तुझ्या अश्या वागण्याचं
कारणच कळत नाही 
मी बोलत राहतो 
तू काहीच बोलत नाही..!

संवाद होतो, तेवढ्यापुरतं 
तेही माझ्याकडून , अगदीच फोनवरून 
मीच एकटा बडबडतो 
तू प्रतीसादच देत नाही…


तुझ्या अश्या वागण्याचं
कारणच कळत नाही…!

भेटावयाचं म्हणावं कधी 
तर तू हो-नाही’म्हणत नाही .
वाट पाहतो वेड्यावाणी
तो ‘ क्षण’ काही येत नाही..

तुझ्या अश्या वागण्याचं
कारणच कळत नाही… !

मनातली हि वेडी आशा 
अजूनही हार घेत नाही.
मी बोलत राहतो एकपरीने
तू काहीच बोलत नाही..!

तुझ्या अश्या वागण्याचं
कारणच कळत नाही…!

– संकेत य पाटेकर 

Leave a Reply

Your email address will not be published.