नाती-गोती

ना ना विविध मनाच्या ह्या नाती .
सांभाळण खुप अवघड जातं. ओढाताण होते मनाची काही वेळा , काही प्रसंगी ..
प्रत्येकाचा स्वभाव निराळा ..प्रत्येकाचं मन वेगळ ,प्रत्येकाची विचार करण्याची
पद्धत वेगळी,प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या .., 
कुणी सहज समजून घेतं , चेहऱ्यावर सहजतेच हास्य उमलत , कुणी समजण्यापलीकडे जातं, नाक मुरडतं  ..रागाचा पारा चढवत…!
कुणी हट्टच धरून बसतं , कुणी गृहीतच धरून राहतं.
ओढाताण होते मनाची अश्यावेळी …, कुठे कुठे लक्ष द्यावं , कुणा कुणाला
सांभाळाव .पण संभाळण भाग असतं… नाती हवी असतात .


कारण आयुष्य खूप सुंदर आहे. अन ते आपल्या अवती भोवती असलेल्या , आपल्या मनाशी
जुळल्या नात्यातील , त्या त्या व्यक्ती अन त्यांच्या आपलेपणाने अधिक सहज
सुंदर होवून जातं.


पण राहून राहून कधी प्रश्न पडतो ..
समजणारे , समजून घेणारे , अन प्रसंगी अगदी प्रेमाने समजून सांगणारे सारेच असले
असते तर …
पण ह्या ‘जर’- तर’ ला अर्थच कुठे असतो म्हणा ….
ह्यातूनच मर्यादेची एक रूपरेखा आखली जाते , आपल्या मनाशी ..
कुणाशी किती अंतर राखून राहायचं ..कुणाशी किती बोलायचं ..कुणाच्या किती जवळ
जायचं .
असंच लिहिता लिहिता…
मनातल काही ..
संकेत य पाटेकर
१४.०७.२०१५

Leave a Comment

Your email address will not be published.