नियतीचा खेळ..

हृदया : एक स्वप्नं सखी ….
 
ती : एक विचारू
तो : विचार ना..
ती : तुला  माझा हात , का हाती घ्यावासा वाटला नाही ?
तो : काय (ज़रा अचंबित होवूनच… )
ती :  माझा हात , का पकड़ावासा वाटला  नाही. त्यादिवशी..
तो : आज अचानक असा प्रश्न …
ती : सहज रे ..
 
सहज म्हटलं  तरी , तिच्या अश्या एकाकी  प्रश्नाने तो अचंबितच  झाला . अस काही तिच्याकडून ऐकायला मिळेल. ह्याची त्याला कणभर ही चाहूल न्हवती. उलट आपण कुठल्या भ्रमात आहोत , असं त्याला एकाकी भासू लागलं.  पण ते  उघड सत्य होतं .
 
ती बोलत होती. तिच्या त्याचं  रसिक मधाळ वाणीत … आणि तो ते सगळं श्रवण करत होता. कान टवकारूंन अगदी…  
 
पण बोलता बोलता  तिच्या एकाकी  ह्या प्रश्नांन त्याच्या चेहरा,  मात्र अधिकतेने  उजळून निघाला .  आपल्या नात्यातील हि रेशीम गाठ आता अधिकाधिक घट्ट  होऊ पाहत आहे  , ह्या आनंदातच  तो दौड करू लागला होता.  पण आपल्याला उत्तर द्यायचं आहे ह्याची जाणीव होताच त्यानं  तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरवात  केली.
 
अगं !  आपली ती पहिलीच भेट होती… नाही का   ?
आणि पहिल्याच  त्या  भेटीत  , दोन अनोळखी एकत्र आल्यावर ,भेटल्यावर असं  एकाकी  हात , हाती
घेनं अन तेही ऐन गर्दीच्या ठिकाणी , मला ते योग्य वाटलं  नाही . आणि तसही ते  कितपतं  योग्य होतं  रे ? मुळात इच्छा असती तरीही …ते योग्य वाटलं  नसतं.  
कदाचित ..तुला काय वाटेल ह्या भीतीने हि असेल म्हणा किंव्हा माझ्या मनाला तेंव्हा ते पटलं नसावं  म्हणून कदाचित …माझ्याने ते धाडस तेंव्हा  झाले नाही.
 
खरं तर तो दिवसच  खूप नाविन्य अन खास होता. आपल्या दोघांसाठी हि..,
आठवतंय ना , मैत्री दिन , २ ऑगस्ट , रविवार
त्याच दिवशी आपल्या दोघांची भेट होण … हे केवेळ दैवी योग होतं.
योगायोगाने सगळं जुळून आलेलं.  जणू सात जन्मोजन्मीच्या बंधनात बांधलो गेलेलो आपण ,
 आज दैवी योजनेनुसारचं ठरल्या वेळेत भेटत होतो. आयुष्यभर कटिबंध होण्यासाठी ..हे ना ?
 
तशी आपली ओळख हि  जुनीच रे…पण ती Vartual , आभासी दुनियेतली..
सोशियल साईट च्या माध्यमातुन आपण एकमेकांशी संवाद साधत  होतो. त्यातूनच मनाचे धागे  नकळत कधी गुंफले गेले.  ते कळूनच आलं नाही.
मी तुला ह्या आधी कधी पाहिलं न्हवतं अन  तुही मला कधी पाहिलं नाहीस . 
जे सुरु होतं ते संवादाच्या जोरावर …….अगदी प्रपोज करण्यापासून  पासून ते लग्नाच्या गुजगोष्टी पर्यंत …साऱ्या गोष्टी…
भेटण्याआधीच हे सगळं  ठरवून मोकळे होत होतो आपण..न्हाई
काळाच्या किती पुढे निघून गेलो होतो रे आपण ..
आता ते सारं आठवलं  कि हसू येतं  अन् हळूच डोळ्याची कड हि  ओलावली जाते.
 
तुला सांगू..जेंव्हा  आपण भेटायचं ठरवलं होतं ना, त्याचवेळेस मनाशी काही गोष्टी योजिल्या होत्या मी..
म्हणजे  पाण्याच्या शिडकारयाने,  टवरलेला, लाल गुलाबी पाकळ्यांच्या प्रेम रंगानं न्हाहलेला  ,एखादा   नाजूकसा गुलाब , तुज्यासमोर धरावा आणि नजरेला नजरेशी रोखतं,  प्रेमाचे चार एक शब्द बोलून
मोकळं होवून जावं.   पण ते हि मला जमलं नाही.
साधा Friendship Band देखील मला तुझ्यासाठी घेता आला नाही …
वेळेअभावी  हा … म्हटलं तुला उगाच ताटकळत उभ व्हायला होईल.  त्यामुळे….
 
पण आता ते सगळं  आठवलं कि …… असो…
अधुरं राहिलं ते स्वप्नं…
 
दादर – शिवाजी पार्क मधली , आपली पहिली भेट कदापि विसरता येणार नाही .
खूप बोलक्या आठवणी अजूनही कानाशी अन नजरेशी गुजगोष्टी करू पाहतात आणि त्यानं मी बेभान होवून जातो पुन्हा पुन्हा…त्याच वळणावर..त्याच ठिकाणी .
निर्मळ हास्याची  वारेमाप उधळण करतं …अन नजरेशी तुला पहात ….
 
आता हि तेचं झालयं बघ..
आठवणीतले तुझे बोल मी स्वतःशीच गुणगुणतोय..
 
बघ,  येतयं  का रे ऐकू…??
 
तुला  माझा हात, का हाती घ्यावासा वाटला नाही ? हे तुझचं  वाक्य मनाला भिडतयं  पुन्हा पुन्हा  , मना चं  दार जोर जोरात ठोठावतं. 
ऐकतेस का ?
 
माझ्या हृदयाची हाक पोहचते का रे तुझ्याशि..कुठे आहेस  तू…
 
प्रेमाची सांगता हि स्पर्शाने होते . अस वपु म्हणतात . पण तो जिव्हाळ्याचा स्पर्शच माझ्याकडून रीता राहिला रे..
प्रेमाची सांगता तर झालीच नाही. पण सगळचं कस उदास अन्  रीतचं राहीलं. 
 
का मी तुझा हात धरला नाही . तेंव्हा  ? का ते क्षण माझ्या हातून निसटुन गेले. ?
की हीच दैवी योजना होती.? माहीत नाही . जे झालं ते झालं. 
 
कदाचित तुझा हात तेंव्हाच धरुन राहिलो असतो तर …आज हि वेळ आली नसती.
मनात एकदुसऱ्या विषयी  जिव्हाळा असूनही…. असे आपण दुरावलो नसतो.
 
पण हा खेळ आहे नियतीचा ..ज्याला जे योग्य तेच त्याला मिळणार .
 
सांज संध्या समयी तळ्याकाठी एकटक बसून ….क्षितिजाच्या मावळत्या रुपाला पाहून तो  तिच्या आठवणीत आजही गुंतला होता. 
क्रमश :
हृदया : एक स्वप्नं सखी ….
संकेत पाटेकर

 

Leave a Comment

Your email address will not be published.