दिवाळी म्हणजे उधळण पैशाची, कपडेलत्ता, भेट वस्तू अशा अनेकानेक खरेदीची.. दिवाळी म्हणजे उधळण मुक्त रोषणाईची, आकाशाला हि उजळणारी, मना मनाला भिडणारी, आनंद देणारी.. दिवाळी म्हणजे उधळण आनंदाच्या अनमोल क्षणांची, चिवडा लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या अशा नाना विविध चविष्ट फराळाची.. दिवाळी म्हणजे भेट नात्या गोत्यातील त्या खास व्यक्तींची, बहिण अन भावाची, भाऊबिजेच्या त्या गोड अनमोल क्षणाची, प्रेमाने दिलेल्या त्या भेट वस्तूची, शुभा शिर्वादांची.. दिवाळी म्हणजे मौलिक क्षण आनंदाने न्हाहून निघालेले .. चहू दिशा पसरलेले ..मना मनात ठसलेले. ~ संकेत य पाटेकर
आपणा सर्वांना ह्या आनंदी उत्सवाच्या, ह्या दीप प्रकाशाच्या म्हणजेच दिवाळीच्या खूप खुप शुभेच्छा ..!! हि दिवाळी सुख समृद्धीच्या आणि मांगल्याचा पवित्र क्षणांनी दरवळत राहो.