‘त्रिकुट’ – बहिण- भावाच्या प्रेमावर आधारित एक छोटीशी कहाणी..

बहिण- भावाच्या प्रेमावर आधारित एक छोटीशी कहाणी …लिहिण्याचा प्रयत्न बघू कितपत जमतंय …सुरवात तर झालेय …

नाती कधी ठरवून जुळवता येत नाही , अन म्हणूनच मनाच्या अंतरंगी उसळणाऱ्या उत्कट भावनांना हि कधी थोपवून ठेवता येत नाही . अशावेळी मनाचं हे वेडेपण शब्दांतून कथित होत जातं.

पुढच्या जन्मी , मी ‘ तुझा भाऊ ‘ म्हणून जन्म घेईन.

किंव्हा तू ‘ माझी बहिण’ म्हणून जन्म घे ? कसही असो.

पण हे नातं आपलं जन्मापासून हवंय मला … बस्स ? आपल्या दोघांच …बहीण – भावाचं

मी आधीच माझ्या देवाकडे साकडं घातलंय , तू हि साकडं घालं.

पण त्या आधी ,तुझ्या अंतकरणातून उमटलेले शब्द मला कळू देतं, ऐकू देतं. मनभरून ..!

मिळेल ना हे नातं ..बहीण – भावाचं ..सक्खेपणाचं , बोल ना ..

बहिणीच्या नजरेला नजर देतं पाणावलेल्या डोळ्यांनी अन जड अंतकरणानी तो बोलत होता. पुढ्यात असलेला चहा हि एव्हाना थंड झाला होता .

कित्येक दिवसाच्या भेटी नंतर हा असा दुर्मिळ योग पुन्हा जुळून आला होता . त्यामुळे दोघं हि बोलण्यात अगदी गुंग झाले होते. . गत आठवणीच्या क्षणांना सुगंधित अत्तराची फोडणी देतं.

तसं आयुष्यात नाती हि अनमोल असतात. सुवर्ण मुद्रित मुखुटासारखी ,अभिमानाने लखलखनारी.., हेवा वाटून घ्यावी अशी.. कायम हृदय समीप हवी असलेली … ती नाती मग रक्ताची असो वा मनाची , मनाने जुळलेली , हृदयाची धडधड थांबेपर्यंत ती आपली असतात. आपल्यात असतात.

जन्म मरण हा तर प्रकृतीचा नियम . जन्मापासून ते मरणापर्यंत सगळ काही ठरवून दिलेलं . अन त्या त्या प्रमाणे, त्या नुसार घडणारं . पण तरीही भविष्याचा वेध घेत जगत असणारे आपण जीवनातला हर एक क्षण एकमेकांच्या ओढीने, एकमेकां सहाय्याने , ओथंबून निथळनाऱ्या मायेने, शब्द गोडव्याने , गोंजारणार्या भावगंध स्पर्शाने , प्रेमाने, कायम घट्ट विणून राहावं म्हणून प्रयत्नशील असतो.

असाच हा एक प्रयत्न आयुष्याच्या एका वळणावर जुळलेल्या त्या नात्याची वीण कायम घट्ट राहावी म्हणून धडपडनाऱ्या त्या एका मुलाचा … त्या प्रेम वेड्या भावाचा…

संकेत य पाटेकर

Leave a Comment

Your email address will not be published.