तुमचं आवडतं पुस्तक कोणतं ?
आजवर तशी अनेक पुस्तकं वाचलीत, वाचून काढलीत. ( म्हणजे मोजता येतील इतपतच, कारण आयुष्यं हि अपुरं पडेल इतपत अगणित पुस्तकं जगभरात आज लिहली गेली आहेत. )
जी हाती आली. जी वाचली… ती भुकेल्या नजरेने, झपाटून गेल्यासारखं.. अधाशासारखीच,
त्यात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, भा. द .खेर, साने गुरुजी, वपु काळे, प्रवीण दवणे सर, व्यंकटेश माडगुळकर, मारुती चितमपल्ली, गो.नि दांडेकर, रणजित देसाई, विश्वास पाटील, ह्या सारखी माझ्या आवडत्या लेखकांची नावे घेता येतील.
ह्या लेखकांनी त्यांच्या समृद्ध लेखणीने अक्षरशः मनावर गारूढ करून ठेवलंय. अजूनही..
ज्याचा माझ्या मनावर हि आणि विचारावर हि काहीसा परिणाम दिसून येतो.
त्यात मग ललित लेखन असेल. भटकंती वर आधारित पुस्तकं असतील, कथा कादंबऱ्या, ऐतिहासिक, अध्यात्मिक साहित्य असेल, काव्य असेल, नाटक असेल, चरीत्रात्मक वर्णन असेल,
ह्या अश्या अनेक पुस्तकापॆकी, मनाभोवती अजूनही रिंगण घालून असलेलं एकमेव असं पुस्तकं असं कोणतं ? असं जर मला कुणी विचारलं वा प्रश्न केला तर माझं उत्तर ‘मृत्युंजय ‘ हेच असेल.
कर्णावर आधारित असलेली, शिवाजी सावंत ह्यांनी लिहलेली एक उत्कृष्ट कादंबरी..
जी अजूनही मनाभोवती वलय करून आहे.
कर्ण खऱ्या अर्थाने कळला आणि हृदयात विसावला तो ह्या कादंबरीतूनच..
जीवनाचं महात्म्य आणि बोध ह्या अश्याच काही पुस्तकातून मिळून जातं. अशी कितीतरी पुस्तके आहेत.. मनाचा ठाव घेणारी, मनाशी बिंबलेली …
त्यात ‘युगंधर ‘आहे. छावा आहे. श्रीमान योगी, पानिपत , ययाती ..रणजीत देसाईंची – शेकरा,
वाचता वाचता पापण्यांचे कड ओलावणारे
भा. द. खेर लिखित – हसरे दुःख आहे (चार्ली चैप्लिन वर आधारित ) साने गुरुजींची – श्यामची आई आहे.
त्याचबरोबर बंकिम चंद्र चटोपाध्याय लिखित आनंदमठ…
विणा गवाणकर ह्याचं – एक होता कार्व्हर..
वृंदा भार्गवे ह्यांचं Why Not I –
व्यंकटेश माडगुळकर ह्यांची बनगरवाडी –
डॉक्टर ए. पी. जे अब्दुल कलाम ह्यांचं मराठी अग्नीपंख –
सुधीर फडके..ह्यांचं जगाच्या पाठीवर,
लाल बहादूर शास्त्री ह्याचं चरित्रात्मक पुस्तक ..
अशी कितीतरी म्हणता येतील..जी अजूनही मनाभोवती गंध दरवळून आहेत.
हि पुस्तकं खरंच समृद्ध करतात आपल्याला आणि म्हटलं तर हे आयुष्यं हि पुरणार नाही इतकी उकृत्ष्ट, आणि रसिक साहित्य संपदा आपल्याला लाभलेली आहे. बस्स वेळ मिळेल तसं आपण वाचत जायचं.. आणि घडत जायचं..आपलं आपणच..
तुम्हाला देखील एखाद कुठलं पुस्तकं असंच आवडलं असेलच ना ? चला, सांगा तर मग ..
तुमचं आवडतं ते पुस्तक कोणतं ? जे अजूनही मनाभोवती रिंगण घालून आहे.
आपलाच,
संकेत य पाटेकर
एक सकारात्मक विचार करायला लावणार मला आवडलेले पुस्तक मजेत जगावं कसं ( लेखक शिवराज गोर्ले )
धन्यवाद ..! छानश्या ह्या आपल्या प्रतिक्रियेबद्दल..
ह्या निमित्ताने नवीन पुस्तकाची ओळख झाली. नक्कीच वाचेन.
वपुर्वाई
लोकप्रिय कथाकार व.पु. काळे आपल्या प्रत्येक कथेत सर्वसामान्य माणसांच्या जीवनशैलीवर आधारीत हसणं, रडणं,रुसणं,संघर्ष आशा वेगवेगळ्या परिस्थितीशी सामना करणारी माणसं आणि त्यांच्याशीच निगडीत काही गोष्टीचा आढावा घेत आपल्या मिश्किल शैलीत माणसं रंगवतात. वपुंच्या लेखनातील हा पैलुच वाचकांच मन जिंकुन घेतं…
वपुंचा मी हि जबरदस्त फॅन आहे.
माझे सर्वात आवडते लेखक म्हणजे वपु , त्यांच्याच विचारांचा पगडा माझ्या मनावर हि बिंबला गेला आहे.
त्यांची लेखणी झपाटून टाकण्यासारखीच …जीवनाचं मर्म सांगते. माणसातलं माणूस शोधायला मदत करते. आंतरिक संवाद सुरु करते. धन्यवाद ! आपुल्या ह्या छानश्या- सुंदरश्या प्रतिक्रियेबद्दल..