दुभंगलेली मनं

दुभंगलेली मनं एकत्रित करताना ..आपल्या मनाचा हि त्यात विचार करावा लागतो. सहज जुळलेलं , आणि जवळीक साधलेलं एखादं नातं काही काळानंतर हळूच दूर होत जातं.

माणसाची मनं जशी एकत्रित येतात तशीच ती दूर हि होतात. त्या मागचं कारण शोधायला गेल्यास , एक मात्र कळतं.

आपण त्यांच्याप्रमाणे वागत नाही. त्याचं मन राखत नाही. काही ना काही कुठेतरी त्यांच्या मनाला छेदून आपण पुढे जात असतो. ते त्यांच्या मनाला पटेनासं होतं.

सुरवातीला जीव लावणारी, भरभरून प्रेमाचा वर्षाव करणारी व्यक्ती पुढे मात्र काळा ओघाने आपली साधी विचारपूस करणं हि सोडून देते, तेंव्हा उगाच वाटतं..

माणसाच्या मनाचा काहीच भरवंसा नाही. ते कधी हि बदलू शकतं. त्या त्या परिस्थितीनुसार नि वेळेनुसार, त्यात बदल हा घडत राहतो. तेंव्हा आहे ते स्वीकारायचं हेच हाती राहतं.
तरीही मन मात्र प्रश्नाच्या अनेक गुंत्यात स्वतःला झोकून देतं. आणि त्याचा त्रास काहीसा होत जातो .

काही प्रश्नांची उत्तर मिळतात ती सहज सोडवता हि येतात. पण काही प्रश्न निरुत्तरच राहतात.
– संकेत पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.