नातं.. तुझं माझं

नातं.. तुझं माझं

प्रेम हे…

प्रेम फक्त ‘आपलेपणाचं’ जाणतं अन म्ह्णूनच हृदयाशी पडणारे घाव कितीही गहिरे असले ना, तरी ते आपलेपणानेच प्रत्येक गोष्ट स्वीकरतं जातं.

हे ‘स्वीकारणं’ म्हणजे काही हतबलता नाही हा..
ती प्रेमातली अन नात्यातली सर्वात मोठी जबाबदारी आहे. जी तुझ्या माझ्या नात्यातला सुसंवादीपणा आणि आपलेपणा टिकवून ठेवते.

मी म्हणूनच तर म्हणतोय ना, तू फक्त आपलेपणा ओत
.’स्वीकरण्याची’ हि क्रिया अगदी सहजच येत जाईल अन नातं उमलत्या फुलासारखं गंधित होंऊन आयुष्याची घडीहि , हसऱ्या वाणीनं अन खेळत्या मनानं मोकळी होत जाईल.
कळतंय ना ?

संकेत पाटेकर

पुस्तकांची सूची

वाचाल तर वाचाल ( पुस्तकांच्या सहवासात )

इथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published.