सर्वच नाती काही रक्ताची नसतात . काही नाती मनानं जुळली जातात .
आयुष्याच्या पायवाटेवर निवांतपणे कधी धावत पळत असता…

त्यात बहिण भावाच्या ह्या अनमोल रत्नाचं हि समावेश असतो .
भावाचं निरागस ‘प्रेम’ अन बहिणीची अफाट ‘माया’ हे सर्वांच्या भाग्योदयी नसतं.  अन म्हणूनच मनाला एक आस लागून राहते . कायम …

आपल्यालाही एखादी नाजुकशी फुलसुंदर भोळीभाबडी, सुंदर कोमल मनाची लाडी वाडी करणारी , खट्याळ-खेळकर अशी बहिण असावी.
किंव्हा सदैव साथ न सोडणारा , अडचणीत नेहमीच आपल्यासोबत असणारा , समजुददार प्रेमळ असा भाऊ असावा . अस सतत वाटत राहतं.
आणि आपण जे मनापासून इच्छितो ते बहुदा पूर्ण हि होतं.

जन्मतःच आपल्याला सर्व काही मिळत नाही . काही गोष्टी आपल्याला आयुष्याची झगडताना मिळवायच्या असतात तर काही ‘ अनमोल नात्यांसारख्या ‘ गोष्टी ईश्वर योग्य त्या वेळेत ‘ भेटी-गाठींचा कार्यक्रम आखून ‘ ते जुळवून देत असतो.

मग अशातच कुणाला बहिणीचं प्रेम मिळालं नसेल . कुणाला बहिण नसेल तर त्याला एखाद्या वळणावर तो तोची भेट घडवून देतो. भले ते नातं रक्ताचं नसो. पण त्या व्यक्तीत ते नातं अन नात्यातलं ते निरागस प्रेम आपल्या नजरेच्या कक्षेत बागडू लागतं. खेळकर क्षणांना सोबत करून .

बहिणीची किंमत अन तीच प्रेम तिची माया काय असते ह्याची जाण असतेच आपल्याला .
भले हि सख्खी बहिण नसली तरीहि …कारण त्या प्रेमासाठी आपण आसुसलेलो असतो गेली कित्येक वर्ष . पण ते प्रेम आपण इत्क्यावेळेस फक्त आपल्या नजरेनी पाहत असतो. इतर कुटुंबातील त्या भावा- बहिणीच्या जोडी कडे पाहून ….बस्स

पण कधी ना कधी आपल्याला आपल्या मनातील ती व्यक्ती प्रत्यक्ष भेटते. एका वळणावर , अन नात जुळलं जातं विश्वासाचं .

बहिणीचं ते कृपाळू प्रेम मिळू लागतं . तोच हट्टीपणा तोच बहिण भावातला खेळकरपणा . तीच लाडी गोडी . तेच गोंडस प्रेम . क्षण अगदी फुलू लागतात . नव्याने हसऱ्या मार्गाने आनंदाचा सुगंधी द्रव्य दाही दिशांना पसरवून .. ज्या प्रेमासाठी आपण इतके वर्ष आसुसलेलो असतो. ते प्रेम आता मिळतं असतं . मिळू लागतं . त्यामुळे चैतन्याचा नवा सागरच जणू आपल्यात संचारलेला असतो.

अशा बहिणी तुम्हा आम्हाला लाभलेल्या असतात . किंव्हा एखाद्या बहिणीला आपल्यासारखा भाऊ लाभलेला असतो.

हे नातं जरी रक्ताचं नसलं तरी ..प्रेमाचं , विश्वासाचं अन मना मनाचं असतं. अन ते कायम तसंच राहावं हीच आपली प्रामाणिक इच्छा अन प्रार्थना असते भगवंताजवळ . माझी हि अशीच प्रामाणिक इच्छा अन प्रार्थना आहे . देवा ऐकतोयस नारे …;););)

नातं बहिण भावाचं – नातं प्रेमाचं

आपलाच ,

संकेत य पाटेकर

0 thoughts on “नातं बहिण भावाचं – नातं प्रेमाचं”

Leave a Reply

Your email address will not be published.