शांत होsssss शांत हो sssss मना..

किती त्रास करून घेशील रे, स्वतःला ?
शांत हो, का ओढावून घेतोयस स्वतःला ह्या विशाल दु:ख सागरात ?
जिथे आनंदाचा एक थेंब हि मिळणे कदापि शक्य नाही.
जिथे हास्याची तरल भावना हि कधीच लहरत नाही. का करून घेतोयस त्रास असा ?

का अशा अपेक्षांचं भार स्वतःवर ओढावून घेतोयस ? हे ठाऊक असूनही कि त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत ?
का इतकं प्रेम करतोयस ? त्या व्यक्तींवर जिथे आपल्या असण्याला..जिथे आपल्या शब्दाला हि मुळीच किंमत नाही ?
का असं करतोयस ?
का असं वागतोयस ?
का असा धडपडतोयस ?

जीवन अवघं काही क्षणाचचं आहे रे, कधी कोण जाणे ह्या मृत्यूशी गाठ भेट घडेल .
त्यामुळे जे आहे त्यातचं समाधानी व्हायला शिक, थोडं आनंदात जगायला शिक,
मोकळेपणे हसायला शिक, दुखात हि आनंदाची कला जपायला शिक, स्वतःच दुख लपवून दुसर्यांच्या आनंद बनायला शिक,
ऐकतोयस ना ? मी जे काही बोलतोय ते ऐकतोयस ना ?
हृदय अगदी तळमळीने मनास समजावून पाहत होता. शेवटी दोघांमध्ये हि घट्ट मैत्रीच नातं जे होतं. जीवापाड प्रेम होतं.

कित्येक दिवस झाले. हास्याचा लवलेश हि त्याने मनाशी फिरकताना पाहिला न्हवता .
एकांतात शांत बसून तो कित्येक तास स्वतःच्याच प्रश्नाची उत्तर शोधू पाहे.
पण उत्तर मिळूनही त्याचं समाधान काही होत नसे. त्यामुळे सतत दु:खाच्या छायेखाली तो गुरफटत असे. त्याची हि अवस्था हृदयास पाहवत न्हवती. त्याचं असं वागणं हृदयास त्रास दायक हि ठरत होतं .
त्याचा वेग कधी मंदावत तर कधी अधिक वेगाने धधडत, एक दिवस हे सारं अनावर झालं नि हृदयाने ठरवलं आपण थोडस समजावून पाहू .

आणि त्याने सुरवात केली .
ऐकतोयस ना ? मी जे काही बोलतोय ते ..
हो, ऐकतोय रे भावा, सर्व काही ऐकतोय मला हे ठाऊक नाही असं नाही रे, सारं काही कळतंय .
जीवन अवघे काही क्षणाचचं आहे. ठाऊक आहे.
आज आहोत उद्या नसू हि, कोण जाणे कधी मृत्यूशी गाठ भेट घडेल, सांगता येत नाही.
आनंदित जगायला हवचं यार ..
पण काही गोष्टी नीटशा कळत नाही रे, त्या विचारात मग दिवस रात्र गढून जातो.
त्यातून बाहेर हि पडता येत नाही . किंव्हा कसं बाहेर पडावं ते हि कळत नाही .
घरा व्यक्तीरिक्त जेंव्हा आपला बाहेरील जगाशी संबंध येतो. तेंव्हा बऱ्याशच्या गोष्टींचा कळत नकळत आपल्यावर परिणाम होत असतो.
वेगवेगळ्या स्वभावाची, वेग वेगळ्या शैलीची माणसे आपल्या आयुष्याशी जोडली जातात. वाटेवरल्या टप्प्या टप्प्या प्रमाणे आणि त्यातूनच मग काही अनामिक नाती निर्माण होतात. काही जिवाभावाची जिवलग प्रेमाची, मना मनाची..

मग रक्ताची नाती नसली तरी आपण त्यात स्वतःला सर्वस्वी वाहून घेतो.
आनंद उपभोक्तो त्या क्षणांचा. त्यावेळेस वाटत देवाने आपल गाऱ्हांन ऐकलं !
आपल्याला हवं ते त्यान दिलं. पण ते काही क्षणाचचं असतं असं पुढे समजतं .

कोणत्याही गोष्टीचा आनंद सदा सर्वकाळ टिकून राहत नाही रे, तसंच काहीस दु:खाच देखील आहे.
पण शेवटी ते आठवणीतले गोजिरवाणे क्षणच आपली सोबत करतात आयुष्यभर..
असो,

प्रेमा सारखी हसरी आणि दुखी गोष्ट इतर कुठलीच नाही.
प्रेम हेचि जीवन हे आजपर्यंत मी मानत आलो होतो. पण आता अनुभवाने शिकलोय,  प्रेम हे जरी जीवन मानलं तरी जीवन म्हणजे प्रेम नाही रे, प्रेमा पलीकडे हि इतर गोष्टी आहेत. ज्यांचं मोल फार मोठ आहे .पण त्यात हि कुठे ना कुठे प्रेमाचा अंश हा दडलेला आहे हे हि तितकंच खरं आहे.

छान ! म्हणजे अनुभवाने तुला शहाणे केले तर, मनाचे मनातले हे अनुभवी बोल इतका वेळ शांतपणे एकूण घेतल्यावर हृदयाने हळूच स्मित हास्य केले अन बोलण्यास सुरवात केली.

‘बरोबर आहे तुझं , प्रेमाचा अंश हा सर्वत्र असतोच, कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत, त्याचाशिवाय जीवनानंद तो कुठला रे’

फक्त अपेक्षांचं ओझं नको त्यात, असलं तरी त्याच भार इतकं नको घेऊ कि हे जीवनक्षण भकास वाटेल. दुखांनी व्यापलेलं.
आनंद तसा सर्वत्र ओसंडून वाहतच असतो रे…तू पहिलस तर..
पण तशी दृष्टी हवी पाहण्याची आणि तुझ्या वेळीच वळणाची.
तसं अडकून कुठेच राहायचं नसतं. नेहमी मार्ग शोधायचा तो आनंदाचा, हर्षाचा,  मोकळ्या श्वासेचा , प्रकाशित जीवनाचा. बरोबर ना, मना ? हो रे भावा..

दुसऱयांसाठी जरुरू जगावं. पण त्या आधी स्वत:हा जगायला शिकावं. आनंद घ्यायला शिकावं . आनंद द्यायला शिकावं.

ह्यास जीवन ऐसे नावं !

नातं – हृदय अन मनाचं  – संकेत पाटेकर

Leave a Reply

Your email address will not be published.