हेच का ते तुझं निस्वार्थ प्रेम…? 

खूप म्हणायचासं ना…प्रेम हे निस्वार्थ असावं ? 
निर्मळ मनानं प्रेम करावं म्हणून ? 
कुठ गेलं ते सर्व आता ? कुठे गेले तुझे बोल ?
तुझे विचार ? सांग, बोल ना  हेच का रे तूझं निस्वार्थ मनं  ? हेच का ते तुझं निस्वार्थ प्रेम…? 

नुकतंच कुठे त्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंदाचा निर्मळ झरा खळखळू लागला आहे. अन त्यात तू असं चिखल माती- धोंड्यांनी तो   झरा  दुषित करू पाहतोयस  ?
अडवू पाहतोयस , का ? स्वतःच्या स्वार्थासाठी ?
मिळालेले ते क्षण पुरे नाहीत का ?


आनंदाचा एक क्षण हि ‘सर्वांग’ अगदी चैतन्याने भारून टाकतो.

तुझ्याकडे तर असे कित्येक आनंदी क्षण आहेत रे,  ते हि त्या व्यक्तीच्या सहवासातून मिळालेले, लाभलेले, मग तरीही असं ? का ?

दुसऱ्याच्या  आनंदात  नेहमी स्वतःचा आनंद पाहणारा तू,
आज समोरच्या मनाचा साधा विचार हि करत नाहीस  ?  कमाल आहे.
त्यांच्या आनंदात मिसळून जाण्याऐवजी त्या मनाचा आनंदच हिसकावून घेतोयसच,

वेदानात्मक शब्दांच घाव घालुंन ? का ? का बर ?

कालच्या सर्व घडामोडी मी ऐकल्या आहेत.
मी नको म्हणत होतो, आवर स्वतःला, पण नाही.
‘आपल्याला चांगल्यापेक्षा वाईटच अधिक जवळच वाटत ना’ .

तू हि तेच केलेस ? शब्दांच घाव देऊ केलेस  त्या नाजुकश्या  मनावर.

किती वाईट वाटलं असेल रेssतिला ? ह्या गोष्टीचा  कधी विचार केलास  ?
ती आता कोणत्या प्रसंगातून जात आहे, तिच्यावर कोणता प्रसंग ओढवला आहे ?
ती अशी का वागते ?
ह्याची शहनिशा न करता, बस्स..बोलायचं  अन बोलायचं, वाट्टेल तसं …
काय अर्थ उरला रे ss….

शब्दांची धार हि तलवारीपेक्षा अधिक खोलवर जखम करते अन ती शक्यतो  भरून येत नाही.  हे ठाऊक आहे ना तुला….. पण तरीही, 
नातं, समजलास नाही रे  अजून …

 मना – मनाचं अस स्वतःशीच  शीत युद्ध जुंपल होतं, .समजवण्या हेतूने..

ना रंग, ना रूपं,  ना आकार ऊकार,  ना  गंध पण  तरीही हे मनं अस्वस्थ करून जातं कधी..
मानले तर मनाचे दोन प्रकार ..
एक चांगल , एक वाईट..
एक नेहमीच सावरणारं, सकारात्मक विचारांकडे  नेणारं  अन दुसंर  दु:खाच्या डोहात हळूच बुडवणारं… नकारात्मक विचारंकडे वाहून नेणारं.
ह्यात  माणसाला चांगल्यापेक्षा वाईटच अधिक जवळच वाटतं .
किंव्हा नकळत आपण  ओढले जातो …त्याकडे ..

रागा भरात निघालेले आपलेच शब्द आपल्याच  हृदयी घाव करून जातात.

अन  त्याचा परिणाम  पुढे होणारा  तो होतोच,  स्वतःला हि अन समोरच्यालाही ..
तेंव्हा मग पश्चाताप शिवाय दुसरा मार्ग नसतो.

पहिल्या  मनाचं  सांर बोलण  निमुटपने   ऐकून घेणारं दुसरं मन आता  बोलू लागतं.
झालं बोलून…आता माझंही म्हणण ऐक ?

” उगाच नाही रागा धरत, ना शब्दांचे घाव देऊन समोरील मनाचा रोष ओढवून घेत मी ..
त्यामागे कारण असतं.”  अन कारणाशिवाय उगाच कुणी अस बोलत नाही.

कारण असतं हे मान्य रे.., पण त्यामागची व्यथा तू समजून घेतोस का ?
दुसऱ्या मनाचा हि विचार  करतोस का ?

हे बघ,  व्यथा वगैरे समजून घेण्याच्या भानगडीत मी पडत नाही.
जे दिसलं जे जाणलं त्यावर माझा जोर असतो.

इथेच चुकत रे तुझं , समजून घेण्याची मुळात वृत्तीच  तुझी नाही.
माणसं प्रेमानं जोडायची कशी , नाती टिकवायची कशी ? फुलवायची कशी ? ते तुझ्या आवाक्यातच नाही.

बर बोललासं रे…..
हे सगळं  माझ्या आवाक्यात नाही. पण प्रेमानं अन विश्वासानं जोडलेली माणसं  एक दिवस आपल्या विश्वासालाच तडा देतात ,  त्याच काय ? 
आपल्या प्रती त्यांच्या मनात असलेल प्रेम , आपुलकी , आपलेपणाची भावना अचानक कुठे निघून जाते ?
आहे उत्तर ह्याचं ? 
ह्याच गोष्टी खूप जिव्हारी लागतात रे , ह्याच गोष्टीचा  खूप राग येतो.
अन त्या रागाभरात  नको ते धारदार  शब्द बाहेर  निघतात .

अरे पण तो, क्षणाचाच राग रे…
वादळा सारखा उफाळलेला.  सांर काही नासधूस करून देतं .
त्याच काय ?

विश्वासाला तडा जाऊ न  देता . जे नांत आपण जोडलंय ते निर्मळ मनानं ,   जपण, प्रेमानं गोंजारत राहण , हे आपलं इति कर्तव्य …मित्रा . 😉

ठीक आहे रेss कर्तव्य हे ते,  बोलायला अगदी सोपं आहे.
पण वेदनेचे घाव झेलावे लागतात त्याच काय ?
ते सहन कस करायचं ?

काही गोष्टी सहन कराव्या लागतात रे..
इतर मनाचा विचार करून .. नाती जोडतो ना आपण , मग त्यातला सुगंधीतपणा हि आपल्यालाच जपायला हवा  ना ? कुणा एकाला तरी  त्याग करावा लागतो रे..

शेवटी हे जीवन चंदनासारख असावं  रे…
स्व:ताहा झिजता ..झिजता, सुगंध देणार , नाही का ?

 संकेत पाटेकर

Leave a Reply

Your email address will not be published.