नात्यातलं मनं आणि आपण

नात्यातलं मनं आणि आपण ..

एखादा कागदाचा बोळा रस्त्यावरून जाता येता अगदी सहजतेने भिरकावून द्यावा.
त्याप्रमाणे हि नाती हि अगदी सहजतेने भिरकावून देता येतात का वो ?

सकाळच पांघरुणातून नाही डोळे उघडले तर असा प्रश्नांनी काहूर माजवलं मनामध्ये ….
खरचं इतक्या सहजतेने नाती तोडता येतात ?
जुळलेल मनं , असलेले प्रेम , आपुलकी इतक्या सहजतेने भिरकावून देता येते ? 
मग अश्या ह्या नात्याला नाव काय द्याव ? काय म्हणावं ?

प्रश्न नि प्रश्नच<<<<<<<<

गरजेपुरतं अन नावापुरतं नातं म्हणून घेणारी, जवळ करणारी लोकं,  आयुष्यात येतात अन मनावर अधिराज्य गाजवून मनापासूनच दूर निघून जातात.  त्यांना आपल्या मनाची ना फिकीर असते . ना कसली चिंता… आपला जीव मात्र त्यामध्ये घुटमळतो .
अन श्वास हि कोंडला जातो. …कारण माणसं ओळखता येत नाही .

मुखवटा घालून फिरणारी माणसं आपला खरा चेहरा दाखवत नाही.
तो मुखवटा उतरवला जातो तेंव्हा कळत, त्यांच्या मनात आपल्याविषयी काहीच स्थान नाही . ना प्रेम ना आपुलकी …..

कळवळत मन अश्यावेळी ..पण तरीही मनं नावच हे अजब प्रकार , स्वतःचीच पाठ थोपाटतो.
अन म्हणत , जाऊ दे ना यार , तू खंर प्रेम केलेस ना , मग सोड ना..
प्रेम निस्वार्थ असावं, त्यांनी स्वार्थ साधला तू कशाला त्यांच्या वाटेला जातोयस .. .

आज ना उद्या त्यांना प्रेमाची अन व्यक्तीची किंम्मत कळेलच .
ते वेळेवर सोपवून दे … अन निवांत रहा …

आयुष्यात खरच प्रेमासारखी दुर्मिळ गोष्ट नाही . हो दुर्मिळच , मी दुर्मिळ म्हटलंय अशाकरिता कारण ‘ प्रेम ” अन त्यातला आनंद आपल्या जवळ असूनही ते कुणाला निस्वार्थ मनाने देता येत नाही. ज्यांना खरच मायेच्या प्रेमळ स्पर्शाची , आपलेपणाची ..नितांत गरज असते.

एखाद्यावर निस्वार्थपणे प्रेम करायला ,सयंमी मनाची अन सार काही सहन करण्याची कला मनी अवगत असावी लागते. किंव्हा ती भिनवावी लागते.

कारण इथे मायेच्या स्पर्शासाठी अन प्रेमासाठी क्षण क्षण धडपडणारे खूप जण आहेत.
त्यांना गरज आहे ती आपली , आपलेपणाची …..दोन गोड शब्दांची …. आपल्या सहवासाची …
पैसा सर्व काही विकत घेऊ शकत नाही. प्रेम तर मुळीच नाही.

माझ्या मनाला मी घडवतोय ….आकार देतोय.
कारण रस्त्याने जाता येता , प्रवासात , किंव्हा आपल्याच माणसांत ते चित्र डोळ्यसमोर हमखास दिसतं . …. मला जगायचं ते अश्याच प्रेमासाठी……अश्याच लोकांसाठी.

नात्यातलं मनं आणि आपण ..

संकेत य पाटेकर

मनातले काही …

मराठी लेख|  Marathi Lekh |Marathi Article

 

Leave a Comment

Your email address will not be published.