दुरावा .. प्रेम आणि नातं

प्रेम हे …

दिवस मावळतीला लागलेला. अंधारून येण्याआधीचे पडसाद सर्वत्र उमटलेले. गडद्द
अश्या भावगंध रंगानं क्षितिज हि कसं झाकोळून निघालेलं .
आणि न्हाहत्या विचारधारेत.. भावधूंद होत..अथांगतेच्या मोकळीकतेनं,
मरीन ड्राईव्हच्या सागरी किनाऱ्यालगत..
ती दोघे..
आपल्या स्वप्नील दुनियेत रममाण झाली होती.

‘ आज मी खूप खुश आहे अगं…! त्याने आता बोलायला सुरवात केली.
मन बघ कसं.. आनंदी वर्षावाने बहरून आल्यासारखं वाटतंय. आनंदाने खुललयं ते,
जणू..मनाशी अडखळलेला, साठलेला, खळखळता प्रवाह.. ..आज पुन्हा प्रवाहित झाल्यासारखं वाटतंय, त्याच लयीत- त्याच ताल सुरात….प्रदीर्घ अश्या प्रतीक्षेनंतर.

खरंच….ग !
विश्वासच बसत नाहीये अजून …जे नजरेसमोर आहे. जे घडतंय. ते सत्य आहे …

उघड सत्य ?
क्षितिजाशी एकटक नजर लावून , मंद झुलणाऱ्या दीपज्योतीप्रमाणं.. तो आंतरिक भाव
उजळू लागला होता .

काय ssss रे ? इतकं काय झालं ? गहिवरून आल्यासारखं बोलतोयस आज ?
देहभान हरपलेल्या..त्या स्तंभित नजरेकडे..काहीसं खट्याळतेने पाहत ती पुटपुटली.
तिच्या ह्या बोलण्याने क्षणभर शांतमय पडसात उमटले गेले.
कुणी काहीच बोललं नाही.
दिशा मात्र अधीरतेने एकजूट झाल्या सारख्या वागू लागल्या. वाऱ्यानं हि मुद्दाम आपला वेग
मंदावला आणि तितक्याच त्याने आपली नजर हळूच तिच्याकडे वळवून.. तिच्या नजरेतल्या भाव सागराचे टिपणे घेत.. सौम्यतेने म्हटले,
त्याचं कारण तुला सांगायला हवं का ? आणि ते हि तू बाजूला असताना ?

क्षणभर ती त्याकडे एकटक पाहत राहिली.
नजरेतून दृढ भावनांचे विश्वसनीय दाखले देत, क्षितिजाशी डोळे मिटवून समाधिस्त होणाऱ्या ह्या व्यक्तीच्या मनात आज हि आपल्याविषयी तितकंच प्रेम आहे.
ह्या विचारानेच ती लाजेने मोहर्ली.
अंग अंग रोमांचित होऊन.. ती हि आता क्षितिजाशी डोळे रोखत.. आठवणींच्या त्या भावविश्वात स्थिरावली गेली.

प्रदीर्घ अश्या प्रतीक्षेनंतर, हि अशी त्यांची दुसरीच भेट म्हणावी,
बघता बघता दोन अडीच वर्षाचा कालावधी उलटून गेला होता .
प्रेमाचा ज्वर अजूनही दोघात फणफणत होता. त्यानंतर हे आज पुन्हा
एकत्रित आले होते .
कित्येक दिवसाच्या दुराव्याने खंडित झालेला सहवासिक श्वास.. आज पुन्हा मोकळा
होत होता. जुन्या आठवणींना आणि नव्या स्वप्नांना …प्रेमाचा मुलायम स्पर्श देत.
हसरा संवाद घडवत.

  • संकेत पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.