नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची

काही नाती हि फक्त दोन अक्षांरा पुरतीच मर्यादित असतात . त्यात आपलेपण हा नसतोच . साध्या – छोट्या अपेक्षा हि जिथे पूर्ण करता येत नाहीत ते नातं कसल ते असूनही मृत असल्यासारखंच .

खर तर अपेक्षा ह्या करूच नये , पण पण साध्या छोट्या अपेक्षा हि करू नये का ? बर ह्या अपेक्षा हि कुणाकडून हि नसतात , त्या आपल्याच माणसांकडून असतात . पण त्या हि काही वेळा पूर्ण होत नाही . अशा वेळेस थोडस निराशपण येतंच , पण म्हणून त्या व्यक्तीला दोष देण हि योग्य नाही . जे नशिबात आहे ते आहे . पण तरी हि …

काही सेकंदासाठी का होईना , आपल्या व्यक्ती साठी आपल्या बिझी शेड्युल्ड मधून थोडा वेळ हा काढावा. ५ मिनिट का होईना थोडं बोलाव , कधीतरी भेटाव …, मी म्हणत नाही वारंवार फोनवरच राहावं , प्रत्येकवेळी भेटाव – भेटत राहावं …पण कधी तरी ..केव्हातरी … या इवल्याश्या मनाला दिलासा …

खर तर …

एकमेकांच एकमेकांवर मनापासून प्रेम असेल , एकमेकांविषयी ”आपलेपणाची” भावना दृढ असेल, आणि जिथे सामंज्यस पणाची जाणीव असेल तेच नातं खरया अर्थानं ”विश्वासाचं नातं’ असत . आणि त्या नात्यात प्रसन्नतेच तेज कायम झळाळत राहत.

अहो , नाती आहेत म्हणून आपण आहोत , आपण आहोत म्हणून आपलेपण आहे , एकमेकांवर प्रेम आहे .

मनातले काही ..

नातं तुझं माझं

संकेत य पाटेकर

१६.०९.२०१३

Leave a Reply

Your email address will not be published.