेत .पण त्या काकांकडून कळलं कि ते १० वर्षा पूर्वी, आता नाही .
असा हा अविस्मरणीय क्षण -पदरगड
– संकेत