ते ओघळते अश्रू थेंब..

ते ओघळते अश्रू थेंब..

शनिवार , संध्याकाळची वेळ . साधारण ६ वाजत आले होते.माटुंगा स्थानकात एका मित्राची वाट पाहत बसलो होतो . पाच एक मिनिटे बोलूनही तो अद्याप आला न्हवता . त्यामुळे रिकामा वेळ , मोबाईल हि हाती पण त्यात न रेंगाळता नजर इकडे तिकडे सहजच भिरभिरत होती.

नित्य नेहमीच्या ठरल्या वेळेप्रमाणे लोकल ये जा करत . त्यातून नवं नवीन चेहरे पायऊतार होई . तेंव्हा नजर आपुसकच त्या येणा जाणाऱ्या चेहऱ्यावरील , विविध रंगी भाव छटा टिपून घेण्यात मश्गुल होई, अशातच काही वेळ निघून गेला. अन एके ठिकाणी अचानकपणे मनाच्या अंतरंगाला एकच घाव बसला ते ताडकनं जागं झालं . काहीसं कळवळल हि…

त्या ”ओघळत्या अश्रू थेंबानी ”

अश्रू आनंदाचे ,

अश्रू वेदनांचे,

अश्रू धडधडनाऱ्या,

हृदयी स्पंदनांचे

नजर स्तब्ध झाली. एकवटली, त्या वेदनामय अश्रू थेंबाकडे… काय झाले असेल ? का ,असे ओघळतायेत, हे अश्रू थेंब ? न थांबता , आळी पाळीने लगातार …

काय कारण असावं ? का ?

‘क’ ची बाराखडी सुरु झाली. तिच्या अंतरंगाचा, मनाचा आढावा घेत.

साधारण ३० एक वर्षाची ती विवाहित स्त्री , मनातले हुंदके तिला अनावर होत होते. इतके कि आपण रेल्वे परिसरात , सार्वजनिक ठिकाणी , ऐन गर्दीत , फलाटावर उभे आहोत हे माहित असूनही त्या अश्रूं थेंबांना , तिला आवर घालता येत न्हवता. ते मोकाट सुटले होते.

वेदनामय हाल अपेष्टा सहन करून , भोगून …जणू मुक्तीच्या दिशेने …गालावरून सरसर……सरसर…धाव घेत.

मनातल्या हृदयी भावनेला जरा तरी कुठे असा धक्का लागला कि अश्रूचा बांध फुटतोच फुटतो . मग ते ठिकाण एकांतातलं असो वा सार्वजनिक कुठलही ..त्या आतल्या भावनेस रोकता येत नाही . ते ओघळतातच …अश्रू रूपाने ..

हे अश्रू हि असेच…..भावस्पर्शी , ओघळते ..

मी ते टिपून घेत होतो . माझ्या मनाच्या भावपटलावर. ह्या पलीकडे काही करता येत न्हवतं . अन करू हि शकत न्हवतो . काय करणार मी ? काही क्षण असंच टकमक पाहत राहिलो.

मोबाईल च्या स्क्रीनवर एक वेळ ती पाही अन पुन्हा , वेदामानय हुंदके तिला अनावर होई . अन तिच्या अश्रूंचा बांध फुटे. ते दडवण्याचा ती प्रयत्न हि करे ..पण व्यर्थ …, कसल्या तरी गहिर्या वेदनेने तिला वेढून धरलं होतं. त्यातून सुटका मात्र होत न्हवती. भरीस भर म्हणून कुठेतरी हृदय चिरणार हिंदी गाण हि नेमकं त्याच वेळेस सुरु होत.

मी ते पहात होतो . न्हाहाळत होतो. ऐकत होतो .

काही क्षण असेच निघून गेले अन पाटोपाट धावणाऱ्या एका लोकल मध्ये ती हि तिच्या वाटे ….पुढे झाली. मनात , त्या क्षणाची छबी ठेवत. ना- ना विचारांना उमाळा देत.

आयुष्यात खरचं सर्वात अधिक जर वेदना होत असतील तर त्या आपण, आपलं म्हणून घेणाऱ्या, अन आपल्या असलेल्या, त्या जीवापाड व्यक्तीन मुळेच.

जिथे प्रेम तिथे वेदना ह्या आल्याच. जसं प्रेम निखळ आनंद देत तसं ते कळवळनारया न शमनारया वेदना हि देत. नात्यांची हि मोतीमाळ, कधी कधी अश्रूंच्या ह्या भावगंध दवबिंदू नि न्हाऊन निघते. प्रेमाचा ओघळता वर्षाव जणू…..

प्रेम प्रेम प्रेम अन प्रेम …

प्रेमात माझ्या, हृदयी स्नेह बंध

डोळ्यात तरळते, तुझेच प्रतिबिंब

-संकेत य. पाटेकर

ते ओघळते अश्रू थेंब..

Leave a Comment

Your email address will not be published.