ते बहरलेलं झाड..

ते बहरलेलं झाड..

नित्य नेहमीचीच ठरलेली जागा आमची. दुपारचा साडेबाराचा आकडी टोला पडला कि कॅन्टीन मध्ये पळत सुटायचं.
घरातून दिलेलं पोळी भाजीचा प्रसाद एक एक करत पोटात टाकयचा अन मग फेरफटका म्हणून मोकळ्या वातारणात , मोकळा श्वास घेण्यास ऑफिस बाहेरील वृक्ष वेलींच्या दाट छायेत थोडं विसावायच.आपण एकटाच असू तर निसर्गातल्या त्या विवध खट्याळ गमती जमाती डोळ्यांदेखत पाहायच्या अन पुन्हा काही वेळत ऑफिस मध्ये परतून आपल्या कामांत स्वाताहाला वाहवून घ्यायचं.
हे नित्य नेहमीचंच ठरलेलं माझं.

निसर्गाच्या सानिध्यात मनाला जी प्रसन्नता मिळते.  ती इतरत्र कोठूनही मिळणार नाही.
काही दिवसांपूर्वी च ते पानागलेलं झाड आज चक्क बहरून निघालंय.
मोहर फुललाय म्हणायचा . त्यामुळे विविधरंगी पक्षी पाखरांचा मेळावा त्याच्या अंगा खांद्यावर वाऱ्याच्या सुरेल स्वरात अगदी इकडून तिकडे झुळत असतो.
कधी एखादा दयाळ , तर कधी पिसारा फुलवून नाचणारा ‘ नाचरा’ , कधी विटू विटू करणारा मिठास पोपट, तर कधी चिऊताई पेक्षा हि अगदीच लहान इवलासा पक्षी आपलं गोंडस दर्शन घडवतं.

त्यांचे विविध नखरे नजरेत टिपून घ्यावीत अशीच असतात.  त्यातच आपल्या कावळ्या चिमण्याच्या येरझारया होत असतात. मधेच एखादा कोकिळ पानांच्या सळसळत्या लाटेत स्वतःला लपवत आपल्या सुरेल स्वरात गाऊ लागतो.
इवलीशी खारुताई सतर्क नजरेने ह्या फांदीवरून त्या फांदीवर ” मीच इथली राणी ” म्हणत मोठ्या दिमाइक्तेने शेपूट झुलवत बागडत असते .

फुलपाखरे आपल्या विविधरंगी कलात्मक छटा पसरून इथल्या सौंदर्यात अजून भरणा घालत असतात .

झाडाच्या अवतीभोवती मुळाशी पसरलेल्या मातीत किडे मुंग्या आपल्या नेमून दिलेल्या कामात सतत व्यस्त असलेले दिसून येतात.
फुलांचा सडा सर्वत्र पसरलेला दिसून येतो,  त्याचा सुगंध दरवळत असतो एक आल्हादायक वातावरण असत ते ……मनाला रीफ्रेश करणारं ..!

निसर्ग हा अद्भुत आहे रहस्यमय आहे. तितकाच लावण्यमय सौंदर्याने नटलेला देखील. 
ज्ञानार्जनाने समृद्ध असा , अफाट शक्तीचा , ममत्वेने परिपूर्ण हि … 
अश्या ह्या निसर्गात त्याच्याशी गुजगोष्टी करण्यात , त्याच्या सहवासात स्वतःला हरवून घेण्यास मला खूपच आवडतं. त्याच्यासारखा गुरु नाही .
 कोणतही मानधन न घेता बर्याच गोष्टीच शिकवतो .

– संकेत य पाटेकर
११.०४.२०१४

ते बहरलेलं झाड..

आज त्याची माझी चक्क दुसरी भेट <<<<

तेही कित्येक दिवसाने घडली ..तेच ठिकाण , तीच वेळ … पहिल्यांदा जेंव्हा तो भेटला होता , तेंव्हा किती आनंद झाला होता सांगू , एखाद्या गोष्टी विषयी अति उत्सुकतेने अन कुतूहलाने वाचावं अन ते अप्रत्यक्षरित्या अचानकपणे डोळ्यासमोर उभ रहाव, ह्यात किती तो आनंद ……शब्दात वर्णन करता येणार नाही.

तांबट दिसायला तसा फारच सुंदर …अन तितकाच धीट हि..हाकेच्या अंतरावर मी त्याची सुरु असलेली कसरत पाहत उभा होतो . ते हि दहा पंधरा मिनिटे , अन तो हि न डगमगता आपल्या कामात अगदी तल्लीन झाला होता. एखाद्या पक्षाच घरट आपल्या डोळ्यादेखतं आकार घेताना पाहणं  , किती नाविन्यपूर्ण अन भाग्यातली गोष्ट नाही का ? ते भाग्य मला लाभलं हो आज ..थोड्या अवधीसाठी का होईना ….
आनंदी आनंद गडे..

मागची त्याची पहिली भेट घरट्यासाठी जागा पाहण्यात गेली.
आणि ती त्याने निवडली हि . अन आज चक्क तो आपल्या बळकट चोचीचे दणके देतं.
घरट्य़ास आकार देऊ पाहत होता . पंघांची फडफड करत तो कधी हवेत तरंगत ,तर कधी एका पायवर उभा राहतं , घरट्य़ा ठिकाणी फांदीवर चोचीचा प्रहार करत . अधे मध्ये थोडा विसावा घेत . अन पुन्हा काम चालू करत . वाटावं कि असंच तिथे उभ राहावं त्याची ती कारागिरी पाहत …

पण ऑफिस ची ‘ लंच ब्रेक’ ची वेळ घटत आल्याने , नाईलाजाने पुन्हा परतावं लागलं

एक चांगल आहे , ऑफिस च्या आसपास झाड्यांची बहरलेली बाग असल्याने , दुपारच्या मधल्या सुट्टीत जेवण लवकर उरकून ..मला विविध पक्षांचे अगदी जवळून दर्शन मिळते.
कॅमेरा सोबत नसल्याने , डोळ्यात दे क्षण साठवून घेतो… अगदी टकमक पाहत .

नकळत आंनद देतात ….. हि पक्षी पाखरे !

– संकेत य पाटेकर
११.०८.२०१४

Leave a Comment

Your email address will not be published.