नजरेतील वासना

नजरेतील वासना

६ वाजून गेले होते ..ऑफिस मधून आज जरा उशीरच निघालो.

अंधेरी ते ठाणे हा लोकल प्रवास नेहमीचाच, अंधेरी स्थानकापासून साधारण अर्धा तास तरी पायी चालून ऑफिस गाठव लागतं. संध्याकाळी पुन्हा हि तेच … ऑफिस   ते अंधेरी पायी प्रवास ..
काल असाच बाहेर पडलो. अंधेरी स्थानका जवळ येतंच होतो.  तेंव्हा त्या एका घटनेने मनाला पार चिघळून टाकले . संताप तर होताच . तो अनावर झाला , पण ते क्षण हातून निसटून गेले . त्याला तिथेच बरडला पाहिजे होता. म्हटलं किती हि वासना …आई वडलांनी ह्याना वारयावरच सोडून दिलेलं दिसतंय.
लाज लज्जा शरम ..काहीच नाही.

फक्त स्त्री म्हटल कि ती भोगाची वस्तू बस इतकाच ह्याचा डोक्यात ठनकुन भरलाय कि काय ? 
अशी कशी हि लोक …… वासनेने भरलेली .
शिवीगाळ करणारे ..संस्कार आई वडलांनी दिले नाहीत , नाहीतर शिव्यांची लाखोली वाहिली असती.

अरे रस्त्यातून जाता येता दिसणारी ‘ ती’ कुणाची तरी बहिण असेल.  मी म्हणतो कुणाची बहिण तरी कशाला मानायला हवी आपलीच समजून  बहिण माना ना रे ? 
निदान ते हि नाही होत तर असे घाणेरड्या नजरेतून बघनं अन नको ते शब्द उच्चारण, जाणून बुजून धक्का देण हे तरी सोडून द्या…माणसात या जरा ….माणसात. 

रस्त्याने सरळ जात असता , त्या मुलाने तिच्या समोर येउन जाणून बुजून धक्का दिला.
अन ती मुलगी स्वतःशीच काही पुटपुटत एकवार पाठीमागे पाहत घाई घाईत निघून गेली.
तो हि तिथून लगेच पसार झाला.
ते सारे क्षण मी पहिले खरे पण काहीच करू शकलो नाही. कारण क्षण हातून निसटून गेले होते.

पण मनाला स्वस्त बसू देत न्हवते.
ती एक बहिण काहीच न बोलता निघून गेली, पण तुम्ही नका सोडू अशा भामट्यांना..

अद्दल घड्वाच……..त्याशिवाय सुधारायचे नाहीत …साले..!

नजरेतील वासना

– संकेत य पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.