नाती नव्याची नाविन्याची आणि मुरझलेली

नाती नव्याची नाविन्याची आणि मुरझलेली

ह्या नात्यांची फार गंमत वाटते मला, ‘नव्याने जुळलेल्या अन क्षणातच मुरझलेल्या’
म्हणजे अनोळखी असतो तेंव्हा ओळखी साठी धडपडत राहतो आपण…
नवा चेहरा , नवं नाव…नवी ओळख ,नवं मन ..नवा स्वभाव , नवे बोल …. ,
सगळं..उत्साहपूर्ण.., मैत्रीपूर्ण अगदी….


एकमेकांना जाणून घेत घेत .. आपण एकमेकांच्या अधिकाधिक जवळ ओढले जातो काय .
रोज काही ना काही… नवं नवीन विषय घेऊन , त्यावर बोलणं होत काय..


अधून मधून थट्टा मस्करी , कधीतरी भेटणं….कुठशी एकत्रित क्षण घालवणं …आठवणी गुंफत जाणं आणि अस करता करता ..
कालांतराने ..म्हणजे जास्त नाही काही ..महिन्यातच , किंव्हा वर्षभरातच … बोलता बोलता . त्या उत्साहाला , आपण विरजण घालतो काय…सगळं अगदी सुफर फास्ट ..नॉन स्टॉप ?
तीन तसाच्या चित्रपटासारखं ..सुरवात आणि दि एन्ड हि…,


नातं जुळलं कधी आणि प्रवाहात वाहून गेलं कधी ह्याचा थांगपत्ताच लागत नाही .
सर्व घडामोडी कश्या पटकन घडून जातात. आणि एकाकी शिथिल होतं जातात.
अश्यावेळी स्वतःकडेच पाहून हसू येतं. मन पुटपुटतं काहीसं स्वतःशीच .. म्हणतं.


काही नाती हि अशीच असतात . ‘नावीन्याला’ हपापलेली. नावीन्य असेपर्यंत नात्यात ‘जीव’.
ते संपलं कि नातं हि कोमजल्या फुलाप्रमाणे मान टाकून देत …पुढे होतं .

Leave a Reply

Your email address will not be published.