धक्याची दादागिरी बोले तो भाईगिरी ..

धक्याची दादागिरी बोले तो भाईगिरी ..

सकाळची वेळ , रम्य अन मनं मोकळ वातावरण…नेहमीच्याच आपल्या रुटीन प्रमाणे ऑफिस साठी घर सोडलं.  पंधरा एक मिनिटाच्या पायपिटी नंतर स्टेशन परिसरात दाखल झालो.  अन नेहमीच्या त्याच गर्दीत त्याच असंख्य हसऱ्या दुखऱ्या चेहऱ्यात मिसळून गेलो.

क्षण त्याच गतीत काहीसे पुढे सरले.
अन आयुष्याचं जीवनसार कथन करणारी मुंबईची ‘ ती ‘ जीवन वाहिनी ‘ लोकल ट्रेन आपल्याच लयात अगदी संगीत तालानिशी फलाट क्रमांक १ वर दाखल झाली. अन लोकांची एकच झुंबड उडाली उतरनार्यांच्या आधीच चढणारे आप आपल्या सीट पडकून निवांत झाले.
सीट मिळण्याचा आनंद किती और असतो ते मुंबईतल्या लोकल मधून प्रवास करणाऱ्या लोकांकडून शिकावं.  मी हि त्याच गर्दीतला एक प्रवासी… मलाही सीट मिळाली. अन काही मिनिटाच्या अवधी नंतर टिंग टिंग अश्या घंटानादाने गाडी धीम्या गतीने पुढे धावू लागली. ठाणे – घाटकोपर प्रवास आतासा सुरु झाला.

वीस मिनिटाचा रिकामा वेळ हाती होता . हाती असलेल्या मोबाईलची Battery पूर्णतः डाऊन दिशेने गेल्यामुळे त्यात लक्ष घालायला वावच न्हवता. त्यामुळे जवळ असलेलं पुस्तक चाळाव अस मनानं मनालाच सुचित केलं अन मग अद्भुताच्या शोधात मन गढून गेलं.

उल्हास राणे लिखित ‘अद्भुताच्या शोधात’ हि एक सुंदर कादंबरी काही दिवसापूर्वी हाती आली होती. फुलपाखरांच्या अद्भुत जगात नेणारी हि कादंबरी आपणास अरुणाचल प्रदेश, नागालँड , मणिपूर अंदमानची संशोधनात्मक सैर करून आणते. शब्दांची गुंफण इतकी रसाळ केली आहे लेखकाने कि त्यात मन हरखून जातं. कृष्मयुरीचं (फुलपाखरूच ) तर ते लावण्यमय वर्णन हृदयास भिडून जातं.

गेले तीन एक दिवस वेळ मिळेल त्या प्रमाणे मी त्या ‘अद्भुताच्या शोधात’ स्वतःला वाहून घेत. आजही असंच मन त्या अद्भुत जगात गढून गेल होतं.

ट्रेन आपल्याच लयात पुढे सरकत होती. एक एक स्टेशन मागे टाकत. अशातच वायू वेगाने एक ‘ शिवी ‘ कानावर आदळली. अन मनाची ती तंद्रीच साफ बिघडली. सारं लक्ष त्या कानपटी दुषित करणाऱ्या शिव्याकडे वळल. अन ते दृश अन वायफळ शब्द मनाच्या साच्यात बंदिस्त होऊ लागली.

हल्ली शिव्यांच म्हणा एक fashion झालंय म्हणा . प्रत्येक वाक्यात , नाही नाही .. वाक्याभर एखाद कुठला ‘ सभ्य’ शब्द सोडून शिव्यांचाच पुरां शब्द्कोष असतो.
मग ते सार्वजनीक ठिकाण असो वा इतर कुठे हि. अभिमान बाळगावा अश्या तर्हेने जो तो आई – बहिणीवरून अगदी हसत हसत शिवीगाळ करतो. मग सोबत आई – बहिण असली तरी ..त्यांना काहीच नाही. …कसली आली आहे मनाची लाज …..?

तर असो,

साऱ्यांच सार लक्ष माझ्यासकट अगदी त्यां शिव्यांच्या दिशेने .
हातघाई वर आलेल्या त्या दोघां इसमांकडे . धक्का बुक्कीच साधासच अन नेहमीचच कारण ते .
बस्स त्यावरून त्या दोघा मनाची तीढी भरकटली होती… शिव्यांची लाखोली वाहत..एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतं.

पुढे ते प्रकरण इतकं चिघळलं कि त्या एकाने( हट्ट्या कट्ट्या व्यक्तीने , पुढे कळलं कि तो खाकीवर्दी वाला होता )समोरच्या कानफाडात मारायला सुरवात केली.  अन दोघात हि झुंबड उडली.

दोघेही कुणा ग्रुपचे नसल्याने बसलेल्यांपैकी कुणा एकाची बाजू घेण्याचा प्रश्नच न्हवता .
जो  तो पाहत …ऐकत.
हेल्लो कंट्रोल रूम , एक आतंकवादी सापडलाय. ? आणतो पकडून . .साल्याला..
पुढे शिव्या अन शिव्याच ..( भासवण्यापुरताच काय ते कंट्रोल रूम ,,,ते कळायला सार्याना वेळ लागला नाही . ) खाकी वर्दिवाला मोठ्या फुशार्कीत समोरच्याला हासडत होता.
कानाखाली एक एक लगावत .
समोरचा मात्र तो पोलिस आहे कळून चुकल्या पासून नमतं घेत मार खाई .

हे बघा , माहिती आहे तुम्ही पोलिस आहे ते , माझे हि नातेवाईक पोलिस आहेत समजलं.
समोरचा अगदी रडकुंडीला येउन बोलत होता.
पण वर्दी वाल्याची मिजास वाढत चालली होती. हात उगारत त्यावर शिव्यांची बरसात चालूच होती.

हे पाहून डब्यातले सारे एकदम खवळले ..
अन एकच गोंगाट सुरु झाला . पकडा त्या पोलिसालाच …हाणां त्याला ..हाणा …
तेवढ्यात बरोबर लोकलचा पुढचा स्टोप आला . लोकल थांबली . अन ते दोघे हि कुठल्या कुठे पसार झाले . ते कळलंच नाही .

एक मात्र नक्की उपस्थित प्रवाशांना योग्य तो न्याय कुणाला द्यायचा ते अगदी बरोबर कळून आलं .
अजून काही वेळ असता तर नक्कीच त्या वर्दी वाल्याची सामूहाईक धुलाई झाली असती.
चुकी नक्की कुणाची हे कोणाला कळणारच न्हवतं. पण उगाच समोरच्याने नमतं घेतलं तरीहि सुरु असलेली त्या दुसऱ्याची मिजास मात्र वाढत चालली होती.  अन त्यासाठीच इथे पब्लिक न्याय झाला होता.

धक्याची दादागिरी – बोले तो भाईगिरी ..वर ..

एक मात्र आहे . अस काही घडत तेंव्हा माझी नजर माझ्याच शरीरयष्टीकडे वळते.
मनालाच समजावत , बाबू वापस Gym Join करलेsss असा प्रसंग तुझ्या बाबतीत हि कधी घडायचा..

– संकेत य पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.

Translate »