निशब्द शांतता -दिनेश काळे

‘निशब्द शांतता’

सूर्य उगवतीला होता.
अश्या ओळीने सुरवात झाली आणि निसर्गच्या नुसत्या त्या वर्णांनान हि सर्वांग अगदी मोहून गेलं.
ह्या शब्दात देखील किती किमया असते न्हाई ? म्हणजे त्यांच्यातही ओढ लावण्याची अन आकर्षित करण्याची एक अमर्याद अशी शक्ती असते. जशी ह्या निसर्गात आहे.
एकदा का ओढ लागली कि आपण त्यामागे पळत राहतो. तर असो,
ग्रंथालयाच्या शांत आणि गहानीय वातावरणात आज एक वेगळ पुस्तक हाती आलं.

ज्याचं नाव ‘निशब्द शांतात’ म्हटलं वाचू..

संध्याकाळचे सहाच वाजले होते.
पुष्कळसा वेळ हाती होता. ऑफिस मधून सुटून थेट ग्रंथालयात दाखल झालो होतो. तसा हा माझा रोजचाच शिरीस्ता..(गेले सात आठ वर्षापासून ) ऑफिस मधून सुटल्यावर ग्रंथालात जावून बसायचं.मग एखाद वर्तमान पत्र , मासिकं किंव्हा एखाद पुस्तक असेल ते चाळत राहायचं. जोपर्यंत हा तल्लख अन थोडा चुकार मेंदू ” बस्स झाले रे बाबा, आता माझ्या डोसक्यावरून जातंय हे सगळ ” माझी ग्रहण करण्याची क्षमता संपली रे ‘ अशी
आर्त हाक मारत नाही.
मग कधी अर्धा तास कधी एक तास , कधी दोन तास ग्रंथालयात असतोच असतो.

आज पुस्तकातील त्या शब्दांनी भुरळ घातली. आणि दोन एक तास त्या कादंबरीतच गढून गेलो.दोन तासात कादंबरी वाचून काढली.त्याबद्दल थोड काही..

‘निशब्द शांतात’
दोन जिवलग मित्रांची हि कथा.
माधव आणि अभिजित .
कॉलेज च्या पहिल्या वर्षी पासूनच अगदी जीवाभावाचे मित्र. दोघंही हुशार.

माधवच्या घरात आई वडील आणि तो असं त्रिकुट तर अभिजितच्या घरी तो अगदी एकटाच..आई बाबा सोडून गेल्यानंतर आजोबांसोबत लहानचा मोठा झालेला. पण इतकं असूनही तो निर्व्यसनी. स्वभावाने चांगला.
माधव नेहमीच मानवी स्वभावाच्या प्रश्नात गुंतलेला. हे असंच का ? तसंच का ? त्याला मानसशात्रात अधिक रस तर अभिजित समाजशात्रात रस घेणारा.
दोघंही एकत्रित कॉलेजला, त्यामुळे बोलण्यासारखे विषय अधिक..कॉलेज सुटल्या नंतर एखाद निवांत ठिकाणी चहाचा घोट घेत घेत दोघा मित्रांची गप्पांची वर्दळसुरु होत.
एक दिवस हे दोघे कॉलेज मित्रांसोबत पिकनिक ठरवतात. माळशेज सारख्या निसर्गमय घाटात अन तिथे माधवचे एका मैत्रिणीशी म्हणजेच मेघनाशी सुत जुळते. पुढे ती मैत्री
वाढते अधिक घट्ट होते. मैत्रीची सीमारेषा ओलांडली कि प्रेमाची हद्द सुरु होते. तसं त्यांचा बाबतीतही घडतं.
मैत्रीच प्रेमात रुपांतर होत ते त्यांनाही कळत नाही. कळून येत नाही. आणि ते येताच ते कसं व्यक्त करावं हा प्रश्न..
एक दिवस दोघे अश्याच एके ठिकाणी भेट घेतात. तेंव्हा न राहवून माधव तिला कविता वाचून दाखवतो.

एक छानशी कविता …

‘कधी कधीच मला वाटतं ”
माझ्या भावनांची, संवेदनाची
तुला जाणीव असेलही
पण का कुंस ठाऊक
असा माझ्या मनातला वाटतं
आणि म्हणून मी हसतो
कधी कधी रुसतो
फक्त तुझ्यासाठी
आणि कधी कधी मनातल्या
मनात रडतो फक्त तुझ्यासाठी
तुझ्या न माझ्या
भावनाच्या आंदोलनाची
स्पंदन सारांच्याच हाती
पण तरीही आपली प्रीत
अबोल प्रेमाची..
या बोल प्रीतीतच वाटतं
एकदा बोलून टाकावं.
पण योगच येत नाही.
आलच तर फक्त सहवास
सहवासात काय ?डोळ्यांची भाषा
पण किती दिवस बोलायची?
हसायचं मनातल्या मनात
पण किती दिवस ?
रुसायचं दोघांनी हि
पण किती दिवस ?
भांडायचं पण दोघांनी
पण किती दिवस ?
दिवसाच मोजमाप
तू करायचं कि मी ?
वेडे विसरलीस
तुझ्या अन माझ्या मनातल्या
अतृत्प्त इच्छा
तू देखील बोललीस
अन मी देखील
खूप बोललो खूप बोललो
खूप खूप बोललो
पण मनातले शब्द ओठांपर्यंत
आलेच नाहीत .
जे आलेत ते प्रेमाचे प्रतिक बनून
व्यक्त झालेच नाहीत
दोष तुझ्यातही असेल अन
माझ्यातही
तुलाही बोलावस वाटतं
अन मलाही

पण मी जाणल्या गं
तुझ्या मनातल्या भावना
सांगू का या गवतांच्या पात्यांना
त्या हलणाऱ्या पानांना
या झुळझुळणाऱ्या हवेला
या मातीच्या वासाला ..

दोघांच्या हि मनात एकमेकांविषयी नितांत प्रेम आहे.
पण असं असूनही त्याना अजूनही एकमेकांना ते व्यक्त करता येत नाही.
पुढे मात्र ते व्यक्त होतं आणि अन लग्नाच्या बंधनात त्या भावी स्वप्नात गुंगूनजातात.

तर तिकडे अभिजित त्याच्याच ऑफिस मधल्या एकीशी सूत जुळतं . प्रेम वगैरे ह्यात न पडणारा अभिजित चक्क प्रेमात पडतो.
लहानपणापासून आई – वडिलांपासून पोरका असलेला, आधारविना असलेला अभिजित .आता आधार शोधू पाहतो. लग्नाची स्वप्नं गिरवतो. पण अजूनही त्यानं आपलं ‘प्रेम’ व्यक्त केलल नसतं. पण एकदिवस तो मनाशी ठरवितो .
आज व्यक्त व्हायचं.
पण ज्यावेळेस मनाशी ठरवून तो आपलं प्रेम व्यक्त करायला जातो. त्यावेळेस नेमक अघटीत घडतं.
मनी रंगवलेल्या स्वप्नाचा धुरळा उडतो. त्याचा विश्वास बसत नाही .असह्य वेदना मात्र मनाला पोखरून काढतात. माझ्या नशिबातच काही नाही. काही नाही..

तर दुसरीकडे माधवाच्या जीवनात हि अशीच एक घटना घडते. रंगवलेल्या स्वप्नांचा चक्काचूर होतो.
का हे असं ? तिने विचार तरी करायचा..

दोघांच्याही जीवनाचा असा रंग उडालेला असता ते दोघे मित्र एक दिवस भेटतात. एकमेकांच्या आयुष्यात घडलेल्या त्या घटना दोघांनाही ठाऊक नसतात.
सगळं कसं खुशाल अन सुरळीत सुरु असेल अशी एकमेकांची विचार भावना असते.
काय माधव , कधी करतोयस लग्न ?
माझ सोड, तू तिला प्रपोज केलस का ?
दोघंही निशब्द राहतात. बोलू रे कधीतरी, ह्या विषयी आणि चालू
लागतात. घराकडे ..घरा दिशेने.
अशी हि जेमतेम कथा. गुंतवून ठेवणारी..
अवश्य वाचा ..

निशब्द शांतता – दिनेश काळे
ह्यातील काही वाक्य मनाला स्पर्शून जातात. तर वर दिलेली कविता मनावर आरूढ होते.

वाचाल तर वाचाल (पुस्तकांच्या दुनियेत)
.- संकेत पाटेकर

वाचाल तर वाचाल

Leave a Comment

Your email address will not be published.