‘दुर्गसखा आणि धुळवड’

आनंद मिळवून देणारी (अगदी निस्वार्थ हेतूने केली गेलेली.. ) कुठलीही गुंतवणूक हि इतर गुंतवणूक पेक्षा वेगळी नि सर्वश्रेष्ठ असते. असं मी मानतो, कारण  हृदयाच्या तळ गाभ्यातनं , मना मनावर आरूढ होणारी , हास्याची ती केवळ  एक निमुळती छटा,   आपल्या अंतरंगासोबतच आपल्या आयुष्याचा मार्ग हि  सुखासिद्ध करत असते. ते हि समाधानाने परिपूर्ण असं ..!

 
आणि  हेच महत्वाचं आहे आयुष्यात..” आनंदाच्या स्वाधीन होणं , आनंद घेणं आणि देणं ”
कारण आनंदाला व्याज नसतो.  मापदंड नसतो. ते निर्व्याज असतं .मोकळं असतं. सहज सोपं असतं आणि म्हणूनच ते सहज मिळविता येतं आणि सहज देता हि येतं . 
त्याला कारण हवंच असं काही नाही. मनाची तेवढी जाणीव असावी लागते. 
आनंद नेमका कश्यात आहे आणि कुठे आहे ? 
 हेच ‘दुर्गसखा‘ सारखी संस्था अचूकपणे जाणून आहे. 
”जीवनाला आनंदाचा लेप हवाच, त्याशिवाय  जगण्याला मोहर कसा येईल ?”  हा लेप देण्याचं महत्वाचं कार्य ‘दुर्गसखा’ सारखी संस्था आणि संस्थेतील  सदस्य आज करत आहे. 
कुठलाही मोबदला न घेता …अगदी निस्वार्थेने (आणि हेच  सर्वाधिक भावतं मनाला…) 
‘धुळवड’ हा त्याचाच एक भाग . 
दुर्गम ..ग्रामीण भागातल्या आपल्याच लहान मोठ्या भावंडांसोबत , त्या पालकांसोबत , शिक्षकांसोबत  आपला आनंद वाटून तो द्विगुणित करणं. 
केवळ  आनंद नाही तर इथला आजचा हा विदयार्थी उद्याचा  सुजाण नागरिक व्हावा. आपल्या पायावर उभा रहावा . समाजमनाचा आरसा व्हावा.  ह्यासाठी शैक्षणिक जबाबदरी हि घेतली जाते. 
शैक्षणिक साहित्य वाटप आणि असे अनेक उपक्रम म्हणूनच  वर्षभर सुरू असतात.  
आपण ज्या समाजात राहतो , त्या समाजाचं आपण हि देणं लागतो . हि जाणीव माणसाला मोठ्ठ करते.आणि त्याचबरोबर समाजमनाचा आदर्श हि ठरते. 
मला ह्या आनंदात सहभागी होता आलं. हाच मोठ्ठा आनंद. 
पर्यटनांतून प्रबोधन हे ब्रीद घेऊन समाजमनाच्या हितासाठी झटणाऱ्या दुर्गसखा ला मनाचा मुजरा. 
तुमचं हे कार्य अखंड सुरु राहो ..! 
     आपलाच , 
– संकेत पाटेकर 
२४.०३.२०१९ 
https://www.sanketpatekar.com/
 

Leave a Comment

Your email address will not be published.